अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधी समारंभासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. हा समारंभ शाही करण्यात येणार असून यासाठी देशविदेशातील नेत्यांना आमंत्रण करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या शाही समारंभासाठी अवघे काही तास शिल्लक असतांना सर्वत्र त्यांचीच चर्चा व्हायला हवी. मात्र अमेरिकेत सध्या माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याबद्दल चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष असलेले बराक ओबामा आणि त्यांची वकिल पत्नी मिशेल ओबामा हे आदर्श जोडपं म्हणून ओळखण्यात येत होतं. आता या दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या येत आहेत. (America)
या दुराव्यामुळेच मिशेल यांनी बराक यांच्यासोबत सर्वच समारंभात जायला नकार दिला आहे. त्या ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापासूनही दूर रहाणार असल्याची बातमी आहे. काही दिवसातच हे लोकप्रिय जोडपं घटस्फोट घेणार असल्याचीही बातमी आहे. यामुळे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीची चर्चा होण्याऐवजी बराक आणि मिशेल यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी अवघे काही तास बाकी आहेत. अशात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा घटस्फोट होत असल्याची बातमी पुढे आली आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देण्यात येणा-या आंत्रणावरुन ही बाब सिद्ध झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. या समारंभाला ओबामा दांम्पत्याला आमंत्रण देण्यात आले. त्यापैकी मिशेल यांनी समारंभाला उपस्थिती लावण्यासाठी नकार दिला आहे. तर बराक हे या समारंभाला उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे. (International News)
अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून मिशेल ओबामा या सर्वांच्या लक्षात राहिल्या आहेत. नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष शपथ घेतांना माजी राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी उपस्थित रहाणे हा एक नियमांचा भाग आहे. आत्तापर्यंत बराक यांच्यासोबत प्रत्येक सोहळ्याला उपस्थिती लावणा-या मिशेल अलिकडच्या वर्षात बराक यांच्यापासून दूर होत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्कारालाही त्या अनुपस्थित होत्या. त्यामुळेच अमेरिकेत मिशेल ओबामा या घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बराक ओबामा 20 जानेवारी 2009 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा व्हाईट हाऊसमध्ये आल्यावर त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या चर्चेत आल्या. या दोघांनाही जादुई जोडपे म्हणून ओळख मिळाली. या दोघांची पहिली भेट एका लॉ फर्ममध्ये झाली. त्यानंतर 2 वर्षांनी, 1992 मध्ये बराक आणि मिशेल यांचा विवाह झाला. (America)
ओबामा दाम्पत्याला मलेया आणि साशा या दोन मुलीही आहेत. बराक ओबामा यांचा बॅकबोन अशी मिशेल यांची ओळख आहे. कारण राजकारणात त्यांनी जावे आणि निवडणूक लढवावा यासाठी मिशेल यांनीच त्यांना प्रोत्साहित केले होते. मिशेल या तेव्हा लॉ प्रॅक्टीस करत होत्या. त्यांनी आपलं करिअर, आणि दोन मुलींचा सांभाळ करत, बराक यांना राजकारणातील लढ्यासाठी पाठिंबा दिला. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर आपल्या पहिल्या भाषणातही बराक यांनी मिशेल यांच्या भक्कम पाठींब्याचा उल्लेख करत, माझी शक्ती म्हणून मिशेल यांचा गौरव केला. यानंतर बराक यांच्या प्रत्येक परदेश दौ-यामध्ये मिशेल यांचा सहभाग होता. मिशेल या वकिल म्हणून जेवढ्या प्रसिद्ध आहेत, तेवढ्याच स्वतंत्र विचाराची महिला म्हणूनही त्यांची ओळख आहे. राष्ट्राध्यक्षपदी असतांनाही बराक यांनी कुटुंबासाठी ठराविक वेळ दिला नाही, तर त्या सहजपणे नाराजी व्यक्त करीत असत. त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आत्मचरित्रात, बराक त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील तणावाबाबत त्यांनी उल्लेख केला आहे. (International News)
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
SaifAliKhan : आधी शाहरुखच्या घराची रेकी, मग सैफवर हल्ला आरोपीने प्लॅन करून गेम केलाय?
=============
त्यातील “असे काही वेळा होते जेव्हा मला बराक यांना खिडकीतून बाहेर ढकलून द्यावेसे वाटायचे,” हे वाक्य त्यांच्या नात्याबद्दल बरच काही बोलून जातं. मिशेल या अमेरिकेच्या निवडणुकीदरम्यानही चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली. मात्र तेव्हा जो बिडेन यांच्या नावाला अधिक पसंती मिळाली, आणि मिशेल यांचे नाव मागे पडले. हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केलेल्या आणि शिक्षणादरम्यान विद्यार्थी राजकारणात सक्रिय असलेल्या मिशेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या असत्या तर त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या असत्या. मात्र जो बिडेन यांच्या मागून बराक यांनीच राष्ट्रध्यक्षपदाचा कारभार चालवल्याची माहिती आहे. जर मिशेल या पदावर बसल्या असत्या तर त्यांनी बराक यांना ही सूट दिली नसती, अशी चर्चा आहे. त्यामुळेच बराक यांनी मिशेल यांचे नाव काढून बिडेन यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. त्यातूनच या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची माहिती आहे. (America)
सई बने