Home » उन्हाळ्यात काळे कपडे घालत आहात तर सावधान…

उन्हाळ्यात काळे कपडे घालत आहात तर सावधान…

by Team Gajawaja
0 comment
Black Clothes
Share

मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरु होत आहे. या तिस-या आठवड्यात सूर्य अधिक तापलेला राहणार आहे. उन्हाची तीव्रता वाढणार आहे.  पर्यायानं उष्मा वाढणार असून त्याचा ताप सर्वांनाच होणार आहे. उन्हाळ्यात वाढलेला हा उष्मा सहन करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबिले जातात.  त्यातला पहिला आणि मुख्य म्हणजे, या गरमीमध्ये वापरण्यात येणारे कपडे. उन्हाळा वाढला की, पहिल्यांदा कपाटातले सुती कपडे बाहेर येतात. अंगाला मुलायम आणि सौम्य जाणीव देणारे सुती कपडे उन्हाळ्यात वापरले जातात. पण या सुती कपड्यांसोबत त्यांचा रंगही महत्त्वाचा असतो, याची आपल्याला कल्पना आहे का? उन्हाळ्यात शक्यतो सौम्य रंगाचे कपडे वापरले जातात. काळ्या (Black Clothes) किंवा गडद रंगाचे कपडे घालून भर उन्हात बाहेर पडले तर उन्हाची तिव्रता अधिक जाणवते. पण जर कपडे पांढ-या शुभ्र किंवा सौम्य रंगाचे घातले तर उन्हाच्या झळा लागतात पण त्याचा फार त्रास जाणवत नाही. उन्हाळ्यात काळ्या आणि गडद रंगाच्या कपड्यांमध्ये जास्त गरम का वाटतं,  हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. तसेच सौम्य रंगाचे कपडे थंडावा का देतात, हे जाणणंही उत्सुकतेचं आहे.  

गडद रंगाचे कपडे हे नेहमी सूर्याची उष्मा शोषून घेतात आणि परिणामी हे कपडे घातल्यावर शरीराला अधिक गरमी लागते. त्याच्या उलट सौम्य रंगाचे किंवा पांढ-या रंगाचे कपडे हे उष्णता परिवर्तीत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी सौम्य रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला देण्यात येतो. उन्हाळ्यात जाड आणि गडद रंगाचे कपडे घातले तर त्याचा शरीराला त्रास होतो. गडद रंगाचे कपडे  हे शरीराला उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात. काही वेळा हट्टानं काळ्या (Black Clothes) किंवा गडद रंगाचे कपडे सातत्यानं उऩ्हाळ्यात घातले तर आजारी पडण्याचीही शक्यता असते. कारण काळ्या (Black Clothes) आणि गडद रंगाचे कपडे जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतात. परिणामी हे कपडे खूप गरम होतात आणि शरीराचेही तपमान वाढते.  त्यामुळे जे उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे कायम वापरतात त्यांना शरीरावर पुरळ येणे,  अतिरिक्त घाम येणे, घामाला वास येणे,  त्वचेवर लालसर चट्टे येणे, तसेच अन्य त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते.  

याऊलट हलक्या किंवा पांढ-या रंगाच्या कपड्यांचा वापर केल्यास भर उन्हाळ्यातही शरीराला थंडावा मिळाल्याची जाणीव होते. हलक्या रंगाचे कपडे कमी उष्णता शोषून घेतात. या कपड्यांवर जास्त वेळ उष्णता राहत नाही आणि हे कपडे लवकर थंड होतात. परिणामी असे कपडे घालणा-यां व्यक्तींचे शरीर लवकर थंड होते.   

उन्हाळ्यात कपडे परिधान करतांना जसे रंगाला महत्त्व आहे, तसेच ते कुठल्या प्रकारचे कापड आहे, यावरही उन्हाळ्याचा त्रास शरीराला किती होतो, हे अवलंबून असते. उन्हाळ्यात नायलॉनऐवजी सिंथेटिक कपडे, कॉटन, क्रेप, शिफॉन आणि जॉर्जेट फॅब्रिकचे कपडे घालावेत. हे अतिशय हलके कपडे आहेत जे हवा सहजतेने जाऊ देतात आणि घाम देखील कमी करतात. उन्हाळ्यात, घट्ट आणि घट्ट कपड्यांऐवजी, सैल आणि उघडे कपडे घालावे जेणेकरून जास्त घाम येणार नाही आणि हवादार कपड्यांमध्ये खूप गरम वाटत नाही. याशिवाय सर्वात जास्त फायदेशीर ठरतात ते सुती कपडे. उन्हाळ्यात सुती कपडे हे सर्वाधिक वापरले जातात. उन्हाळ्यात ज्या मंडळींना सतत बाहेर काम करावे लागते,  त्यांच्यासाठी सुती कपडे वरदाई ठरतात. 

======

हे देखील वाचा : मृत्यूवेळी व्यक्तीला दिसतो लख्ख उजेड, वैज्ञानिकांनी सांगितले हैराण करणारे तथ्य

======

उन्हाळ्यात कपडे घातलांना आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे कपडे घातलांना ते सैलसर असावे याची काळजी घ्यावी. अंगाला घट्ट चिटकणारे कपडे घातल्यास शरीरावर चट्टे येण्याची शक्यता असते.  काहींना शरीरावर मोठ्या प्रमाणात घामोळे येतात. कारण उन्हाळ्यात घाम खूप येतो.  घट्ट कपड्यांमुळे घाम त्वचेच्या बाहेर येऊ शकत नाही.  परिणामी अंगावर चट्टे पडतात.  किंवा पुरळ येऊन त्वचा लालसर होते. बरेचजण उन्हाळ्यात फिरायला बाहेर जातात.  अशावेळी कपडे कोणते घालावे याचा फार विचार केला जात नाही.  ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत, तेथील वातावरण अधिक लक्षात घेतले पाहिजे.  ब-याचवेळा स्लिव्हलेस कपडे घातल्यानं हात काळवंडतात. अशावेळी बाहेर फिरायला गेल्यावर कडक उन असेल तर शरीर पूर्ण झाकेल असेल सैल कपडे वापरावे.  त्यामुळे त्वचा काळवंडणार नाही आणि शरीररही थंड राहण्यास मदत होईल.  

सई बने  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.