केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत 101 हून अधिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाने 101 वस्तूंची यादी तयार केली आहे, ज्यांवर आयातबंदी असेल. मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
‘शस्त्रे, सार्वजनिक आणि खाजगी उद्योग यासह सर्व भागीधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्रालयाने ही यादी तयार केली आहे. भारतातील विविध दारूगोळे आणि उपकरणे तयार करण्यासाठी भारतीय उद्योगाच्या सद्य आणि भविष्यातील क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०२० दरम्यान यासारख्या जवळपास २६० योजनांचा ट्राय सर्व्हिसेसकडून अंदाजे ३.५ लाख कोटी रुपयांचा करार झाला. येत्या ६ ते ७ वर्षांत देशांतर्गत उद्योगात जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे कंत्राटे दिला जाण्याचा अंदाज आहे.’
संरक्षण मंत्रालयाकडून 101 वस्तूंवर आयातबंदी
68