Home » सिरिया-अती तेथे माती !

सिरिया-अती तेथे माती !

by Team Gajawaja
0 comment
Bashar al-Assad
Share

आपल्याच देशातील जनतेवर अन्वनित अत्याचार करणा-या सिरियातील सर्वेसर्वा बशर अल-असादच्या क्रूर राजवटीचा अंत झाला आहे. सिरियाचा हा राष्ट्राध्यक्ष आपल्या कुटुंबासह रशियाला पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र त्याचे विमान अपघातग्रस्त झाल्याची बातमी आली आहे. बशऱ आणि त्याचे कुटुंबिय ज्या विमानात होते त्या विमानात अगदी पाचशे किलोमिटर उंचीच्या अंतरवार काहींनी स्फोट झाल्याचा पाहिला आहे. त्यामुळे बशरचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पण दुसरीकडे बशर अल असादची अत्याचारी राजवट अनुभवलेल्या सिरियाच्या जनतेला मात्र बशरचा हा एक डाव असल्याची शंका येत आहे. गेल्या 50 वर्षात बशर पिता पुत्रांना सिरियावर राज्य केले. पण या राज्य करण्याच्या नावावर जनतेचा विशेषतः महिलांचा छळ केला. त्याची शिक्षाच म्हणून की काय या पिता पुत्रांची सिरियावरील सगळी निशाणी पूसून टाकण्यात येत आहे. (Bashar al-Assad)

सिरियावर ताबा मिळाल्यावर बंडखोर गटांनी आणि त्यांच्या सर्थकांनी बशर यांच्या राजमहलासारख्या घरावर आक्रमण केले आहे. तिथे जी मिळेल ती वस्तू त्यांनी ताब्यात घेतली असून बशर कुटुंबियांचे फोटो आणि मुर्ती फोडण्यास सुरुवात केली आहे. सिरियामधील बशर कुटुबिंयाचा हा अस्त म्हणजे, अती तिथे माती या म्हणीनुसार झाला आहे. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद सीरियातून पळून गेल्याची बातमी आली. सिरियाची राजधानी दिश्कवर बंडखोर गटांनी आपला दावा जाहीर केला आणि बरोबर 11 वर्षापूर्वी लहान मुलांवरील अत्याचाराचा विरोध करण्यापासून सुरु झालेल्या जनआंदोलनाची यशस्वी समाप्ती झाली. आता सीरियात नवे सरकार कसे स्थापन होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण सिरियावर विजय मिळवलेल्या बंडखोर गटांमध्येही एकवाक्यता नाही. त्यातील एक गट आधुनिक विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे, तर दुसरा गट कट्टर मुस्लिम विचारांचा आहे. एका गटाला स्वतंत्र राज्य स्थापित करण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत बशर नंतर सिरियाचे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (International News)

सीरियातील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांनी देश सोडून पळ काढल्याचे जाहीर केले. राजधानी दमास्कवर आपला दावा सांगितला. तर सोडल्यानंतर त्याचे विमान रडारवरून गायब झाले. असद दमास्कसमधून सत्ता हस्तांतरण होईपर्यंत पंतप्रधान जलाली हे काम पाहतील, असे बंडखोर गटांनी जाहीर केले. यासोबत बशर अल -असद हे आता सीरियात इतिहासाचे एक पान झाल्याचे जाहीर झाले. वास्तविक जगापुढे सिरियाचा हा लढा अवघा 11 दिवसांचा लढा आहे, असे चित्र उभे राहिले. मात्र गेल्या 13 वर्षापूर्वी सुरु झालेल्या या लढ्याची पानं बाहेर आल्यावर बशर अल-असाद यांनी केलेल्या अत्याचारांनी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या संघर्षाच सुमारे 5 लाख लोकांनी प्राण गमावले असून सुमारे 4 लाख लोक विस्थापित झाले आहेत. बशर अल-असदने 2000 मध्ये वडील हाफेज अल-असाद यांच्यानंतर सीरियाची कमान हाती घेतली. 1950-60 च्या गृहयुद्धानंतर हाफेज अल-असद यांनीही अशाच प्रकारे सिरियाची सत्ता हस्तगत केली होती. असद कुटुंबाने 1971 ते 2024 पर्यंत सीरियावर राज्य केले. 1971 पासून, सीरियावर बाथ पार्टीचे राज्य होते. या पक्षाची स्थापन बशर अल-असद यांच्या वडिलांनी केली होती. हुकुमशाही राज्यशासनाच्या विरोधात स्थापना झालेला हा पक्ष नंतर हुकुमशाही शासनाचे प्रतिक झाला. (Bashar al-Assad)

आता होम्स या संघटनेनं त्यांचा पाडाव करुन सिरियाची सत्ता हाती घेतली. बशीर यांच्या हाती सत्ता आल्यावर ते आपल्या वडिलांपेक्षा वेगळ्या वाटेनं जातील अशी अपेक्षा होती. मात्र जनतेवर छळ कऱण्यासाठी बशर हे आपल्या वडिलांच्या एक पाऊल पुढे निघाले. आपल्याच जनतेवर केमिकल बॉम्बचा मारा करणारा राष्ट्राध्यक्ष ठरले. त्यांच्या या अत्याचारी शासनाविरुद्ध शालेय विद्यार्थ्यांनी केलेली टिपण्णी ही आत्ताच्या सत्तांतराला कारणीभूत ठरली. विद्यार्थ्यांनी बशर यांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्यावरुन बशर यांच्या सैनिकांनी या विद्यार्थ्यांना अटक केली. वय वर्ष अकरा ते पंधरा वयोगटातील या विद्यार्थ्यांच्या हाता-पायची नखंही काढण्यात आली. त्यांच्या शरीरावर वार करण्यात आले. या विरोधात या मुलांच्या पालकांनी आंदोलन उभारले. सुरुवातीला एका शहरापासून सुरु झालेले हे आंदोलन बशर यांच्या विरोधात दहा शहरांमध्ये सुरु झाले. नंतर बशर यांनी या लहानग्यांना तुरुंगाबाहेर सोडले. मात्र त्यांची अवस्था पाहून पालकांचा आक्रोश सुरु झाला आणि अवघ्या देशभर बशर यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे सिरियाची जनता रस्त्यावर आली. अशावेळी बशर यांनी आत्मघातकी निर्णय घेतला. (International News)

========

हे देखील वाचा : देवा ! पुन्हा वेंगाबाबा

========

त्यांनी सैन्याला जनतेवर अत्याचार कऱण्याचे आदेश दिले. अगदी रणगाडेही जनतेवर चालवण्यात आले. यात जखमी झालेल्या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पोलीस अटक करत होते, आणि तुरुंगात डांबून त्यांच्यावर सैन्याकडून अत्याचार करण्यात आले. गेल्या 13 वर्षात सिरियात सुरु असलेल्या या अत्याचाराच्या चक्राला बशर अल-असद यांच्या पतनानं थांबवण्यात आले. बशर अल-असद हे गेल्या 24 वर्षांपासून सीरियावर राज्य करत होते. सीरियात त्यांना वारसाहक्काने सत्ता मिळाली होती. त्यांच्या आधी त्याचे वडील अल-असद हाफेझ यांनी 29 वर्षे सीरियावर राज्य केले. या काळात त्यांनी कधीही आपल्या जनतेचा विचार केला नाही. उलट महिलांना अधिक मुलांना जन्म द्या अन्यथा त्यांना आमच्या सैन्याच्या ताब्यात देण्यात य़ेईल, अशा शब्दात धमकवणा-या या बशर कुटुंबाचा आता अंत झाला आहे. कालांतरानं या कुटुंबानं सिरियावर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या समोर येणार आहेत. (Bashar al-Assad)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.