Beauty Tips : इंस्टेट ग्लो मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. याच प्रोडक्ट्समध्ये स्किन ब्लीचचा समावेश आहे. अशातच बहुतांशजण चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठई ब्लीचचा वापर करतात. पण ब्लीच तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते.
खरंतर, आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिनचे उत्पादन होते तेव्हा डार्क आणि डल दिसू लागते. ही एक स्किन पिगमेंटेशनची समस्या आहे. एक्सपर्ट्स असे मानतात की, आपले जेनेटिक्स स्किनमध्ये मेलेनिनची संख्या ठरवतात. ज्या लोकांची त्वचा डार्क असते त्यांच्यामध्ये मेलेनिनची संख्या अधिक असते. अशाप्रकारे उन्हात राहणाऱ्या व्यक्तींसोबत ही समस्या होऊ शकते.
ब्लीच कसे करते काम?
ज्यावेळी आपण त्वचेवर ब्लीचचा वापर करतो तेव्हा मेलेनिनचा स्तर कमी होतो. याच कारणास्तव त्वचा ब्राइट आणि ग्लोइंग दिसते. दरम्यान, उन्हाळ्यात ब्लीच करणे टाळावे. (Beauty Tips)
ब्लीच लावण्याचे नुकसान
ब्लीच लावणे अशा व्यक्तींसाठी अधिक समस्येचे ठरु शकते ज्यांची त्वचा सेंसिटिव्ह आहे. त्वचेवर ब्लीच पावडर लावल्याने डाग येऊ शकतात. हेच डाग चेहऱ्यावर दीर्घकाळ राहू शकतात. यामुळे इरिटेशन आणि रेडनेसची समस्या उद्भवू शकते. यामुळे त्वचेवर लहान लहान दाणे येऊ शकतात. सर्वाधिक महत्त्वाची बातमी अशी की, त्वचेवरील नैसर्गिक तेल उत्पादन होणे बंद होते. याच कारणास्तव त्वचा कोरडी होऊ लागते.
घरगुती उपाय
-चेहऱ्यावर दहीचा वापर केल्यास त्वचेला महत्त्वाची पोषण तत्त्वे मिळतात. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिडमध्ये मॉइश्चराइजिंग आणि ब्लीचिंग गुण असतात जे त्वचेला ग्लो आणण्यास मदत करतात.
-एलोवेरा जेलमध्ये हाइपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासून दूर राहता येते. याशिवाय चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते.
-संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये ब्लिचिंग गुण असतात. जे त्वचेला ग्लो देण्यास मदत करतात.