Home » का सुरू आहे पीएम मोदी यांच्यावरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन वाद…?

का सुरू आहे पीएम मोदी यांच्यावरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन वाद…?

by Team Gajawaja
0 comment
BBC Documentary on Modi
Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटीश न्यूज एजेंसी बीबीसी कडून बनवण्यात आलेली एक डॉक्युमेंट्री ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ वरुन आता वाद सुरु झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वळण ही घतले आहे. भारत सरकारने या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रिनिंगवर बंदी घातली आहे. तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अन्य काही पक्षांनी प्रश्न उपस्थितीत केले आहेत.(BBC Documentary on Modi)

खरंतर बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीचे दोन भागांची एक सीरिज आहे. ज्यामध्ये २००२ गुजरात मध्ये झालेली दंगल दाखवली गेली आहे. त्यामध्ये त्यावेळीच्या राजकीय स्थितींचे फोटो सुद्धा दाखवण्यात आले आहेत. त्याचसोबत पीएम मोदी यांचा गुजरातचा दौरा ही दाखवला गेला आहे. ब्रिटेनमध्ये या डॉक्युमेंट्रीचा पहिला एपिसोड १७ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये पीएम मोदी यांच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवाती बद्दल दाखवले गेले आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्युमेंट्रीत अधिकांश हिस्सामध्ये पीएम मोदी यांच्या विरोधातील गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत.

BBC Documentary on Modi
BBC Documentary on Modi

डॉक्युमेंट्री मध्ये गुजरात मधील दंगलचा उल्लेख करत पीएम मोदींच्या त्या वेळेच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. या दंगलींमध्ये जवळजवळ २ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. दावा केला गेला आहे की, या डॉक्युमेंट्री मध्ये गुजरातच्या दंगलीची सत्य घटना दाखवण्यात आली आहे.

भारत सरकारने काय म्हटले?
भारत सरकारने या डॉक्युमेंट्रीवर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी डॉक्युमेंट्रीला एक प्रौपेगेंडा पीस म्हटले आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या विधानात असे म्हटले आहे की, डॉक्युमेंट्री एकाच दृष्टीकोनातून दाखवल्यासारखी असल्याने त्याच्या स्क्रिनिंगवर बंदी घातली गेली आहे. तर केंद्र सरकारने डॉक्युमेंट्रीला ट्विटर आणि युट्युब चॅनलच्या माध्यमातून दाखवले जाणारे अकाउंट्स ब्लॉक करण्याचे अपील केले आहे. (BBC Documentary on Modi)

हे देखील वाचा- भारतीय वंशाच्या अरुणा मिलर बनल्या अमेरिकेतीस मैरीलँन्डच्या लेफ्टिनेंट गर्वनर

काँग्रेसने काय म्हटले?
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉक्युमेंट्रीवर घालण्यात आलेल्या बंदीवर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. त्यांनी असे म्हटले की, त्यांच्यावरील बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री निंदनीय आहे. सेंसरशिप लावण्यात आलेली आहे. त्यानंतर पंतप्रधान वाजपेयींना २००२ मध्ये आपले पद का सोडायचे होते? तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी दावा कर असे म्हटले की, पीएम मोदी यांचा खरा चेहरा डॉक्युमेंट्रीत दिसून येत आहे. त्यांनी असे म्हटले की, या प्रकरणी मी केलेले ट्विट ही ट्विटर आणि ट्विट इंडियाने हटवले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.