भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन कुठली याची पाहणी नुकतीच कऱण्यात आली. या पाहणीत शताब्दी, दुरांतो, वंदे भारत या सुपरफास्ट गाड्यांना मागे टाकत KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसने बाजी मारली आहे. या ट्रेनची कमाई ₹ 1,76,06,66,339 एवढी असून यापुढे भारतातील सर्वात वेगवान ट्रेन, वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस या मागे आहेत. भारतातील रेल्वेचे जाळे हे जगभरातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. वंदेभारत ट्रेन चालू झाल्यावर तर यात भर पडली. परदेशातूनही वंदे भारत ट्रेनची मागणी वाढली. असे असले तरी कमाईच्या बाबतीत मात्र वंदे भारतला अद्यापही KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसचा टप्पा गाठता आलेला नाही. दररोज करोडो लोक भारतीय रेल्वे गाड्यंमधून प्रवास करतात. राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत या सुपरफास्ट गाड्यांव्यतिरिक्त, मेल एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन, लोकल, डीएमयू अशा अनेक गाड्या चालवल्या जातात. यातील प्रत्येक ट्रेनची खासियत आहे. त्यातील सुविधांमध्येही काही प्रमाणात विविधता आहे. या सर्वात KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसनं बाजी मारत रेल्वेले सर्वाधिक कमाई करुन देणारी ट्रेन म्हणून बाजी मारली आहे. (Bangalore Rajdhani Express)
भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या वंदे भारत, शताब्दी, दुरांतो या गाड्यांना मागे टाकत KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसनं कमाईचे सर्व विक्रम तोडले आहेत. ही रेल्वे भारतीय रेल्वे प्रशासानासाठी धनलक्ष्मी ट्रेन ठरली आहे. उत्तर रेल्वेची सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन म्हणून तिचा गौरव होत आहे. ट्रेन क्रमांक 22692 बंगलोर राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन ते KSR बेंगळुरू असा प्रवास करते. 2022-23 मध्ये आत्तापर्यंत एकूण 509510 नागरिकांनी या ट्रेनने प्रवास केला आहे. त्यामुळे सुमारे 1,76,06,6,339 रुपये रेल्वेच्या खात्यात जमा झाले आहेत. KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी 2-टायर आणि एसी 3-टायर अशी विभागणी करण्यात आली आहे. तिकिटाच्या भाड्यात जेवणाचा समावेश असलेल्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये जेवणाची सुविधाही उपलब्ध आहे. (Marathi News)
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीशी जोडणारी सियालदह राजधानी एक्सप्रेस ही रेल्वेची दुसरी सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन ठरली आहे. ट्रेन क्रमांक 12314 सियालदह राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 मध्ये 5,09,164 नागरिकांनी प्रवास केला आहे. त्यामुळे या ट्रेनची कमाई 1,28,81,69,274 एवढी झाली आहे. कमाईच्या बाबतीत दिब्रुगडची राजधानी ट्रेन तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. नवी दिल्ली ते दिब्रुगड दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने गेल्या वर्षी 4,74,605 नागरिकांनी प्रवास केला आहे. यामुळे 1,26,29,09,697 रुपयांची रेल्वे प्रशासनाला कमाई झाली आहे. (Marathi News)
नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस ही कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आली आहे. ट्रेन क्रमांक 12952 मुंबई राजधानी एक्स्प्रेसने 2022-23 मध्ये 4,85,794 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेला 1,22,84,51,554 रुपये कमाई झाली आहे. दिब्रुगड राजधानी ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात फायदेशीर ट्रेन ठरली आहे. या ट्रेनमधून 4,20,215 प्रवाशांना प्रवास केला आहे. त्यातून रेल्वेची 1,16,88,39,769 रुपये कमाई झाली आहे. या सर्वात अव्वल ठरलेल्या KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसमध्ये अनेक सुविधा प्रवाशांना उपलब्ध आहेत. राजधानी एक्स्प्रेसमध्ये नाश्त्यापासून दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंतची सुविधा प्रवाशांना मिळते. या गाडीचे तिकिट बुक करतांनाच कुठला खाद्यपदार्थ हवा, याचा पर्याय प्रवाशांना दिला जातो. (Bangalore Rajdhani Express)
========
हे देखील वाचा : US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?
Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?
======
शिवाय व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थही गाडीमध्ये उपलब्ध आहेत. KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जे जेवण दिले जाते, त्यातही विविधता आहे. दुपारच्या जेवणात सूप, पुलाव, भाज्या, रोटी, पराठा, यासह मिठाईच्या पर्यायांमध्ये आइस्क्रीम किंवा रसगुल्ला यांचा समावेश असतो. याबरोबच संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये स्नॅक्स, सँडविच, मिठाई आणि चहा किंवा कॉफी यांचा किट प्रवाशांना देण्यात येतो. या गाडीमधील सगळे डबे हे वातानुकूलित आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी डब्यात एक अटेंडंट असतो. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना याचा चांगला फायदा होतो. त्यातही KSR बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेस या ट्रेनची सुविधा रोज उपलब्ध आहे. ताशी 130 किलोमीटर वेगाने धावते. या ट्रेनला कमी थांबे आहेत आणि फक्त प्रमुख स्थानकांवर थांबते. त्यामुळेही अनेक प्रवाशी या ट्रेनला प्राधान्य देतात. (Marathi News)
सई बने