Home » मुलांसाठी बँक खाते सुरु करणार असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मुलांसाठी बँक खाते सुरु करणार असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

by Team Gajawaja
0 comment
Bank account for kid
Share

आजकाल बहुतांश पालक आपल्या मुलांचे बँक खाते सुरु करतात. परंतु मुलांचे आणि मोठ्या माणसांचे खाते सुरु करण्यामध्ये फरक असतो. मुलांचे खाते सुरु करतेवेळी एका प्रोसेसमधून जावे लागते. तेव्हा कुठे त्यांचे खाते सुरु केले जाते. अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे बँक खाते सुरु करणार असाल तर तत्पूर्वी काही महत्वाच्या काही जरुर लक्षात ठेवा. (Bank account for kid)

ही कागदपत्र तयार ठेवा
जर तुमचे मुलं १८ वर्षाखालील असेल तर त्यासाठी मायनर खाते सुरु केले जाते. हे खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला मुलाचा जन्मदाखला, आधार कार्ड आणि केवायसी करावी लागते. सर्वात प्रथम तुम्हाला हे सर्व कागदपत्र बँकेकडून वेरिफाय करून घ्यावे लागतात. त्यानंतर तुम्ही पुढील टप्प्यात जातो. एकदा वेरिफिकेशन झाले त्यानंतर बँक तुम्हाला खाते सुरु करण्यासंदर्भात एक फॉर्म देते. या फॉर्ममध्ये मुलासंबंधित सर्व माहिती भरावी लागते. जसे की. त्याचे नाव, जन्मतारीख, घराचा पत्ता, वय. फोन क्रमांक असे काही.

आपल्या मुलाचे खाते सुरु करण्यापूर्वी बँकेकडून जाणून घ्या की, खात्यात कमीत कमी किती रक्कम ठेवली पाहिजे. बहुतांश बँकेत ही रक्कम २५०० ते ५००० रुपयांदरम्यान असे. हवं असेल तर तुम्ही मुलासाठी झिरो बॅलेन्स अकाउंट ही सुरु करु शकता.

मुलाला कधी वापरता येईल खाते
वयाच्या १८ व्या वर्षानंतर तुमचे मुलं या खात्याचा वापर करु शकते. परंतु तत्पूर्वी केवायसी डिटेल्सह पुन्हा एकदा बँकेत अर्ज करावा लागतो. मुलाचे खाते सुरु करण्यामागील एक फायदा असा की, मुलं भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिस.

मुलांसाठी विविध खाते
खुप आधी मुलांचे खाते सुरु करण्यास बंदी होती. परंतु आता आरबीआयने असा आदेश दिला आहे की, १० वर्षावरील सर्व मुलांचे आणि तरुणांना खाते सुरु करण्याची परवानगी असेल आणि त्यांना आर्थिक रुपात मजबूत होण्यास ही मदत होईल. आरबीआयच्या या आदेशाचे पालन करत बहुतांश बँकांनी विविध खाते सुरु करुन देशातील अल्पवयीन मुलांना त्याचा लाभ मिळवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

नेट बँकिंगसाठी परवानगी नाही
आजकाल नेट बँकिंगचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येक बँक आपल्या खातेधारकाला नेट बँकिंगची सुविधा देते. परंतु ही सुविधा अल्पवयीन मुलांना देण्यात आलेली नाही. जर पालकांना वाटत असेल मुलाने सुद्धा नेटबँकिंगचा वापर करावा तर त्यांना स्वत: ला बँकेत जाऊन पासवर्ड आणि आयडी तयार करावा लागते. पालकांच्या निगराणीखालीच नेटबँकिंगचा वापर केला जाऊ शकतो. (Bank account for kid)

हेही वाचा- मुलांना शिकवा ‘या’ सवयी, आरोग्य राहिल सुदृढ

मुलांना डेबिट कार्ड देण्यापूर्वी हे तपासून पहा की, त्यामध्ये एसएमएसची सुविधा आहे की नाही. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला एटीएममधून पैसे कसे काढावेत याबद्दल सांगितले पाहिजे. जेणेकरुन तो एखाद्या फसवणूकीला बळी पडणार नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.