स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग (Bhagat Singh) यांच्यासाठी भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या कोर्टात अनोखा लढा सुरु आहे. हे वाचून आश्चर्य वाटेल, कारण पाकिस्ताननं आतापर्यंत भारताच्या विरोधातच सर्व काम केलं आहे. मात्र स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांच्यासाठी याच पाकिस्तानच्या कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. भगतसिंग यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. जाती-धर्म यापलीकडे भगतसिंग यांच्या लढ्याचे योगदान असल्याचे सांगून सध्या पाकिस्तानच्या कोर्टात भगतसिंग (Bhagat Singh) यांची याचिका दाखल करण्यात आली. लाहोर उच्च न्यायालयात दाखल असलेल्या या याचिकेवर आक्षेप घेण्यात आला असला तरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या भगतिसंग यांची चर्चा सुरु आहे.
यासंदर्भात लाहोर उच्च न्यायालयात जवळपास दशकापूर्वीपासून याचिका दाखल केली होती. हा खटला पुन्हा सुरू करण्यावर आणि याचिकेच्या सुनावणीसाठी वकिलांच्या खंडपीठाच्या स्थापनेवर लाहोर उच्च न्यायालयानं आक्षेप घेतला. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग (Bhagat Singh) यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक म्हणून भगतसिंग यांचा गौरव होतो. लाहोरमध्ये बर्नी सँडर्सची हत्या आणि नंतर दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ब्रिटीश सरकारने 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग यांना राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह फाशी दिली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली भगतसिंग यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. त्यात या तिनही क्रांतीविरांना फाशीची शिक्षा सुनवण्यात आली. या शिक्षेविरोधात 2013 मध्ये पाकिस्तानमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.
हा खटला पुन्हा सुरू करण्याबाबत आणि पुनरावलोकनाच्या तत्त्वांचे पालन करून भगतसिंग यांची शिक्षा रद्द करण्याची याचिका लाहोर कार्टात दाखल होती. या याचिकेच्या सुनावणीसाठी वकिलांच्या खंडपीठाची स्थापना करण्याची मागणी होती. याप्रकरणी भगतसिंग (Bhagat Singh) मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते वकील इम्तियाज रशीद कुरेशी यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार लाहोर उच्च न्यायालयाने भगतसिंग खटला पुन्हा सुरू करण्याला आणि त्याच्या जलद सुनावणीसाठी वकिलांच्या खंडपीठाची स्थापना करण्यास आक्षेप घेतला आहे.
ही याचिका वकिलांच्या खंडपीठासमोर सुनावणीस घेण्यास सक्षम नसल्याचा आक्षेप न्यायालयाने घेतला आहे. लाहोर कार्टाचे न्यायाधीश शुजात अली खान यांनी 2013 मध्ये हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे, मोठ्या खंडपीठाच्या स्थापनेसाठी. तेव्हापासून ते प्रलंबित आहे. त्यानंतर न्यायमूर्ती शुजात अली खान यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे मोठ्या खंडपीठाच्या स्थापनेसाठी पाठवले होते. तेव्हापासून ही याचिका प्रलंबित आहे. 16 सप्टेंबर रोजी न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाने सुनावणीस घेण्यास पात्र नाही, असे स्पष्ट केले. यावर भगतसिंग (Bhagat Singh) प्रकरण संपले असल्याचे सांगण्यात आले तरी भगतसिंग यांच्या फाशीनंतर पाकिस्तानमध्ये चालवलेल्या या खटल्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान याचिकाकर्त्यांच्या पॅनेलचा भाग असलेले इम्तियाज रशीद कुरेशी यांनी स्पष्ट केले आहे की, ब्रिटीश अधिकारी जॉन सॉंडर्स यांच्या हत्येच्या एफआयआरमध्ये भगतसिंग यांचे नाव नाही. भगतसिंगचा (Bhagat Singh) खटला हाताळणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी या खटल्यातील 450 साक्षीदारांची सुनावणी न घेताच त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. अशा स्थितीत त्यांच्या खटल्याची पुन्हा सुनावणी झाली पाहिजे. मुख्य म्हणजे, दाखल केलेल्या याचिकेत भगतसिंग यांनी संपूर्ण उपखंडाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचे म्हटले आहे. केवळ शीखच नाही तर हिंदू आणि मुस्लिमही त्यांचा आदर करतात. पाकिस्तानचे कायदे-ए-आझम म्हणून उल्लेख होत असलेले मुहम्मद अली जिना यांनीही सेंट्रल असेंब्लीतील भाषणादरम्यान भगतसिंग यांना दोनवेळा आदरांजली वाहिली होती. त्याचाही उल्लेख या खटल्यादरम्यान झाला आहे.
10 जुलै रोजी साँडर्स खून खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्यात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह 14 जणांना मुख्य आरोपी करण्यात आले. 7 ऑक्टोबर 1929 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. या निर्णयावर भगत खूश नव्हते. 20 मार्च 1931 रोजी त्यांनी पंजाबच्या राज्यपालांना पत्र लिहून त्यांना युद्धकैद्याप्रमाणे वागणूक द्यावी आणि फाशी देण्याऐवजी त्यांना गोळ्या घातल्या जाव्यात अशी विनंती केली होती. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7.33 वाजता, फाशीच्या निर्धारित वेळेच्या 12 तास आधी फाशी देण्यात आली. (Bhagat Singh)
==========
हे देखील वाचा : 300 रुपयांची नोकरी ते Jet Airways च्या मालकाचा प्रवास- नरेश गोयल
=========
यावेळी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे इंग्रज अधिका-यांनी तुरुंगाची मागची भिंत फोडून या तिघांचे मृतदेह बाहेर काढले. सतलज नदीच्या काठावर मृतदेह जाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ही बातमी कळल्यावर भगतसिंग यांचे चाहते तिथे पोहचले. जनतेच्या आक्रोश पाहून इंग्रज अर्धे मृतदेह टाकून पळून गेले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर बरोबर 16 वर्षांनंतर, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वांतत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे योगदान मौल्यवान ठरले त्या भगतसिंग (Bhagat Singh) यांच्यासाठी आजही पाकिस्तान सारख्या देशात लढा सुरु आहे, यातच भगतसिंग यांची लोकप्रियता किती आहे, याची कल्पना येते.
सई बने