चीनचे अरबपती बेपत्ता होण्याची प्रकरणे थांबतच नाही आहेत. २ वर्षांपूर्वी अलीबाबाचे फाउंडर जॅकमा बेपत्ता झाले होते आणि त्यांचा सरकारकडून शोध घेतला जात होता. अशातच आता हाय प्रोफाइल बँकर बाओ फॅन बेपत्ता झाले आहेत. ते बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्याच कंपनीकडून दिली गेली आहे. (Bao Fan Goes Missing)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या सरकारच्या विरोधात जो आवाज उठतो तो गायब होतो. असाच काहीसा अंदाज लावला जात आहे की, बाओ फॅन यांच्या बेपत्ता होण्यामागे शी जिनपिंग सरकारचा हात आहे. चीन सरकार देशातील फायनान्स इंडस्ट्रीवरील पेच नव्याने घट्ट करण्याच्या तयारीत आहे. बाओ यांची कंपनी चाइना रेनेसां होल्डिंग्स लिमिडेटने असे म्हटले की, गेल्या दोन दशकातील सर्वाधिक यशस्वी बँकरसोबत त्यांचा संपर्क होऊ शकत नाही.
शेअर बाजारात उडाली खळबळ
बाओ फॅन यांच्या बेपत्ता झाल्याने शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. ते बेपत्ता झाल्याची बातमी जेव्हा सार्वजनिक झाली तेव्हा कंपनीचे शेअर्स ५० टक्क्यांनी खाली घसरले गेले. चाइना रेनेसां यांनी गेल्या दशकात चीनच्या इंटरनेट तंत्रज्ञानाच्या जगातक एक महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे. हाँककाँगच्या सुरुवातीच्या व्यावसायात चाइना रेनेसांच्या शेअर्सची किंमत ५० टक्क्यांनी खाली आळी होती.
सरकार करत होता तपास
बाओ यांनी २००५ मध्ये बुटिक अॅडवायजरी इन्वेस्टमेंट फर्मच्या रुपात चाइना रेनेसाची स्थापना केली होती. तेव्हापासून चीन सर्वाधिक टॉप फिनकेटक ऑर्गेनाइजेशनपैकी एक आहे. ही कंपनी देशातील काही तंत्रज्ञान कंपन्यांदरम्यान बिझनेस डील्स करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाओ यांच्या कंपनीतील प्रेसिडेंट कोंग लिन यांची एका भ्रष्टाचार संबंधित गेल्या महिन्यापासून चौकशी केली जात होती. (Bao Fan Goes Missing)
हे देखील वाचा- LTTE प्रमुख प्रभाकरन अद्याप जीवंत असल्याचा दावा
अशा प्रकारे बेपत्ता झाले होते जॅकमा
चीनच्या शासकीय तपासात सहभागी झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे आवाक्याबाहेर असणे सामान्य आहे. त्यामुळे बाओ हे बेपत्ता झाल्याने देशातील फाइनान्स इंडस्ट्रीमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत नाही.अशाच प्रकारे काही काळापूर्वी चीनचे अरबपती व्यावसायिक आणि अलीबाबाचे फाउंडर जॅक मा सुद्धा बेपत्ता झाले होते. टॉप टेक फाइनेंसर हे बाओ यांच्या सर्व फिल्ड्ससोबत संबंधात आहेत. तसेच काही चीनमधील सर्वाधिक बड्या कंपन्यांसाठी बँकरचे ते काम करतात. तर बाओ फॅन यांचे Alibaba, Tencent सारख्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत उत्तम संबंध आहेत. यापूर्वी त्यांनी Credit Suisse आणि Morgan Stanley सारख्या प्रतिष्ठीत कंपन्यांमध्ये सुद्धा काम केले आहे.