जगात असे काही देश आहेत जेथे मस्जिद नाही. ते उभारण्यासाठी मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. पण सरकार त्यासाठी परवानगी देत नाहीय. योगायोगाने असे दोन देश जे नवे देश आहेत. एक म्हणजे स्लोवाकिया जो चेकोस्लोवाकिया पासून विभक्त होऊन निर्माण झाला आहे. तर दुसरा इस्तोनिया, दरम्यान ही बाब योग्य नाही की तेथील राहणाऱ्या मुस्लिम लोकांची संख्या अत्यंत कमी आहे. अशातच तेथील लोक एखाद्या फ्लॅट किंव कल्चर सेंटरमध्ये नमाज अदा करताना दिसतात.(Banned for masjid)
इस्तोनिया मध्ये मुस्लिम लोकसंख्या फार कमी आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार तेथे तेव्हा १५०८ मुस्लिम लोक राहायची, म्हणजेच तेथील लोकसंख्या केवळ ०.१४ टक्के होती. दरम्यान, निश्चित रुपात आतापर्यंत यामध्ये वाढ झाली असेल मात्र तरीही लोकसंख्या ही कमीच आहे.
येथे कोणतेही मस्जिद नाही. अलबत्ता एक इस्लामिक कल्चर सेंटर जरुर आहे. पण तेथे सर्वसामान्यपणे मुस्लिम नमाज अदा करण्यासाठी एकत्रित येतात. येथे सुन्नी तातार आणि शिया अजेरी मुस्लिम राहतात, जे एकेकाळी रशियातील सैन्यात नोकरी करायचे. एस्तोनिया मध्ये काही ठिकाणी लोक नमाज अदा करण्यासाठी कॉमन फ्लॅट मध्ये एकत्रित येतात. येथे सुन्नी आणि शिया एकत्रित नमाज अदा करतात. येथील मुस्लिमांना माडरेट मानले जाते.
इस्तोनियाचे विलय १९४० च्या आसपास सोवित संघात झाला होता. जेव्हा सोवियत संघ तुटला तेव्हा त्यांनी १९९१ मध्ये स्वत:ला वेगळा देश म्हणून जाहीर केले. आता तो युरोपीय युनियनचा सदस्य आहे.
मस्जिदीसंदर्भात वाद होतो
स्लोवाकिया युरोपीय युनियनचा सदस्य जरुर आहे पण तो असा एक देश आहे जो सर्वाधिक अखेरीस याचा सदस्य झाला होता. येथे कोणतेही मस्जिद नाही. या संदर्भात वाद ही होत राहिला. वर्ष २००० मध्ये स्लोवाकियाची राजधानी इस्लामिक सेंटर बनवण्यावरुन सुद्धा वाद झाला. ब्रातिसिओवाच्या महापौरांनी स्लोवाक इस्लामिक वक्फ फाउंडेशनच्या अशा काही प्रस्तावाला फेटाळून लावले.
इस्लाम धर्माला अधिकृत धर्माचा दर्जा नाही
३० नोव्हेंबर २०१६ मध्ये स्लोवाकिया मध्ये एक कायदा पारित झाल्यानंतर इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देण्यावर बंदी घातली गेली. म्हणजेच इस्लाम धर्म स्लोवाकियामध्ये एक धर्म म्हणून स्विकार केला गेला नाही.(Banned for masjid)
हे देखील वाचा- सौदी अरेबियात व्यक्तीचे शीर तलवारीने कापून दिली जाते मृत्यूची शिक्षा
नेहमीच सर्वांना ओळखपत्र सोबत ठेवावे लागते
स्लोवाकिया मध्ये काही नियम आणि कायद्यांचे नेहमीच पालन करावे लागते. खरंतर येथे प्रत्येकाला आपले ओळखपत्र सोबत ठेवावे लागते. जर तुम्ही स्लोवाकिया मध्ये फिरण्यासाठी जातात तर तुम्हाला नेहमीच पासपोर्ट सोबत ठेवावा लागतो.
येथे कोणीही आवाज करु शकत नाही
स्लोवाकिया मध्ये ध्वनि प्रदुषणापासून दूर राहण्यासाठी एक कठोर कायदा तयार करण्यात आलेला आहे. येथे तुम्हा सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत तुम्ही आवाज करु शकत नाही. अन्यथा तुम्हाला पोलिस पकडून घेऊन जाऊ शकतात. त्याचसोबत दंडात्मक कारवाई ही केली जाते.