Baby health care tips- लहान मुलांना आपल्याला काय वाटतेय हे बोलून दाखवता येत नाही. त्यामुळे ते वारंवार रडतात आणि आपण त्यांना शांत करण्यासाठी विविध उपाय करतो परंतु लहान मुलांमध्ये अशी काही लक्षण असतात त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आयुष्यभरासाठी त्या मुलाला त्या आजारासोबत जगावे लागते. खरंतर लहान मुलांना पण सध्या मधुमेह होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मधुमेह हा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे टाइम १ आणि दुसरा टाइप २ मधुमेह. टाइप १ मध्ये शरीर अजिबात इंसुलिन तयार करत नाही. तर टाइप २ मध्ये शरीर पुरेश्या प्रमाणात इंसुलिन तयार करते. टाइप १ मध्ये मधुमेहाची कारण हे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. परंतु काही रिसर्जनुसार असे समोर आले आहे की, जेनेटिक एक्सप्रेशन, इंफ्लोमेशन लेव्हल आणि काही प्रकरणात वायरल इंन्फेक्शनच्या कारणामुळे अशा प्रकारचा मधुमेह होतो.
टाइप १ मधुमेहात शरिरातील प्रमुख अवयव हे खराब होऊ शकतात. मुलांमध्ये टाइम १ मधुमेहचा धोका असो. त्यामुळे मुलाला हा आजार झाल्यास त्याला पुढील आयुष्यात सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो. रक्तातील साखर ही नियंत्रणात ठेवत मुलाला टाइप १ मधुमेहाच्या धोक्यापासून बचाव करु शकतो. त्यामुळे मधुमेहाची लक्षण योग्य वेळीच ओळखली तर ते नियंत्रणात ठेवता येईल. त्यामुळे जाणून घेऊयात मुलांमधील टाइप १ मधुमेहाची लक्षण आणि संकेतांबद्दल ज्याकडे कधीच दुर्लक्ष करु नका.
-वारंवार लघवी होणे
टाइप १ मधुमेहामधील सर्वाधत प्रमुख लक्षण म्हणजे वारंवार लघवी होणे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर रक्तात टॉक्सिक तत्व मिसळतात. अतिरिक्त साखर शरिरातून बाहेर काढत ती संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळेच आपली किडनी अधिक लघवी निर्माण करते आणि रुग्णाला वारंवार लघवी करण्यासाठी जावे लागते.
हे देखील वाचा- लहान मुलांना कोणत्या वयात मसाल्याचे पदार्थ खायला देणे सुरु करावे?
-खुप प्रमाणात तहान लागणे
वारंवार लघवी होत असल्याने शरिरात पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे पाण्याची शरिरातील कसर भरुन काढण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी प्यावे लागते आणि म्हणूनच तुमचे मुलं वारंवार तुमच्याकडे अधिक पाणी मागते. जर तुमचे मुलं घाईघाईत पाणी पित असेल तर डॉक्टरांसोबत याबद्दल चर्चा करा.
-अधिक थकवा जाणवणे
टाइप १ मधुमेह मध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. परंतु कोशिका याचा वापर करत नाहीत. यामुळे मुलाला थकवा जाणवू शकतो. अधिक आणि विनाकारण थकवा येणे ही टाइप १ मधुमेहाची लक्षण असू शकतात.(Baby health care tips)
-अंथरुण ओले करणे
बहुतांश वेळा असे दिसून येते की, रात्री झोपेतच मुलं अंथरुण ओले करतो. हे टाइप १ मधुमेहाचे संकेत असू शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने वारंवार लघवी होते. झोपेत मुलं लघवी करण्यासाठी जाऊ शकत नसल्याने ते अंथरुण ओले करते.
दरम्यान, एका अभ्यासानुसार टाइप १ मधुमेह असलेल्या मुलांमध्ये अन्य गंभीर आजारांची समस्या उद्भवू शकते. या व्यतिरिक्त मुलांमध्ये लहान मोठे आजार जसे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मुलांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांना आजारी वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांना संपर्क साधून योग्य वेळीच उपचार करा.