Home » Bali’s Hindu Heritage : बालीमध्येच ‘हिंदू’ कसे उरले ?

Bali’s Hindu Heritage : बालीमध्येच ‘हिंदू’ कसे उरले ?

by Team Gajawaja
0 comment
Bali’s Hindu Heritage
Share

इंडोनेशिया, हा तसा मुस्लिम देश. या देशात ८७ टक्के लोकं इस्लाम धर्म पाळतात. पण इंडोनेशिया जरी मॅक्सिमम मुस्लिम पॉप्युलेशन असलेला देश असला तरी, ऐकून आश्चर्य वाटेल, पण इंडोनेशियामध्ये हिंदू धर्म हा तिसरा मोठा धर्म आहे. आता प्रश्न असेल, कसं काय? तर याचं उत्तर म्हणजे इंडोनेशियातला असा भाग, जो जगभरातल्या टुरिस्टचं आवडतं डेस्टिनेशन पॉइंट आहे आणि एकदा तरी तिथे फिरायला जायचंय अशी इच्छा तर नक्कीच झाली असणार, तर ते ठिकाण म्हणजे बाली. आणखी एक शॉकींग गोष्ट म्हणजे याच बालीमध्ये ८७% लोकं हिंदू धर्म पाळतात, ज्यांना इंडोनेशियन हिंदू किंवा बालिनीज हिंदू असं म्हणतात. आणि इंडोनेशिया हा सर्वात जास्त हिंदू पॉप्युलेशन असलेला ४थ्या रॅंकवरचा देश आहे. ऐकून खूप भारी वाटेल की १९९८ साली, तिथे २०००० ची नोट चलनात आली होती, ज्यावर चक्क गणपतीचा फोटो होता आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इंडोनेशिया एयर फोर्सचं ब्रीदवाक्य तर चक्क संस्कृत भाषेत आहे. ते म्हणजे स्वं भुवन पक्ष !  इंडोनेशियात हिंदू धर्म कसा आला आणि इथे हिंदू धर्म कसा वाढला? आणि बालीमधलं हिंदू कल्चर आहे तरी कसं? (Bali’s Hindu Heritage)

इंडोनेशियात हिंदू धर्माचा प्रसार साधारणपणे पहिल्या शतकात सुरू झाला. तेव्हा भारतातले व्यापारी आणि नाविक व्यापारासाठी इथे आले. भारताच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावरचे राज्यं जसं की, ओडिसा म्हणजे प्राचीन कलिंग, तमिळनाडू म्हणजे चोळ साम्राज्य आणि बंगाल यांनी इंडोनेशियामधल्या जावा, सुमात्रा आणि बाली या बेटांशी आपले व्यापारी संबंध तयार केले. ते व्यापारासाठी तिथे गेले आणि फक्त स्वतःच नाही तर आपल्या सोबत हिंदू धर्म, संस्कृत भाषा, लिपी आणि धार्मिक ग्रंथ घेऊन गेले. त्यामुळे काय झालं की, भारतात आणि इंडोनेशियात कल्चर एक्स्चेंज झालं. मग चौथ्या आणि पाचव्या शतकात इंडोनेशियात छोटी-मोठी राज्यं तयार झाली, ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारला.

उदाहरण सांगायचं झालं, तर जावामधलं Tarumanegara आणि Kutai Negara यांनी हिंदू धर्माला राजधर्म म्हणून स्वीकारलं. याच काळात जावामध्ये प्राचीन हिंदू मंदिरे बांधली गेली, जसं की सातव्या आणि आठव्या शतकातलं Dieng आणि Gedong Songo. त्यानंतर ८ वं शतक ते १५ वं शतक, हा काल हिंदू धर्मासाठी सुवर्णकाळ म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण याच काळात हिंदू धर्म वाढायला लागला. याच काळात सुमात्रा इथे असलेलं श्रैविजय साम्राज्य बौद्ध धर्मावर बेस्ड होतं, पण त्यांनी हिंदू धर्मालाही प्रोत्साहन दिलं. यांचं आणि भारताचं व्यापाराच्या दृष्टीने चांगले संबंध होते. जावामधल्या मातराम साम्राज्याने तर हिंदू धर्माला राजधर्म म्हणून स्वीकारलं.(Bali’s Hindu Heritage)

Bali’s Hindu Heritage

त्यांनी ९व्या शतकात प्रंबनन मंदिर बांधलं, जे आज पाहिलं तर, त्याच्यावर इंडियन आर्किटेक्चरचा किती इम्पॅक्ट होता, त्याचा अंदाज येईल. त्यानंतर बालीत १३ व्या ते १६ व्या शतकात माजापहित साम्राज्यामुळे हिंदू धर्माची मूळं आणखी खोलवर रुजायला लागली. त्यातच बालीतल्या स्थानिक राजांनी माजापहितच्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभाव स्वीकारला, ज्यामुळे बाली हिंदू धर्माचं केंद्र बनलं. मग हिंदू धर्म आणि तिथल्या स्थानिक पद्धतीचं मिक्स झाल्या आणि यातून तयार झाला आगम हिंदू धर्म, जो आजही बालीमध्ये बघायला मिळतो.

माजापहित काळात ककाविन नावाचा काव्यप्रकार डेवलप झालं, जे संस्कृत आणि जावानीज भाषेच्या मिश्रणात लिहिलं जायचं. यात रामायण, महाभारत, आणि इतर भारतीय पौराणिक कथांचा प्रभाव दिसतो. बालीत वायंग कुलित म्हणजे शॅडो पपेट थिएटर, जो आपल्याला दक्षिण भारतात आजही पाहायला मिळतो आणि केकक डांस फॉर्म ज्या मध्ये रामायणची स्टोरी परफॉर्मन्सने सांगितली जाते, यामुळे हिंदू पौराणिक कथांना तिथे आणखी पॉप्यूलॅरिटी मिळाली. (Bali’s Hindu Heritage)

सुरुवातीला आपण ऐकलं की, आता इंडोनेशिया इस्लामिक कंट्री आहे, तर त्याची सुरुवात झाली १५ व्या शतकापासून, म्हणजे याच काळात काय झालं की इस्लामचा प्रचार सुरू झाला आणि हळू हळू जावातील माजापहित साम्राज्य कमकुवत झालं आणि १६ व्या शतकात त्यांचं पतन झालं. पण इंडोनेशियात सगळीकडे इस्लामी प्रचार सुरू होता, पण यात बालीने हिंदू धर्म सोडला नाही आणि इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे १९४५ मध्ये इंडोनेशिया स्वतंत्र झाला तेव्हा हिंदू धर्माला आगम हिंदू धर्म म्हणून ऑफिशियल मान्यता मिळाली आणि आज बालीमध्ये मॅक्सिमम हिंदू आहेत आणि त्यांना बालनीज हिंदू म्हणतात.

आपल्याकडे हिंदू धर्मात ब्रम्हा, विष्णू, शंकर, गणपती, लक्ष्मी, कृष्ण असे बरेच देव आहेत आणि त्यांच्या पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, तसं बलिनी हिंदू धर्मात सांग ह्यांग विडी वासा हा एकच देव आहे. जे बाकी सगळ्या देवांचं एकच रूप आहे, असं ते मानतात. आज जरी तिथे तुम्ही कोणाही बलिनी हिंदू माणसाच्या घरी गेलात तर तुम्हाला कळेल की, जसं आपल्या प्रत्येक घरात छोटा तरी देव्हारा असतो, तसंच त्यांच्याही घरात असतं. ज्याची ते रोज पूजा करतात. त्या देव्हाऱ्याला संग्गाह म्हणतात. त्यांच्या प्रत्येक गावात तीन मंदिरं असतात, पुरा पुसेह जे मूळ मंदिर, पुरा देसा जे गावाचं मंदिर, आणि पुरा दलेम जे मृतांचं मंदिर. आता आणखी इंट्रेस्टिंग म्हणजे जे मूळ मंदिर आहेत ते विष्णुशी संबंधित आहे, गावचं मंदिर म्हणजे ब्रम्हाशी आणि दलेम मंदिराचा संबंध शंकराशी. आता आपण जो पुरा शब्द ऐकला, तो खरं तर संस्कृत शब्दापासून आला आहे. (Top Stories)

ज्याचा अर्थ शहर किंवा राजवाडा. बालिनी हिंदू धर्मात ओडलन, गालुंगन आणि न्येपी हे तीन महत्त्वाचे सण आहेत, यातला ओडलन सण म्हणजे प्रत्येक वर्षाला मंदिरात समारंभ होतो. मघाशी जे मंदिर पाहिले, ते ज्या दिवशी बांधले गेले त्या तारखेला सोहळा होतो. त्यांनंतर गांगुलन हा सण पावुकोन कालचक्रानुसार २१० दिवसांंनी होतो. आता हे पावुकोन कालचक्र बालीच्या हिंदू धर्मातील एक अनोखी आणि स्थानिक कालगणना पद्धत आहे, जे २१० दिवसांचं चक्र आहे. पौराणिक कथेनुसार, हा सण साजरा करण्यामागचं कारण म्हणजे मायादनव नावाच्या राक्षसावर सांग ह्यांग विडी वासा याने विजय मिळवला होता. आता न्येपी हा सण इतर सणांपेक्षा वेगळा सण आहे. ज्यात एक दिवस मौनाचा दिवस म्हणून पाळतात. ज्यात सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत सगळीकडे शांतता असते, कोणतेही दिवे, विजेचे बल्ब किंवा आग पेटवली जात नाही,कोणतंही काम, व्यवसाय किंवा फिजिकल वर्क केलं जात नाही, लोक घराबाहेर पडत नाहीत; रस्ते, बाजारपेठा, विमानतळ, बंदरं बंद असतात, सगळी एंटरटेंमेंट माध्यम बंद असतात. (Bali’s Hindu Heritage)

================

हे देखील वाचा : Death Penalty : फाशीची शिक्षा सर्वात आधी कोठे सुरू झाली? घ्या जाणून

================

यामागचा त्यांचा उद्देश असतो की, सगळ्या वाईट शक्ति दूर व्हाव्यात आणि नवीन वर्षाची सुरुवात शुद्ध आणि शांततेने करूयात. बालीमध्ये विष्णू, शिव, गणेश, बुद्ध, लक्ष्मी, सरस्वती, राम आणि कृष्ण यांच्या मूर्ती प्रामुख्याने आढळतात. आता आणखी इंट्रेस्टिंग गोष्ट सांगतो, विश्वास नाही बसणार, पण इंडोनेशिया ही मॅक्सिमम मुस्लिम पॉप्युलेशन असलेली कंट्री, तरी इंडोनेशियाच्या आर्म फोर्सचे motto म्हणजे ब्रीदवाक्य चक्क संस्कृतमध्ये आहेत.(Top Stories)

इंडोनेशियाच्या नॅशनल आर्म फोर्सचं ब्रीदवाक्य आहे, ‘त्रिधर्म एक कर्म’ म्हणजे आर्मी, नेवी आणि एयर फोर्स या तिघांचा उद्देश एकच आहे. त्यांच्या आर्मीचा ब्रीदवाक्य ‘कार्तिका एक पक्षी’ नेवीचं ब्रीदवाक्य ‘जलेस्वेवा जयामहे’, एअर फोर्सचं ब्रीदवाक्य ‘स्वभुवन पक्ष’, नॅशनल पोलिस फोर्सचं ब्रीदवाक्य ‘राष्ट्र सेवाकोट्टम’ आता या यूनिट्सच्या अंडर जे सब विंग्ज येतात त्यांचंसुद्धा ब्रीदवाक्य संस्कृतमध्येच आहे, त्यात एयर फोर्स कमांडो युनिटचं ब्रीदवाक्य तर भगवद्गीतेतला फेमस श्लोक आहे, तो म्हणजे ‘कर्मण्ये वधिकारस्ते मा फलेषु कदाचन’. तिथे अशी संस्कृतमधली उदाहरणं बरीच सापडतील. यावरून नक्कीच लक्षात येईल, संस्कृत भाषेला इंडोनेशियात किती सन्मान आहे. (Bali’s Hindu Heritage)

तर आज जवळपास बालीत ४० लाख पेक्षा जास्त लोकं हिंदू धर्म पाळतात. त्यांनी आजही हिंदू वारसा जपला आहे आणि याच बालीने आपल्या कल्चरमुळे जगभराचं लक्ष वेधून घेतलं. आज पॉप्युलर डेस्टिनेशनच्या वर्ल्ड रॅंकिंगमध्ये सेकंड रॅंकला आहे. तुम्हाला ही बालीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.