सध्या व्हॉ़ट्सअॅपचा ऐवढा वापर वाढला आहे की., कंपनी सुद्धा आता ग्राहकांना ते वापरण्यास अधिक मजा येईल आणि सोप्पे होईल अशा पद्धतीचे अपडेट, फिचर्स आणत आहेत. त्यामुळेच जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या ही कोटींच्या घरात आहे. मात्र काही वेळेस असे होते की, तुमच्या एखाद्या चुकीच्या अॅक्टिव्हिटीमुळे तुम्हाला व्हॉट्सअॅपकडून बॅन केले जाते. म्हणजेच तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरण्यावर बंदी घालते. ही कारवाई कंपनीकडून एका व्यक्तीवर किंवा अनेकांवर एकाच वेळी केली जाते. यामध्ये काही वेळेस युजर्सचे अकाउंट ही चुकून बॅन केले जाते. मात्र तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअॅपकडून बॅन (BAN on whatsapp) केले गेले तर नक्की काय करावे यासंदर्भातीलच काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हॉट्सअॅपकडून बॅन अकाउंट्ससाठी रोलआउट करण्यात आलेले फिचर्स हे सध्या बीटा वर्जनसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र लवकरच हे फिचर्स सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. WABetainfo नुसार हे फिचर अॅन्ड्रॉइड आणि iOS या दोन्ही बीटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे. तर जाणून घेऊयात कशा प्रकारे अकाउंटवरील बॅन आपण काढू शकतो.(BAN on whatsapp)
हे देखील वाचा- स्मार्टफोनची बॅटरीची लाइफ वाढवण्यासाठी पहा ‘या’ सोप्प्या ट्रिक्स

बॅन हटवण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम
एखाद्या युजरचे अकाउंट बॅन झाले म्हणजेच त्याचा संपूर्ण डेटा निघून जातो. दुसरी गोष्ट अशी की, त्याच क्रमांकावर पुन्हा आपण व्हॉट्सअॅप सुरु करु शकत नाही. इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्मवर बहुतांश करुन टर्म ऑफ सर्विसचे उल्लंघन केल्यास अकाउंट हे बॅन केले जाते. परंतु तुम्ही अकाउंटवरील बॅन हटवू शकता. त्यासाठी तुम्हाला बॅन अपील (BAN appleal) करावी लागले. खरंतर जेव्हा एखादे अकाउंट बॅन होते तेव्हा युजरला ते लॉग इन करता येत नाही. अशातच तुम्ही बॅन अपील करु शकता. सध्या हे फिचर बीटा फेजमध्ये आहे.त्यासाठी युजर्सला व्हॉट्सअॅप सपोर्टला संपर्क साधावा लागणार आहे. बीटा वर्जनमध्ये लॉगइन पेजवरच युजर्सला याचे ऑप्शन मिळणार आहे. युजर्सची रिक्वेस्ट आल्यानंतरच व्हॉट्सअॅप सपोर्ट तुमचे अकाउंट आणि डिवाइस तपासणार आहे
-ही चूक न झाल्यास बॅन हटवला जाईल
जर तुम्ही कोणत्याही टर्म ऑफ सर्विसचे उल्लंघन केले नसेल तर तुमचे अकाउंट रिस्टोर होईल. काही वेळेस युजरसचे अकाउंट चुकू ही बॅन होते. याचे कारण असे की सिस्टिमचे ऑटोमेटेड फ्लॅग फंक्शन. बॅन हटवल्यानंतर युजर्सला पुन्हा एकदा आपला मोबाईल क्रमांक वेरिफाय करावा लागणार आहे. वेरिफिेकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे चॅट्स पुन्हा मिळतील आणि पुन्हा तुम्ही ते अकाउंट वापरु शकता.