Home » बंगळुरु फ्रीज हत्याकांड !

बंगळुरु फ्रीज हत्याकांड !

by Team Gajawaja
0 comment
Bangalore Murder Case
Share

बंगळुरुचा व्यालिकावल परिसरात एका तीन मजली इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावरील घरातून बरेच दिवस कोणी ये-जा केली नव्हत.  म्हणून इमारतीत राहणाऱ्या लोकांना संशय येत होता. संशय कोणी येजा केलं नाही म्हणून आला नव्हता. संशय तिसऱ्या मजल्यावरुन येणाऱ्या कुजलेल्या वासामुळे येत होता. शेजाऱ्यांनी लगेचच त्या खोलीत राहणाऱ्या महालक्ष्मीच्या कुटुंबियांना फोन केला. जेव्हा तिचं कुटुंब तिथे पोहचलं, तेव्हा त्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांना घरातून अजूनच दुर्गंधीत वास आला. घरात फ्रीज जवळ त्यांना रक्ताचे डाग दिसले. जेव्हा त्यांनी फ्रीजचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना फ्रीजमध्ये एका शरीराचे तुकडे दिसले.हे तुकडे महालक्ष्मीच्या शरीराचे होतं. महलक्ष्मीच्या शरीराची इतकी विदारक अवस्था कोणी केली होती आणि का? जाणून घेऊया. (Bangalore Murder Case)

जेव्हा महालक्ष्मीच्या घरात तिच्या शरीराचे तुकडे आढळले, तेव्हा लगेचच पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिसांनी जेव्हा त्या घरातलं चित्र पहिलं, तेव्हा त्यांनी फॉरेन्सिक टीम आणि सरकारी हॉस्पिटलमधील मेडिकल स्टाफला बोलावून घेतलं. तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या महालक्ष्मीच्या कुटुंबियांपैकी तिच्या पतीने हेमंत दासने सांगितलं की हा खून त्यानेच केला आहे अशरफने. (Crime News)

तिची हत्या होण्याआधी काही वर्षांपूर्वी तिचं हेमंत दास याच्या सोबत लग्न झालं होतं. महालक्ष्मी मुळची नेपाळची बऱ्याच वर्षांपासून ती तिच्या कुटुंबासोबत बंगळुरू मध्ये राहत होती. नंतर तिचं लग्न हेमंत दास याच्यासोबत झालं. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. पण तिच्या हत्येचा नऊ महिन्यांपूर्वी हेमंत दासला महालक्ष्मीचे बाहेर कुणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत असा संशय आला. त्यामुळे त्यांचात वाद वाढले. हेमंतला वाटत होतं की त्याच्या बायकोचे म्हणजे महालक्ष्मीचे अशरफ नावाच्या एका माणसासोबत अनैतिक संबंध आहेत. त्यांच्यात वाद वाढत गेला. तेव्हा पासून महालक्ष्मी भाड्याच्या घरात एकटी राहत होती. पतीपासून वेगळं झाल्यामुळे महालक्ष्मीचे आई-वडीलही तिच्यावर नाराज होते. महालक्ष्मी एका मॉलमध्ये फॅशन फॅक्टरी या कपड्यांच्या शोरूममध्ये टीम लीडर म्हणून कामं करत होती. तिचा खून त्या अशरफनेच केला आहे असं तिच्या पतीने सांगितल्यानंतर पोलिसांनी उतराखंडच्या अशरफला ताब्यात घेतलं. तपासणी आणि अशरफची विचारुपूस केल्यानंतर ही गोष्ट समोर आली की अशरफ हा निर्दोष आहे. (Bangalore Murder Case)

पोलिसांनी व्यालिकावल परिसरातले CCTV चेक केले. महालक्ष्मीचा खून हा 2 किंवा 3 सप्टेंबरलाच झाला होता आणि तिचा मृतदेह 20 सप्टेंबरला विदारक अवस्थेत सापडला. CCTV मध्ये पोलिसांना शेवटचा महालक्ष्मीच्या घरी आलेला माणूस दिसला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो माणूस होता मुक्तीरंजन रॉय. महालक्ष्मी ज्या शोरूमध्ये काम करायची तिथे तो मॅनेजर म्हणून काम करत होता. तो ओडिशामार्गे पश्चिम बंगालमध्ये पळून गेला. तो सतत स्वत:च लोकेशन बदलत होता. त्याच कुटुंब मुंबईत राहत होतं. पोलिसांनी त्याच्या भावाची चौकशी केली तेव्हा पोलिसाना कळालं की त्यानेच म्हणजे मुक्तिरंजन रॉयनेच महालक्ष्मीची हत्या केली आहे. (Crime News)

पण पोलिस त्याच्यापर्यंत पोहचण्या आधीच त्याने ओडिसाच्या भद्रक गावात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याची गाडी आणि सुसाइड नोट सुद्धा पोलिसाना सापडली. ज्यामध्ये त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याचं कबूल केलं होतं. महालक्ष्मी आणि मुक्तीरंजन 2023 पासून एकमेकांना ओळखत होते आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. “महालक्ष्मी मला खूप आवडत होती. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मात्र ती माझ्याशी अजिबात नीट वागत नव्हती. महालक्ष्मी मला अपहरणाच्या प्रकरणात अडकवू पाहात होती. मी तिच्यासाठी खूप पैसे खर्च केले. मात्र तिला माझी कदर नव्हती. त्यामुळे मी तिची हत्या केली.” असं त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. (Bangalore Murder Case)

======

हे देखील वाचा : एका ट्रेनी डॉक्टरची हत्या !

======

मुक्तिरंजन महालक्ष्मीच्या घरी त्यादिवशी एक मोठी बॅग घेऊन गेला होता. जेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला तेव्हा स्वत:ला वाचवण्यासाठी तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिला ठार केलं. बॅगेत भरण्यासाठी तिचे तुकडे केले. पण बॅग बाहेर घेऊन गेल्यास लोकांना संशय येईल म्हणून त्याने तिचे तुकडे फ्रीजमध्ये ठवले. वास येऊ नये म्हणून त्याने संपूर्ण घरभर केमिकल सुद्धा टाकलं होतं. पोस्टमॉर्टमसाठी जेव्हा तिचा मृतदेह नेला गेला होता तेव्हा तो 50 पेक्षा जास्त तुकड्यांमध्ये होता. मृतदेहाची ही अवस्था बघून डॉक्टर्स सुद्धा हादरले होते. महालक्ष्मीची अशी अवस्था तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने केली होती. (Crime News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.