बदलापूरच्या शाळेत २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलिस एन्काऊंटर मध्ये मारला गेला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्व-संरक्षणासाठी त्याला गोळ्या घालून ठार केलं अशी माहिती समोर आली आहे. पण अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलिस अधिकारी कोण आहेत? त्याचा एन्काऊंटर झाला कसा? जाणून घेऊया. आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांड म्हणजे चौकशीसाठी पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हे तेव्हा त्याच्या बाजूला बसले होते. तेव्हा अक्षय शिंदेने त्यांच्या कमरेवर असेलेली सर्विस रिवॉल्वर खेचून गोळ्याचालवण्याचा प्रयत्न केला. सर्विस रिवॉलव्हरमधून त्याने तीन गोळ्या झाडल्या सुद्धा. यात नीलेश मोरे गंभीर जखमी झाले. (Badlapur Rape Case)
तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या. या चकमकीमध्ये तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. अक्षय शिंदेंवर गोळ्या झाडणारे पोलिस अधिकारी संजय शिंदे यांची कारगिर्द रंजक आहे. संजय शिंदे यांनी याआधी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट यासाठी म्हटलं जातं कारण त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त एन्काऊंटर केले आहेत. गँगस्टर दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे देखील होते. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांना सहभागी केलं होतं. (Badlapur Rape Case)
संजय शिंदे यांच्यावर यापूर्वी आरोप सुद्धा झाले आहेत. एका खुनात पकडण्यात आलेला आरोपी विजय पालांडे याला पळून जाण्यास मदत केल्याचे आरोप संजय शिंदे यांच्यावर झाले होते. आरोपी विजय पलांडेच्या गाडीत संजय शिंदेचा Uniform सुद्धा सापडला होता. ज्यामुळे त्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं. २०१४ ला त्यांना पुन्हा ड्यूटीवर रुजू करण्यात आलं. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं दिसत आहे. विरोधीपक्षातील नेते महायुती सरकारवर कडकडून टीका करताना दिसतं आहेत. शरद पवार हे या एन्काऊंटरवर संशय व्यक्त केला आहे.” दोन चिमूरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झाली पाहिजे होती. आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे.” असं ते म्हणाले आहेत. (Badlapur Rape Case)
कॉंग्रेस प्रदेशाध्याकक्ष नाना पटोले यांनी या घटनेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
तर “मनोज जरांगे यांच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.” असं गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर “ज्या व्यक्तीने मुलींवर अत्याचार केला, ज्याने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले, अशाप्रकारच्या आरोपीची बाजू घेणे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. विरोधी पक्षाला बोलायचा काहीच अधिकार नाही. आरोपीला फाशी द्या असे तेच म्हणत होते. त्यामुळे आता त्यांनी असे बोलणे निंदनीय आहे. जे पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास कर्तव्यावर असतात, त्यांच्यावर विरोधकांनी आक्षेप घेणे दुर्दैवी आहे. पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा तपास होईल आणि समोर येईल. निवडणुकीचा याच्याशी संबंध नाही. विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. म्हणून ते असे आरोप करत आहेत,” असं या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं आहे. (Badlapur Rape Case)
==================
हे देखील वाचा : उरणमधील यशश्री हत्याकांड !
================
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात म्हणाले की, “आरोपी अक्षय शिंदे याच्या अगोदरच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी अक्षय शिंदे याला पोलीस नेत होते. यावेळी अक्षय शिंदे यानं सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. कोणीही पोलिसांवर बंदूक उचलेल, तर पोलीस काहीतर करतील ना,” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अक्षय शिंदे याच्या आई यावर बोलताना म्हणाली की, “माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो? असा प्रश्न त्याच्या आईने विचारला आहे. त्याला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर बदलापूरमध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे. (Badlapur Rape Case)