Home » रात्री झोपताना वाईट स्वप्न पडतात? उशीखाली ठेवा या गोष्टी

रात्री झोपताना वाईट स्वप्न पडतात? उशीखाली ठेवा या गोष्टी

प्रत्येकाला स्वप्न पडतात. काही स्वप्न चांगली असतात तर काही वाईट. हे मानले जाते की, स्वप्नांमधून आपल्याला काहीतरी संकेत मिळतात. पण वारंवार वाईट स्वप्न पडत असतील तर काय?

by Team Gajawaja
0 comment
bad dreams
Share

Bad Dreams : बहुतांशजणांना रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात. या स्वप्नांमुळे झोप मोड होते अथवा झोपेतच भीती वाटू लागते. यामुळे झोपही पूर्ण होत नाही. याशिवाय अशा वाईट स्वप्नांमुळे कोणत्याही गोष्टी करण्याचे मनं देखील होत नाही.

वास्तुशास्रात प्रत्येक गोष्टीवर उपाय सांगितला आहे. अशातच वास्तुशास्रानुसार वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यामुळे वाईट स्वप्न पडण्याची स्थिती दूर होईल आणि आयुष्यातील काही समस्यांचे समाधानही होईल. याबद्दलच जाणून घेऊया अधिक…

हनुमान चालीसा
शास्रानुसार हे म्हटले जाते की, रात्री झोपताना उशीखाली हनुमान चालीसा ठेवून झोपावे. यामुळे वाईट स्वप्न पडल्यानंतर वाटणारी भीती दूर होते. तसेच शांत झोप लागते.

कापूर
उशीखाली कापूर ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरेल. यामुळे शांत झोप लागेलच पण त्याचसोबत वाईट स्वप्नही पडणार नाहीत. याशिवाय ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो त्यांच्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरेल.

Troubled by bad dreams? Here are foods to eat and avoid to prevent nightmares | Health - Hindustan Times

फूलं कापडात बांधा
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एका कापडात काही फूलं बांधून ठेवावीत. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होतात. घरात शांतीचे वातावरण निर्माण होते. नातेसंबंध सुधारण्यासह घट्ट होतात.

बडीशेप
वाईट स्वप्न पडत असल्यास रात्री उशीखाली बडीशेप ठेवा. यामुळे नकारात्मक उर्जा दूर होतील. याशिवाय मानसिक समस्यांपासून तुम्हाला दूर राहता येईल. (Bad Dreams)

पितळेचा तांब्या
शास्रानुसार, जर तुम्हाला एखादी दुर्घटना घडतेय अशी स्वप्न अथवा एखाद्या दुर्घटनेचा सामना करत असल्यास अशा स्थितीत रात्री झोपताना डाव्या बाजूला पाण्याने भरलेला पितळेचा तांब्या ठेवा. यामुळे या काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाहीत.

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)


आणखी वाचा:
हिंदू धर्मात या पानांना मानले जाते पवित्र, देवाला अर्पण केल्याने मिळतो आशीर्वाद
काशी हे भारताचे नवे आर्थिक केंद्र
Vastu Tips For Home: घरात कुबेर यंत्र ठेवताय? या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा….

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.