Barefoot Walking Benefits : शरीर आणि मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी हल्ली अनेकजण योगा, व्यायाम, मेडिटेशन यांचा आधार घेतात. मात्र, याशिवाय एक सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे दररोज ३० मिनिटे अनवाणी चालणे (Barefoot Walking). विशेषतः सकाळी गवतावर, वाळूवर किंवा मातीवर चालल्यास याचे शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. हे एक प्रकारचे नैसर्गिक थेरेपी मानले जाते, ज्याला “ग्राउंडिंग” किंवा “अर्थिंग” असेही म्हणतात.
अनवाणी चालताना आपले पाय थेट पृथ्वीच्या पृष्ठभागाला स्पर्श करतात. यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक इलेक्ट्रॉन्स शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे शरीरातील दाहक प्रक्रिया कमी होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि तणावही कमी होतो. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा सांधेदुखी असणाऱ्या लोकांसाठी अनवाणी चालणे फायदेशीर ठरते. पायाच्या तळव्याखाली असणाऱ्या विविध प्रेशर पॉईंट्सवर दाब पडल्याने शरीराच्या इतर भागांनाही अप्रत्यक्ष मसाज मिळतो, ज्यामुळे शरीर अधिक सक्रिय आणि ताजेतवाने वाटते.

Barefoot walking
तणाव आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही अनवाणी चालण्याचे फायदे मोठे आहेत. सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात, विशेषतः हिरवळीत चालल्याने मन प्रसन्न होते, झोप सुधारते आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. यामध्ये थेट मेंदूवर परिणाम करणारे सजीव वातावरण, ताजं हवेचं सेवन, सूर्यप्रकाश यांचा मोठा वाटा असतो. यामुळे मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामिन हे “हॅपी हार्मोन्स” सुद्धा स्रवतात, जे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.(Barefoot Walking Benefits)
==========
हे देखील वाचा :
Health Care : उपाशी पोटी गोड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?
Health : भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे
Coconut Water : आरोग्याच्या दृष्टीने अमृतासमान आहे नारळ पाणी
============
तर, नियमित ३० मिनिटे अनवाणी चालल्याने पायांच्या स्नायूंना बळकटी मिळते, पोस्चर सुधारते आणि पाठीच्या कण्यावर ताण कमी होतो. यामुळे पायाचे बोट, टाच आणि टाचेखालचा भाग अधिक लवचिक आणि मजबूत होतो. मात्र, हे करताना योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची आहे. तुटलेल्या काच, काटे किंवा धूळ-गर्दीच्या ठिकाणी न चालता स्वच्छ, मऊ गवत किंवा वाळूत चालणे उत्तम.नियमित अनवाणी चालण्याची सवय केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फार महत्वाचे मानले जाते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics