जगात कधी कधी अशा गोष्टी घडतात की, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. अशा प्रकारच्या घटना आपण पाहतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्या अंगावर काटा उभा राहतो किंवा किळस ही येते. आपण लोकांच्या पोटातून केसांचा गोळा किंवा डिओची बॉटल बाहेर काढल्यासारखी अनेक प्रकरणे पाहिली आहेत. मात्र मुद्दाम अशा गोष्टी करणे कधी कधी जीवावर ही बेतू शकते. याच पार्श्वभूमीवर आयरलँन्ड मधील एका महिलेच्या पोटातून एक-दोन नव्हे तर चक्क ५५ बॅटऱ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. महिलेचे वय तर ६६ वर्ष आहे आणि तिच्यावर आयरलँन्ड मधील सेंट विन्सेंट युनिव्हर्सिटीमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्वात प्रथम डॉक्टरांना सुद्धा माहिती नव्हते की, महिलेच्या पोटात नक्की काय आहे. मात्र जेव्हा एक्स-रे काढण्यात आले तेव्हा ते पाहून डॉक्टर ही चक्रावले.(Batteries in stomach)
खरंतर झाले असे की, महिलेने मुद्दाम ऐवढ्या बॅटऱ्या गिळल्या होत्या. तिला स्वत:ला नुकसान पोहचवायचे होते म्हणून असे केले होते. मात्र जेव्हा तिच्या पोटात खुप दुखायला लागल्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वात प्रथम डॉक्टरांना माहितीच नव्हते की महिलेच्या पोटात काय आहे. त्यासाठी त्यांनी त्याला ‘अननोन सिलिंड्रिकल ऑब्जेक्ट’ असे नाव दिले. त्यानंतर काही चाचण्या आणि स्कॅन ही झाले. तेव्हा कळले की, महिलेच्या पोटात बॅटऱ्या आहेत. यामुळेच महिलेच्या पोटात दुखत आहे.
लाइव्ह सायंन्सच्या मते, सर्वात प्रथम डॉक्टरांनी प्राकृतिक रुपात म्हणजेच गुद्दद्वारच्या माध्यमातून बॅटरी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका आठवड्यात शरिरातून फक्त ५ बॅटऱ्या निघाल्या. पण पोटात दुखणे अधिक वाढू लागले होते. अशातच डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या पोटातून सर्व बॅटऱ्या काढल्या.(Batteries in stomach)
हे देखील वाचा- पिटबुल कुत्रा चावल्याने मुलाला पडले चक्क १२५ टाके, जाणून घ्या या प्रजातीबद्दल अधिक
डॉक्टरांनी असे सांगितले की, आजवर कोणत्याही व्यक्तीच्या शरिरातून सर्जरीच्या माध्यमातून ऐवढ्या बॅटऱ्या काढल्या नव्हत्या.त्याचसोबत असे ही म्हटले की, लहान मुल खेळताना नकळतपणे बॅटरी असो किंवा अन्य काही गोष्टी त्या गिळतात. मात्र त्या शी च्या माध्यमातून बाहेर पडतात. पण महिलेने मुद्दाम बॅटऱ्या गिळल्या आणि हे खरोखरच हैराण करणारे प्रकरण आहे. सध्या महिलेचे प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.