Bank FD benefits- बचत आणि गुंतवणकीच्या दुसऱ्या ऑप्शन व्यतिरिक्त फिक्स्ड डिपॉजिटसाठी लोक अधिक पसंदी देतात. त्यामुळे बचतीसाठी सर्वाधिक प्रथम ऑप्शन हा एफडीचा ऑप्शन निवडला जातो आणि त्यावर मिळणारे व्याज सुद्धा उत्तम मिळते. परंतु तुम्हाला एफडीवर मिळणाऱ्या व्याजाव्यतिरिक्त एफडीवर इंन्शुरन्स आणि इनकम टॅक्स संदर्भात सूटचा लाभ घेता येतो. काही बँकातर एफडी खातेधारकांना हेल्थकेअयर बेनिफिट्सची सुद्धा ऑफऱ देतात. अशातच तुम्ही एफडीवर मिळणाऱ्या व्याजासाठी गुंतवणूक करत असाल तर ते पुरेसे नाही. कारण बँक खातेधारकाला एफडी काढण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे फार गरजेचे असते.
तज्ञांकडून असे सांगितले जाते की, सध्याच्या काळात गुंतवणूक करण्याचे विविध ऑप्शन आहेत. मात्र योग्य गुंतवणूक करणे हे सुद्धा आव्हानात्मक काम आहे. एफडीवर गुंतवणूकीसाठी कोणतेही नवे टूल नाही. त्यामुळेच शेअर बाजारात जशी उलाढाल होते तसे एफडीमध्ये होत नाही. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणे ही सुद्धा एक स्मार्ट चॉइस आहे. एफडीचा सर्वाधिक मोठा फायदा असा की, कमी रक्कमेत आणि कमी वयात तुम्ही एफडीचे खाते सुरु करु शकता. यावर सुरक्षिततपणे उत्तम रिटर्नसह ही मिळतात. तर जाणून घेऊयात एफडीवर उत्तम रिटर्नसह कोणते मोठे फायदे होतात त्याबद्दल अधिक.

-घरबसल्या एफडी खाते सुरु करण्याची सुविधा
आता एफडी ही तुम्हाला घरबसल्या ही सुरु करता येते. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या मदतीने तुम्ही एफडी अकाउंट सुरु करु शकता. अशाचप्रकारे एफडी खाते सुरु करण्यासाठी फार मोठी प्रोसेस आता करावी लागत नाही. काही वेळातच एफडीचे खाते सुरु करता येते.
-एफडीवर इंन्शुरन्स किंवा हेल्थकेअर बेनिफिट्स
एफडी सर्वाधिक पारंपरिक आणि विश्वासू बचतीचा ऑप्शन आहे. आजच्या काळात बँक फ्री लाइफ इंन्शुरन्स ते हेल्थकेअर बेनिफिट्स सुद्धा देते. उदाहरणासाठी डीसीबी सुरक्षा एफडीवर ५० लाख रुपयांपर्यंत एफडी रक्कमेऐवढाच मोफत लाइफ इंन्शुरन्स कवर मिळते.(Bank FD benefits)
हे देखील वाचा- वर्च्युअल मोबाईल क्रमांक म्हणजे काय? कसा करतो काम जाणून घ्या
-इनकम टॅक्स सूटचा फायदा
बँक टॅक्स सेविंग एफडीसुद्धा ऑफर करते. यावर इनकम टॅक्स अॅक्ट १९६१, च्या सेक्शन 80C अंतर्गत टॅक्सच्या सूटचा लाभ मिळतो.
-बँक एफडीवर ओव्हड्राफ्टची सुविधा
काही बँकांकडून एफडीवर ओव्हरड्राफ्टची सुविधा सुद्धा देतात. यामुळे आपत्कालीन काळात एफडी मोडण्याऐवजी तुम्ही ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा घेऊ शकता.
