31
बँका हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.त्यामुळे ज्या दिवशी बँका बंद असतात, त्या दिवशी जेवढा फटका सर्वसामान्यांना बसतो, तितकाच फटका विशेष लोकांनाही बसतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन सेवा चोवीस तास असल्याने लोकांना बँकांमध्ये रांगेत उभे राहण्यापासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे सरकारी आणि बिगर सरकारी बँकांच्या सुट्ट्यांचा निर्णय आरबीआय घेते. खात्यातून पैसे काढणे, पैसे जमा करणे, जुन्या नोटा बदलणे अशा गोष्टींसाठी आपल्याला बँकेत जावे लागते. जर तुम्हालाही ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असतील तर या महिन्याची बँकची सुट्टीची यादी पाहून बँकेच्या कामासाठी निघा.कारण ऑगस्टमध्ये देशभरात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑगस्ट 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. अशा वेळी कोणत्याही कामानिमित्त शाखेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जरूर तपासून पाहिली तर बरे होईल. आरबीआयच्या या यादीनुसार एप्रिल 2023 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. (Bank Holidays in August 2023)
यामध्ये सण किंवा तत्सम इतर खास प्रसंगी सुट्ट्या तसेच वीकेंडच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. या राज्यांच्या स्वत:च्या अधिकृत सुट्ट्या आहेत, पण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.हल्ली बँकिंगची बहुतांश कामे घरी बसून केली जातात, पण तरीही अनेक कामांसाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. अशा वेळी बँकांच्या सुट्ट्यांची माहिती घेणे गरजेचे आहे, जेणेकरून गैरसोय टाळता येईल. जाणून घेऊया ऑगस्ट 2023 मध्ये कोणत्या राज्यातील बँका कधी बंद राहतील? त्यामुळे पुढील महिन्यातील सुट्ट्यांच्या यादीनुसार आपण आपल्या बँकेशी संबंधित कामे निकाली काढावीत, जेणेकरून अनावश्यक अडचणी टाळता येतील.
ऑगस्टमध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी
6 ऑगस्ट 2023 : रविवार असल्याने संपूर्ण देशात सुट्टी असणार आहे.
8 ऑगस्ट 2023 : Tendong Lho Rum Faat, सिक्किम मध्ये बॅंक बंद राहतील.
12 ऑगस्ट 2023: दुसऱ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार
13 ऑगस्ट 2023: रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार
15 ऑगस्ट 2023: स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
16 ऑगस्ट 2023 : पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
18 ऑगस्ट 2023 : श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2023 : देशभरातील बँका रविवारी बंद राहणार आहेत.
26 ऑगस्ट 2023 : चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार
27 ऑगस्ट 2023 – देशभरातील बँका रविवारी बंद राहणार
28 ऑगस्ट 2023 : पहिल्या ओणममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
29 ऑगस्ट 2023 – तिरुओनममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकांना सुट्टी
30 ऑगस्ट – रक्षाबंधनामुळे जयपूर आणि शिमलामध्ये बँका बंद राहतील.
31 ऑगस्ट 2023- रक्षाबंधन, श्री नारायण गुरु जयंती (Bank Holidays in August 2023)
==========================
हे देखील वाचा: रेल्वेचे तिकिट असे करा दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर
==========================
आजच्या काळात नवीन तंत्रज्ञानामुळे बँक बंद असतानाही ग्राहक बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यासाठी ते नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा यूपीआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएमचा वापर करू शकता.