Home » विजय थलपथी यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘बीस्ट’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

विजय थलपथी यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘बीस्ट’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

by Team Gajawaja
0 comment
'बीस्ट'
Share

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजय थलपथी यांच्या ‘बीस्ट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २०२२ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. २२ मार्च म्हणजेच आज, चित्रपटाच्या निर्मात्यांनी विजयच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून त्याची नवीन रिलीज डेटही जाहीर केली आहे.

‘बीस्ट’ आता एक दिवस आधी म्हणजेच १३ एप्रिलला रिलीज होणार आहे. याआधी हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक दिवस मागे ढकलली गेली आहे कारण १४ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये रॉकिंग स्टार यशच्या ‘KGF चॅप्टर २’ चित्रपटाशी भिडणार होता

हा गोंधळ टाळण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी १३ एप्रिल ही रिलीज डेट फायनल केली आहे. सन पिक्चर्स प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. सन पिक्चर्सने आज त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटातील विजयचा लूक दर्शवणारे नवीन पोस्टर जारी केले.

Vijay's new Tamil film titled Beast, first-look poster unveiled on the eve  of his birthday - Hindustan Times

====

हे देखील वाचा: केजीएफ चॅप्टर 2’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

====

या पोस्टरमध्ये तुम्हाला विजय थलपथी हातात बंदूक घेऊन अत्यंत आक्रमक लूकमध्ये दिसणार आहे. या पोस्टरवर चित्रपटाची नवीन रिलीज डेटही लिहिली आहे.

‘बीस्ट’ चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना, सन पिक्चर्सने कॅप्शनमध्ये लिहिले – बीस्ट फ्रॉम १३ एप्रिल. चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.

नेल्सन दिलीपचा चित्रपट बीस्ट हा एक गँगस्टर थ्रिलर चित्रपट आहे. नेल्सनने विजयचा मास्टर हा चित्रपट दिग्दर्शितही केला आहे, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

सध्या ‘बीस्ट’बद्दल बोलायचे झाल्यास, विजय थलपथी व्यतिरिक्त, पूजा हेगडे, सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

====

हे देखील वाचा: अमिताभ बच्चन अजय देवगणला खेचणार प्रश्नाच्या भोवऱ्यात, ट्रेलरने वाढवली उत्सुकता

====

या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंद्र यांनी दिले आहे. या चित्रपटातील दोन गाणी आत्तापर्यंत रिलीज झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय थलपथी यांनी जिमखाना या गाण्याला आपला आवाज दिला असून त्यांच्या चाहत्यांना हे गाणे खूप आवडते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.