नुकतीच इंडिया टीम बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कांगारुंकडून ३-१ अशी पराभूत झाली आणि नेहमीसारखं भारतीय टीमवर टिकासत्र सुरु झालं. टीका होण्याला कारण देखील होतं, ते म्हणजे बुमराह सोडून इतर खेळाडूंना आणि विशेषत: सिनियर खेळाडूंना हवा तसा खेळ करता आला नाही. विराट कोहली आणि रोहित शर्माचा खेळ इतका ढेपाळलेला होता, की त्याच्या राजीनाम्याचीच मागणी उठली होती. त्यातच अजून एक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे हे सुपरस्टार tag मिळालेले जितके खेळाडू आहेत, ते रणजी किंवा इतर स्पर्धा का खेळत नाहीत ? यानंतर BCCI पण जाग झालं. त्यांनी कडक नियम काढले आणि कोहली, रोहितपासून सगळेच खेळाडू रणजीकडे वळले. पण पुढे याचा भारताच्या टेस्ट टीमला फायदा होईल का ? जाणून घेऊ. (Virat Kohali)
जूनमध्ये इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर भारताचा कोच बदलला. राहुल द्रविड यांचं नेतृत्व गौतम गंभीरकडे आलं. पण अशा वेळीही गांभीर्याने खेळायचं सोडून भारताची खेळावरची पकड आणखी ढिली झाली. क्रिकेट एक्स्पर्टस पासून अनेक माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंवर ताशेरे ओढले. हरभजन सिंगने म्हटलं की भारत हा सुपरस्टार कल्चर वाढवणारा देश नाही. इथे सुपरस्टार्सची गरज नाही चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. दुसरीकडे इरफान पठाणनेही भारताचे आजचे प्लेयर्स रणजी किंवा इतर डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा का खेळत नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर २०१३ मध्ये रिटायर्ड झाले आणि २०१३ पर्यंत ते रणजी खेळत होते. विराट कोहलीने शेवटचा रणजी सामना २०१२ ला खेळला होता. त्यामुळे आपल्या खेळाडूंना खेळ सुधारण्यासाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची खूप गरज आहे, असं पठाण म्हणाला. (Virat Kohali)
सुनील गावसकरपासून कपिल देव आणि इतर माजी महान खेळाडूंनीही इंडियन टीमच्या एकूण प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली होती. सगळीकडून एकच सूर येत होता की, भारताच्या खेळाडूंनी डोमेस्टिक स्पर्धा खेळण्याला प्राधान्य द्यायला हवं. यावर बीसीसीआयनेही विचार विनिमय करून एक कडक नियम लावला, तो म्हणजे बीसीसीआयसोबत करार असणाऱ्या सर्व खेळाडूंना आता रणजी स्पर्धा तसेच इतर देशांतर्गत स्पर्धा खेळण कंपल्सरी असणार आहे. यानंतर बीसीसीआयने आणखी एक निर्णय दिला ज्यामुळे खेळाडू आणखीनच गोत्यात सापडले. तो म्हणजे आता कोणीही टूरवर कुटुंबाला घेऊन जाऊ शकणार नाही. जर टूर ४५ किंवा त्याहून अधिक दिवस चालणारी असेल, तर पत्नी किंवा कुटुंब केवळ १४ दिवस खेळाडूसोबत राहू शकतील.(Virat Kohali)
दुसरी गोष्ट म्हणजे आता सर्व खेळाडू दुसऱ्या कोणत्याही वाहनाने प्रवास न करता टीम बसनेच प्रवास करतील. विमान प्रवासादरम्यान कोणत्याही खेळाडूचे वजन १५० किलोपेक्षा जास्त असल्यास बीसीसीआय त्याचे पैसे देणार नाही. खेळाडूला अतिरिक्त पैसे स्वतः एअरलाइन्सला द्यावे लागतील. याशिवाय अजून एक महत्त्वाचा निर्णय बीसीसीआयने दिला तो म्हणजे ‘जसं काम तसच दाम’ ! जर एखाद्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्यांचा पगार कपात केला जाईल. यामुळे खेळाडू अधिक जबाबदारीने खेळतील, असं बोर्डाचं म्हणणं आहे.
==================
हे देखील वाचा : Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?
==================
आता बीसीसीआयने इतक्या नियमांचा भडीमार केल्यानंतर सर्व सिनियर प्लेयर्स वठणीवर आल्याचं चित्र आहे. विराट कोहली तब्बल १२ वर्षांनी रणजी खेळणार आहे. कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात त्याने सेंच्युरी केली, पण त्यानंतर त्याचा फॉर्म पूर्णपणे खालावला. त्याची एकच चूक सारखी दिसून आली. त्यामुळे तो ट्रोलदेखील झाला. म्हणून आता त्याने रणजी खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ३० जानेवारीपासून दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यासाठी त्याने स्वतःला उपलब्ध करून दिलं आहे. तो शेवटची रणजी match त्याने २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध खेळली होती. (Virat Kohali)
दुसरीकडे भारताचा captain रोहित शर्मासुद्धा मुंबई टीममध्ये कम BACK करणार असून ajinkya रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहे. रोहित १० वर्षांनी रणजीच्या मैदानात उतरणार आहे. जम्मू-काश्मीर विरुद्धच्या match मध्ये तो मुंबईचा ओपनिंग BATSMAN म्हणून उतरू शकतो. याशिवाय अनेक करंट टीममध्ये असणारे प्लेयरसुद्धा रणजीसाठी तयार होत आहेत. एकंदरीत बीसीसीआयच्या कडक नियमांमुळे आता सिनियर प्लेयर्सनासुद्धा धडकी भरली असून ते डोमेस्टिक क्रिकेटकडे वळले आहेत. आता पुढच्या महिन्यात champions ट्रॉफी सुद्धा सुरु होणार आहे. त्यामुळे हे प्रिपरेशन प्लेयर्सना या मोठ्या आयसीसी इव्हेंटमध्ये कामी येऊ शकत एवढ नक्की !