Beauty Tips : त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग दिसण्यासाठी कोलेजन फार महत्वाचे आहे. कोलेजन प्रोटीनचा एक हिस्सा आहे, जो आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी वाढणे, हाइड्रेट ठेवणे आणि त्वचा चिरतरुण दिसण्यास मदत होते. अशातच त्वचेवर रिंकल्स आणि फाइन लाइन्स दूर करण्यासाठी कोलेजन मदत करते. याशिवाय वाढत्या वयासह त्वचेमधील कोलेजनचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. यावेळी डाएटच्या मदतीने कोलेजन वाढवू शकता. जाणून घेऊया त्वचेमधील कोलेजन नैसर्गिक रुपात वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया…
आंबट फळं
त्वचेमधील कोलेजन नैसर्गिक रुपात वाढवण्यासाठी आंबट फळांचे सेवन करा. यासाठी संत्री, लिंबू आणि किवीसारखी फळं खा. या सर्व फळांमध्ये व्हिटॅमिन सी अत्याधिक असल्याने शरीरात कोलेजन वाढले जाते.
बेरिजचे सेवन करा
कोलेजन बूस्ट करण्यासाठी बेरिज फायदेशीर आहे. अशातच बेरिजमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लू बेरिज आणि ब्लॅक बेरिजचे सेवन करू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे शरीरात कोलेजन बूस्ट होते.
पपई
पपईमध्ये व्हिटॅमिन सी अधिक असते. याशिवाय व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडेंट्सचा पपई उत्तम स्रोत आहे. यामध्ये असणारे एंजाइम्स त्वचा चिरतरुण दिसण्यास मदत करतात.
अननस
कोलेजन बूस्ट करण्यासाठी दररोज डाएटमध्ये अननसाचे सेवन करू शकता. याचे सेवन केल्याने त्वचा हाइड्रेट राहते आणि त्वचेचा रंग सुधारला जातो. यामध्ये ब्रोमेलिन कंम्पाउंड असल्याने पचनक्रिया सुधारली जाते. याचे सेवन केल्याने स्किन इंफ्लेमेशनही कमी होते.
आंबा
त्वचेच्या आरोग्यासाठी आंब्याचे सेवन करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी दोन्ही प्रकारची पोषण तत्त्वे असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आंबा मदत करतो.
======================================================================================================
हेही वाचा :
Multani Mati : मुलतान मातीचे सौंदर्यवर्धक फायदे
Sindoor : सिंदूर लावण्याचे धार्मिक फायदे
==================================================================================================
पेरू
कोलेजन बूस्ट करण्यासाठी पेरूचे सेवन करू शकता. पेरू थंडीत मार्केटमध्ये खूप विक्री केले जाते. यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन सी अशी दोन्ही पोषण तत्त्वे असल्याने कोलेजन प्रोडक्शन वाढले जाते.(Beauty Tips)
टोमॅटो
टोमॅटोचा वापर बहुतांश भाज्या, सॅलडमध्ये केला जातो. यामध्ये लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी असल्याने त्वचेमधील कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेचे आरोग्य राखले जाते.