प्रत्येक व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालण्यात मोठी भूमिका निभावतात ते आपले केस. केस कायमच सर्वांचे सौंदर्य अधिकच वाढवतात. मात्र आजच्या काळात प्रदूषण, खाण्याच्या पिण्याच्या बदलेल्या सवयी, चुकीची जीवनशैली आदी अनेक गोष्टींमुळे केसांचे सौंदर्य बिघडत आहे. केसांचे सौंदर्य जपण्यासाठी सगळेच विविध उपाय करत असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषोधोपचार घेतात, घरगुती उपाय करतात. पण आपण कितीही औषधं घेतले, विविध उपाय केले तरी केसांना तेल लावण्याचा पर्याय कधीही जुना होणार नाही. केसांना तेल लावल्यामुळे केसांचे सौंदर्य तर कायम टिकते शिवाय केसही निरोगी होतात. (Hair Care)
केसांना तेल लावण्याचे महत्त्व आपल्या घरातील जुन्या लोकांना पूर्वीपासूनच माहिती होते. म्हणूनच दर रविवारी आपली आजी आपल्याला तिच्या समोर बसवून केसांना तेल लावून मस्त मसाज करून द्यायची. केसांचे आरोग्य जपण्यासाठी तेल खूपच महत्त्वाचे आहे. केसांना तेल लावल्याने त्यांना योग्य पोषण मिळते. केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावल्याने अनेक फायदे होतात. केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे. जर तुम्ही केसांना नियमित तेल न लावल्यामुळे केसांची मुळे आणि टाळू कोरडी होतात त्यामुळे केस निर्जीव होऊ लागतात. त्यामुळे केस गळणे आणि तुटणे सोपे होते. केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. (Marathi News)
केसांना नियमित तेल लावले तर याचा फायदा तुमच्या केसांना नक्कीच होईल. जर तुमचे केस कडक होत असतील, तर रोज केसांना तेल ला. तेलाने मसाज केल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात, तसेच डोक्यामध्ये रक्त पोहोचायलाही मदत होते. शिवाय केसांना नियमित तेल लावल्यामुळे केस पांढरे होत नाहीत. रोज रात्री १० मिनीटं डोक्याला तेल लावून मसाज केल्यामुळे केस मजबूत होतात. तेल लावल्यामुळे केसांना प्रोटीन मिळते, ज्यामुळे केस मजबूत व्हायला मदत होते. बदाम तेल, आवळ्याचं तेल लावल्यामुळे केस चांगले होतात. ज्या मुलींना लांब केस ठेवण्याची इच्छा आहे, त्यांनी नियमित केसांना तेल लावा, यामुळे केस लांब आणि मजबूत होतात. (Todays Marathi Headline)

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तुमच्या स्कॅल्पवरील नैसर्गिक तेल कमी होते. स्कॅल्पवरील नैसर्गिक तेल कमी झाल्यावर कोंड्याची समस्या उद्भवू शकते. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे खाज सुटणे आणि केसगळतीची समस्या होऊ शकते. केसांना तेल लावताना केसांना मसाज केल्यामुळे तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मददत होते. केसांना नियमित तेल लावल्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळण्यास मदत होते त्यासोबतच पांधऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. केसांना तेल लावल्यामुळे तुमच्या स्कॅल्पवरील बॅक्टिरियाची वाढ होते. केसांना तेल लावल्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. केसांना आठवड्यातून दोन वेळा तेल लावल्यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होते. (Top Marathi News)
डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी केसांना तेल लावा. पण यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार डोक्याला तेल लावा. आयुर्वेदानुसार डोकेदुखीची समस्या वाताच्या त्रासाशी संबंधित असतो. हा त्रास कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस केसांना तेल लावा.लक्षात ठेवा केस धुतल्यानंतर केसांना तेल लावणे शक्यतो टाळावे. कारण यामुळे केसांमध्ये धूळ आणि माती जमा होण्याची शक्यता असते. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. यामुळे आपल्या केसांसह टाळूच्या त्वचेलाही नुकसान पोहोचते. (Latest Marathi Headline)
तेल लावण्यापूर्वी आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे तेलातील पोषक घटकांचा खोलवर पुरवठा होतो. केसांमध्ये तेल पूर्णतः मुरल्यानंतरच केस शॅम्पूने धुणे. केसांमध्ये धूळ, माती जमा होण्यापूर्वी तेल मसाज करून केस धुणे. केसांना तेल लावल्यानंतर कमीत कमी तीन तासांनंतर केस धुवावे. केसांना तेल लावताना जास्त गरम करून तेल लावू नये. शिवाय केसांना जास्त प्रमाणात तेल लावल्यास केस चिकट होतात. केसांसाठी योग्य तेलाची निवड करावी. लक्षात ठेवा केसांऐवजी आपल्या टाळूचा तेलाने मसाज करावा. टाळूच्या त्वचेचे आरोग्य निरोगी असल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहते.(Top Trending News)
=========
Winter Breathing Problems : थंडीत श्वास घेण्यास त्रास होत असल्यास करा ही कामे, मिळेल आराम
=========
केसांना तेल लावण्यासाठी हातांवर कोमट तेल घ्या आणि हलक्या हाताने टाळूवर लावा. यानंतर हाताच्या बोटांनी जवळपास १० ते १५ मिनिटांपर्यंत टाळूचा मसाज करावा. जोर देऊन टाळू रगडू नये. मसाजनंतर तासाभरासाठी केसांमध्ये तेल राहू द्यावे. यानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे केस लांबसडक, घनदाट आणि काळेशार होण्यास मदत मिळेल. केसांसाठी नैसर्गिक तेलांचा वापर केल्यास अधिक फायदे मिळतील. जसे की ऑलिव्ह ऑइल, नारळाचे तेल, कडुलिंबाचे तेल, जोजोबा ऑइल, चमेलीचे तेल, पुदिन्याचे तेल, तिळाचे तेल, बदामाचे तेल, भृंगराज तेल, लव्हेंडर ऑइल आदी. (Social News)
(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
