बांगलादेशातील घुसखोऱांना रोखण्याचे आव्हान भारतासमोर आहे. बांगलादेशींनी भारताच्या प्रत्येक खेडोपाड्यात आपले स्थान निर्माण केले आहे. भारतात राहण्यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे त्यांनी सहजपणे बनवत भारतीय नागरिक असल्याचा शिक्का मारुन घेतला आहे. फक्त भारतीय नागरिकच नाही, तर भारतीय व्यवस्थेचा भाग होण्याचाही प्रयत्न हे बांगलादेशी घुसखोर करीत आहेत. असेच एक प्रकरण पश्चिम बंगाल मध्ये उघडकीस आले आहे. येथील लवली खातून नावाची महिला चक्क सरपंच झाल्याची माहिती आहे. ही लवली भारताची नागरिक नसून बांगलादेशी घुसखोर आहे, तिचे खरे नाव नसिया शेख असून तिच्याकडे भारतात राहण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत. याच कागदपत्रांच्या आधारे लवली पश्चिम बंगालच्या एका गावाची सरपंच झाली. लवलीसाऱखे किती घुसखोर भारतीय व्यवस्थेचा आणि समाजाचा भाग बनले आहेत, याचा शोध आत्ता सुरु आहे. (Lovely Khatoon)
मात्र या घुसखोरांना बनावट कागदपत्र जे भारतीय बनवून देत आहेत, त्यांचा दोष अधिक आहे. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील एका गावची सरपंच झालेल्या लवली खातूनच्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली आहे. तृणमूल कांग्रेसची सदस्य असलेली लवली खातून थेट गावच्या सरपंचपदी बसली. मात्र लवलीचे मुळ नाव नसिया शेख असून ती बांगलादेशची घुसखोर असल्याचे स्पष्ट झाले. मग हे सर्व प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात गेले आणि त्यातून उघड झालेल्या सत्यानं संपूर्ण देशाला हादरवले आहे. असे किती घुसखोर सध्या भारतात प्रतिष्ठित जागी विराजमान झाले आहेत, हा प्रश्नही त्यातून विचारण्यात येत आहे. देशभरात बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी मोठी मोहीम चालू करण्यात आली आहे. (International News)
दिल्ली आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. मात्र अन्य राज्यातही या घुसखोरांची संख्या मोठी आहे. बांगलादेशाच्या शेजारी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तर खुलेआम वावरणा-या बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी आहे. यातीलच एक नसिया शेखचे प्रकरण आता गाजत आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील राशिदाबाद गावातील ग्रामपंचायतीची सरपंच झालेल्या या नसिया शेखनं मुळ नाव बदलून लवली खातून असे नवे नाव धारण केले. ती ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रसेची कार्यकर्ती आहे. लवली राशिदाबादची सरपंच झाली आणि तिच्याबद्दलच्या तक्रारी वाढू लागल्या. लवली ही पासपोर्टशिवाय बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याची तक्रार करण्यात आली आणि आता कोलकाता उच्च न्यायालयाने एसडीओकडून यासंदर्भात उत्तर मागितले आहे. (Lovely Khatoon)
मालदा येथील चंचल येथे राहणाऱ्या रेहाना सुलताना यांनी याबाबत प्रथम आवाज उठवला होता. रेहाना आणि लवली यांनी 2022 मध्ये झालेल्या ग्रामप्रमुखपदाची निवडणूक लढवली होती. यात रेहानाचा पराभव झाला आणि लवलीचा विजय झाला. विशेष म्हणजे, निवडणुकीत रेहाना तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होत्या, तर लवली काँग्रेस आणि डाव्यांच्या उमेदवार. निवडणूक जिंकल्यानंतर लवली यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रेहाना यांनी लवली खातून संदर्भात पोलीसात तक्रार केली. पण तिथे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली. यात लवलीला सरपंच करण्यासाठी बनावट कागदपत्रे करण्यात आल्याचा दावा रेहाना यांनी केला. लवलीकडे बनावट आधार कार्ड आणि मतदार कार्डही असून ओबीसी प्रमाणपत्रातही फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. (International News)
====================
हे देखील वाचा :
अफगाणिस्तानमध्ये महिलांना बोलण्यास सुद्धा बंदी !
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
तिच्या वडिलांचे नावही बदलल्याचे लक्षात आल्यानं याबाबत अधिक तपास करण्याचे आदेश मग थेट कोर्टातून देण्यात आले आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार लवली खातून 2015 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात आली. तिचे लवली खातून या नावाने आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र 2018 मध्ये जारी करण्यात आले. याच सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे तिनं निवडणूक लढवली. लवली खातून प्रकऱणावरुन आता कोलकाता उच्च न्यायालयानं काही कडक निर्देश पोलीसांना दिले आहेत, तसेच राज्य सरकारलाही काही प्रश्न विचारले आहेत. या सर्व प्रकऱणात पश्चिम बंगालचे पोलीस किती तपास करतील हा प्रश्न आहे. मात्र देशभरात वाढत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्वांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे. (Lovely Khatoon)
सई बने