सनातन धर्मात पूजा करतेवेळी शंख वाजवण्याचे विशेष महत्व आहे. ऐवढेच नव्हे तर कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करण्यापूर्वी हिंदू धर्मात शंख जरुर वाजवला जातो. त्याचसोबत शंख वाजवण्यासाठी त्यात पाणी टाकून पुरोहित पवित्रीकरण मंत्रांचे उच्चारण करत सर्व दिशांना आणि उपस्थितीत असलेल्या लोकांवर पाणी शिंपडतात. सनातन धर्मात शंखाचे ऐवढे महत्व आहे तरीही शंख आणि चक्रधारी भगवान विष्णुच्या मंदिरात शंख वाजवला जात नाही. खरंतर बद्रीनाथ येथे पूजेवेळी कधीच शंख वाजवला जात नाही. नक्की या मागील कारण काय याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (Badrinath Temple)
बद्रीधाम उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या तटावर आहे. भगवान बद्री विशालला पंच बद्री मधील पहिले बद्री मानले जातात. या मंदिराची निर्मिती ७-९व्या दशकात केल्याचे सांगितले जाते. मंदिरात भगवान बद्रीनारायण यंची एक मीटर लांब अशी शालिग्रामच्या दगडाची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. अशी मान्यता आहे की, आदिगुरु शंकराचार्यांनी ८व्या शतकादत नारद कुंड येथून काढून स्थापन केली होती. सनातन धर्माचे अनुयायी हे भगवान बद्रीवर फार विश्वास ठेवतात. बद्री विशालचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या मंदिरात शंख वाजवण्यामागील धार्मिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारण आहे.

देवी लक्ष्मी संदर्भात आहे धार्मिक कारण
बद्रीनाथ धामात शंख या कारणास्तव वाजवला जात नाही कारण, देवी लक्ष्मी बद्रीनाथ धाममध्ये तुळशीच्या रुपात ध्यान करत होती. जेव्हा ती ध्यानमग्न होती त्यावेळी भगवान विष्णुंनी शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करण्यापू्र्वी तो वाजवला जातो. मात्र भगवान विष्णुने शंखचूर्णच्या वधानंतर हा विचार करुन शंख वाजवला नाही की, तुळशीच्या रुपात ध्यान करत असलेल्या देवीची एकाग्रता भंग होईल. आज सुद्धा हिच गोष्ट लक्षात घेता बद्रीनाथ धामात शंख वाजवला जात नाही. (Badrinath Temple)
एका राक्षसासंबंधित आहे याचे कारण
आणखी एक कथा प्रचलित आहे की, हिमालय क्षेत्रात दानव खुप विनाश करत होते. त्याच कारणास्तव ऋषि मुनी मंदिरात पूजा करु शकत नव्हते. ऐवढेच नव्हे तर आपल्या आश्रमांत सुद्धा ऋषी मुनींना ध्यान करता येत नव्हते. त्यांचे भोजन सुद्धा राक्षस खायचे. हे सर्व पाहून ऋषी अगस्त्य यांनी माता भगवती समोर मदतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर देवी भगवती कुष्मांडा देवीच्या रुपात प्रकट झाली आणि आपल्या त्रिशुल आणि कटाराने सर्व राक्षसांचा विनाश केला.
मता भगवती जेव्हा राक्षसांचा वध करत होती तेव्हा तिच्यापासून बचाव करत ते पळ काढत होते. राक्षस अतापीने मंदाकिनी नदीत शरणागती पत्कारुन आपला जीव वाचवला. तर राक्षस वतापी बद्रीनाथ मंदिरात ठेवलेल्या शंखात लपला. मान्यता आहे की, जर हा शंख वाजवला जाईल तर वतापी राक्षस बाहेर येईल. त्यामुळे तो आजही वाजवला जात नाही.
हे देखील वाचा- लंडनमध्ये आता भव्य असे भगवान जगन्नाथ मंदिर
हे आहे वैज्ञानिक आणि नैसर्गिक कारण
बद्रीनाथ धामच्या आजूबाजूला बर्फ पडतो. तर वैज्ञानिकांच्या मते, जर बद्री क्षेत्रात शंख वाजवला गेला तर त्याचा ध्वनी बर्फामुळे प्रतिध्वनी निर्माण करेल. यामुळे बर्फाला तडे जाऊ शकतात. ऐवढेच नव्हे तर बर्फाचे वादळ सुद्धा येऊ शकते. असे झाल्यास तर नुकसान ही पोहचू शकते. शंखाच्या प्रतिध्वनीमुळे लँन्डस्लाइडचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टी लक्षात बद्रीनाथ येथे शंख वाजवला जात नाही.