Home » America : बराक, मिशेल आणि ती..

America : बराक, मिशेल आणि ती..

by Team Gajawaja
0 comment
America
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हापासून सोशल मिडिया फक्त त्यांच्याच बातमीनं भरुन गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचीच चर्चा होत आहे. अर्थातच ते सूपरपॉवर असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. पण यासोबत आणखी एक राष्ट्राध्यक्ष चर्चेत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याही बातम्यांनी सोशल मिडियावर गर्दी केली आहे. बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यात दुरावा आल्याची बातमी सर्वाधिक चर्चेत आहे. मिशेल यांना बराक यांचा बॅक बोन मानण्यात येते. मात्र याच मिशले गेल्या काही महिन्यापासून बराक यांच्यापासून दूर जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यासंबंधीच्या बातम्या सुरु झाल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेत असतांना माजी अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी या परंपरेनुसार उपस्थित रहातात. पण मिशेल यांनी हे आमंत्रणही नाकारले आणि बराक एकटेक या सोहळ्याला दिसले, तेव्हा मात्र त्यांच्यातील दुराव्याची बातमी पुन्हा चर्चेत आली. शिवाय या दुराव्यासाठी एक अभिनेत्री कारणीभूत असल्याचीही बातमी आली. आता या अभिनेत्रीचे नावही उघड झाले आहे. (America)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन यांचे प्रेमप्रकरण चालू असल्याची बातमी अमेरिकन सोशल मिडियात सर्वाधिक चर्चेत आहे. यामुळेच बराक आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यात दुरावा झाल्याचीही माहिती आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांच्या शोकसभेच्यावेळी बराक आणि मिशेल यांच्यातील दुराव्याची बातमी पहिल्यांदा पुढे आली. या शोकसभेला बराक एकटेच आले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीलाही बराक एकटेच दिसल्यामुळे बराक आणि मिशेल यांच्यातील दुराव्याला सबळ पुरावा मिळाला. वास्तविक बराक आणि मिशेल यांना आदर्श पतीपत्नी मानले जाते. बराक राजकारणात आले ते मिशेल यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच. मिशेल ओबामा यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून डॉक्टरेट मिळवली आहे. शिकागोमधील सिडली अँड ऑस्टिनच्या कॉर्पोरेट-लॉ फर्ममध्ये त्यांची आणि बराक ओबामा यांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. बराक ओबामा आणि मिशेल रॉबिन्सन यांनी 1992 मध्ये लग्न झाले. (International News)

या दाम्पत्याला मालिया आणि साशा या दोन मुलीही आहेत. बराक ओबामा राजकारणात सक्रीय असले तरी मिशेल यांचीही स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी शिकागो विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या असोसिएट डीन म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. एक लेखिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. अमेरिकेतील शाळांमध्ये देण्यात येणा-या आहाराबाबत त्यांनी जागरुकता निर्माण करण्याचे काम केले आहे. मिशेल ओबामा या राजकारणात सक्रीय होणार अशाही बातम्या होत्या. मात्र आता त्याच मिशेल ओबामा या बराक ओबामा यांच्यापासून वेगळ्या होत असल्याची बातमी आल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाल्यापासून बराक यांच्या पत्नी मिशेल यांची कुठलीच खबरबात नसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बराक आणि जेनिफर अॅनिस्टन गेल्या काही महिन्यापासून एकमेकांना डेट करत असल्याची बातमी पुढे आली आहे. (America)

================

हे देखील वाचा :  Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा

Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब

===============

बराक आणि जेनिफर यांना पार्टीमध्येही एकत्र बघण्यात आले आहे. जेनिफरला एका कार्यक्रमातही बराक यांच्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. शिवाय गेल्यावर्षी एका मासिकामध्येही ‘द ट्रुथ अबाउट जेन अँड बराक!’ अशा नावाची स्टोरी छापण्यात आली होती. त्यात बराक आणि जेनिफर यांच्या प्रेमप्रकरणाची बातमी होतीच शिवाय बराक आणि मिशेल ओबामा यांच्यात घटस्फोट होत असल्याचीही बातमी आहे. मात्र या बातमीवर या तिघांनीही कुठलेही मत व्यक्त केले नाही. मात्र अलिकडे जेनिफरनं आपण बराक यांच्यापेक्षा मिशेलला अधिक चांगले ओळखत असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय अशा बातम्यांना मी महत्व देत नसल्याचेही तिनं सांगितले आहे. जेनिफर बाबत प्रेमप्रकरणाच्या बातम्या नित्यनियमानं येत असतात. अनेक हॉलिवूड अभिनेत्यांसोबर तिचे नाव जोडले गेले आहे. आता तिचे नाव बराक ओबामा यांच्याशी जोडले गेले आहे. जेनिफरनं हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट, जस्टिन थेरॉक्स यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षातच तिनं घटस्फोट घेत हे नातं संपवलं आहे. आता हिच जेनिफर आणि बराक लग्न करत असल्याची माहिती आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.