डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी जोरदार परिश्रम घेतले. ट्रम्प यांच्या पक्षासह त्यांचे पूर्ण कुटुंब या प्रचारात सहभागी झाले होते. अमेरिकेमध्ये ट्रम्प कुटुंब व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. मनोरंजन, राजकारण आणि रिअल इस्टेटमध्ये या कुटुंबाचा दबदबा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुस-यांदा निवडणूक लढवणारे ट्रम्प यावेळी अधिक विश्वासानं आपला लढा देत होते. यासर्वात त्यांच्यावर झालेले हल्ले, त्यांच्यावरील खटलेही अधिक गाजले. मात्र या सर्वांनी ट्रम्प यांची विजययात्रा अधिक सुकर केली. ट्रम्प यांचे वयही वादात सापडले होते. 78 वर्षाचे ट्रम्प तरुण मतदारांना आकर्षित करु शकणार नाहीत, असा दावा सुरुवातीला करण्यात आला. मात्र ट्रम्प यांच्यावरील हा दावा साफ फोल ठरला. मतदानाच्या टक्केवारीवरुन ट्रम्प यांना सर्वाधिक तरुणांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांचे श्रेय गेले ते त्यांच्या सर्वात लहान मुलाला. 18 वर्षाचा ट्रम्प यांचा मुलगा बॅरन हा आपल्या वडिलांच्या विजयात सर्वाधिक मोठा वाटेकरी ठरला आहे. (Barron Trump)
डोनाल्ड ट्रम्प, आणि त्यांची तिसरी पत्नी मेलानिया यांचा मुलगा बॅरन ट्रम्प सध्या अमेरिकेतील तरुणपिढीमध्ये सर्वाधिक चहेता ठरला आहे. सहा फूट सात इंच उंचीचा बॅरन जिथे जातो, तिथे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या निवडणुकीत बॅरन आपल्या वडिलांच्या मागे सावलीसारखा वावरला. ट्रम्प यांना पाच मुले आणि दहा नातवंडे आहेत. पण या पाच मुलांमधील बॅरन ट्रम्प हा सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे. एकतर त्याची उंची आणि त्याचा लूक हा त्याचा सर्वात हीट पॉईंट ठरला आहे. बॅरनचा जन्म 20 मार्ज 2006 रोजी झाला आहे. बॅरनची आई मेलानिया ही एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखली जाते. मेलानिया आणि तिचे कुटुंब स्लोव्हेनियामधून अमेरिकेत आले आहे. त्यामुळे बॅरन अस्खलित स्लोव्हेनियन बोलतो. मेलानिया आणि ट्रम्प यांचा विवाह झाला तेव्हा मेलानियानं ट्रम्प यांच्याकडून मोठी नियमावलीच करुन सह्या घेतल्या होत्या. त्यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे, ट्रम्प यांच्यापासून मेलानिया हिला कुठलेही मुल नको होते. मॉडेल असलेल्या मेलानियाला ट्रम्प यांच्याबरोबर लग्न झाल्यावर दिवस राहिल्यावर मोठा गदारोळ झाला होता. मेलानिया अँबॉर्शन करणार अशा बातम्याही उठल्या. मात्र अमेरिकन उच्चभ्रू समाजात अँबॉर्शन करणे प्रतिष्ठित मानले जात नाही, हे जाणून मेलानियानं बॅरनला जन्म दिला. तेव्हापासून हा बॅरन गोल्डन स्पून बॉय म्हणून प्रसिद्ध झाला. (International News)
डोनाल्ड ट्रम्प यांची नात बॅरन याच्यापासून काही वर्षानं लहान आहे. बॅरनचे बालपण न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये गेले. ट्रम्प टॉवर पेंटहाऊस अपार्टमेंटचा संपूर्ण मजल्याची किंमत अंदाजे $100 दशलक्ष एवढी आहे. बॅरनला खेळण्यासाठी मिनी मर्सिडीज-बेंझची एक रांगच उभी असायची. डोनाल्ड ट्रम्प यांचाही बॅरन लाडका आहे. कारण त्याचा लूक हुबेहुब डोनाल्ड यांच्यासारखाच आहे. शिवाय बॅरनच्या जन्मापासून डोनाल्ड यांचा एक स्वप्न सत्यात उतरले. उद्योगपती असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची ओढ होती. अनेकवेळा त्यांनी आपल्या मित्रमंडळीमंध्ये ही गोष्ट बोलून दाखवली होती. बॅरनच्या जन्मापासून ट्रम्प राजकारणात सक्रीय झाले आणि राष्ट्राध्यक्षही झाले. मेलानिया फर्स्ट लेडी झाली आणि बॅरनसह ते व्हाईट हाऊसमध्ये आले. तेव्हा बॅरन दहा-बारावर्षाचा होता. मॅनहॅटनमधील कोलंबिया ग्रामर अँड प्रिपरेटरी स्कूलमध्ये शिकत असलेल्या बॅरनला तीन शाळा बदलाव्या लागल्या. 2017 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये राहतांना बॅरनला कॅमे-यापासून मुद्दामहून दूर ठेवण्यात आले. मेलानिया आणि तिच्या आईवडिलांकडे त्याच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी होती. त्यामुळेच बॅरन इंग्रजीसोबत स्लोव्हेन भाषाही सराईतासारखी बोलतो. याशिवाय त्याचा चीनच्या मॅंडरीनचाही अभ्यास आहे. (Barron Trump)
2016 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीची तयारी करणा-या ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान बॅरन केवळ तीनवेळा आपल्या वडिलांसोबत दिसला. प्रचारादरम्यान एका भाषणात ट्रम्पनी त्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी दहा वर्षाचा असलेला बॅरन हा संगणकामध्ये अविश्वनीय प्रगत असल्याचे ट्रम्प यांनी अभिमानानं सांगितले होते. पण आताच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती आणखी बदलली आहे. तेव्हाचा अवघ्या दहा वर्षाचा बॅरन आता 18 वर्षाचा आणि 6 फूट 7 इंचाचा झाला. अतिशय प्रगल्भ असलेला बॅरन वडिलांच्या प्रचार मोहिमेच्या टीमचा महत्त्वाचा सदस्य झाला. आपल्या वडिलांसोबत एखाद्या सावलीसारखा तो वावरला. अगदी त्यांच्या भाषणाचा मसुदा आधी वाचण्यापासून ते वडिलांच्या लूकबाबतही बॅरनचा सल्ला महत्त्वाचा असायचा. या सर्वातून बॅरनच्या फॅन फॉलोअर प्रचंड वाढला. प्रचार कार्यक्रमांचे नियोजन, मीडिया ब्रीफिंग्स आणि पॉडकास्टसाठी बॅरनने घेतलेले परिश्रम म्हणजेच, सुरुवातीला अध्यक्षीय निवडणुकीत मागे असणारे डोनाल्ड ट्रम्प अपेक्षित विजयापेक्षा अधिक जागांनी निवडून आले आहेत. बॅरनचा स्वभाव हा सौम्य आणि अभ्यासू आहे. त्याचे ट्रम्प कुटुंबासोबत सलोख्याचे संबंध आहेत. अगदी आपल्या सावत्र बहिण भावांसोबतही बॅरनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. (International News)
======
हे देखील वाचा : टीव्ही होस्ट ते संरक्षण मंत्री
====
ट्रम्प कुटुंबियांच्या आवडत्या बेसबॉलमध्ये तो चॅम्पियन आहे. बॅरन हा प्रचारात एवढा गाजला की कमला हॅरिस आणि त्यांच्या टिमला त्याच्यावरही टिका करण्यासाठी मुद्दे शोधावे लागले. त्यात त्याचा नागरिकत्वाचा मुद्दा आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याची योजना जाहीर केल्यावर त्यांनी बॅरन ट्रम्पला पहिले बाहेर काढावे असा सल्ला विरोधकांकडून देण्यात आला होता. मात्र तो मुद्दाही नंतर मोडीत निघालाच शिवाय बॅरनच्या प्रसिद्धीत अधिक भर घालून गेला. आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न बिझनेस स्कूलमध्ये शिकत असलेला बॅरन पुन्हा वडिलांसोबत व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणा-या बॅरनचा 2044 मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. ट्रम्प कुटुंबाचा राजकीय वारसा बॅरन चालवणार अशा चर्चा आत्तापासूनच सुरु झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बॅरननं केलेलं भाषण हे त्याच्या संभाव्य राजकीय प्रवेशाचे सूतोवाच करणारे ठरले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पाचवा मुलगा भविष्यात नक्कीच मोठी जबाबदारी पार पाडणार आहे. (Barron Trump)
सई बने