रायबरेली येथील लालगंज क्षेत्रात प्रसिद्ध बालेश्वर मंदिर (Baleshwar Temple)आहे. हे मंदिर जवळजवळ ६०० वर्ष जुने आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणावर एकेकाळी जंगल होते. त्यावेळी गावातील माणसं आपल्या जनावरांना चरण्यासाठी घेऊन यायचे. याच दरम्यान, एका गाईच्या मालकाला त्याच्या गाईने दुध देणे बंद केले होते. त्याच्या शोधासाठी तो जंगलात आला होता. तेव्हा त्याने असा चमत्कार पाहिला की तो त्यावेळी हैराम झाला. असे सांगितले जाते की, त्या गाईच्या मालकाला भगवान शंकरांनी त्याच्या स्वप्नात येऊन तेथे शिवलिंग असल्याचे सांगितले होते, त्यानंतर हे मंदिर उभारले गेले. तर जाणून घेऊयात या मंदिराची संपूर्ण कथा.
बाल्हेमऊ गावातील एक तिवारी परिवारातील एक गाय ही आपल्या गुराख्यासह जंगलात चरण्यासाठी जात असे. पण अचानक गाईने दूध देणे बंद केले होते. तेव्हा मालकाला संशय येऊ लागला की, गुराखी हा गाईचे दूध घेऊन जातोय. त्यामुळेच गाईने दूध देणे बंद केलेय. त्यामुळे गुराख्याला रंगेहाथ पकडण्यासाठी मालक एकेदिवशी जंगलात आला आणि झाडाझुडपांमध्ये लपून बसला. त्यावेळी मालकाने पाहिले आपली गाय एका झाडीत गेली आणि तेथे तिचे दूध निघताना पाहिले.
हे देखील वाचा- तुर्की मधील Gate of Hell मंदिर, आतमध्ये गेल्यास रहस्यमय पद्धतीने होतो मृत्यू

परंतु ज्या ठिकाणी गाईचे दूध पडत होते त्या ठिकाणी एक खड्डा होता. हे सर्व पाहून मालकाला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याच रात्री गाईच्या मालकाला बैचेन वाटू लागले. की गाईचे असे वागणे नक्की काय अर्थ लावावा त्याच वेळी त्याला स्वप्नात भगवान शंकरांचे दर्शन झाले. त्यांनी मालकाला मी तेथे विराजमान आहे जेथे तू गाईला पाहिलेस असे सांगितले. मुर्तिच्या पुजेसाठी एका मंदिराची स्थापना कर. दुसऱ्या दिवश सकाळी मालक ज्या वेळी उठला तेव्हा त्याने घरातील मंडळींना त्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले. तेव्हा त्यांना तेथे एक शिवलिंग मिळाले. त्याच ठिकाणी बालेश्वर मंदिराची (Baleshwar Temple) उभारणी करण्यात आली.
मंदिराबद्दल असे ही सांगितले जाते की, वरती घुमटावर लावण्यात आलेले त्रिशूळ हे दिवसभर सूर्याच्या गतीसह आपल्या स्थानी फिरते. दूरदूर पर्यंत या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून भगवान शंकराला प्रार्थना करतात. या क्षेत्रातील लोक जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बाबा बालेश्वर महाराज यांचे दर्शन करतात. या दिवशी मोठी यात्रा सुद्धा काढली जाते. त्यासाठी लोक सर्वात प्रथम लालगंजच्या भैरवर मंदिरात पोहचतात आणि तेथूनच यात्रेला सुरुवात होते. यात्रेत आलेल्या प्रत्येकासाठी भंडाराचे आयोजन करण्यात आलेले असते. तसेच श्रावण आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात मोठी जत्रा असते.