बाळाला जन्म देणे कोणत्याही आईसाठी सोप्पे नसते. असहाय्य दुखण्यानंतर जेव्हा आई मुलाच्या रडण्याचे आवाज ऐकते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो. जन्मानंतर प्रत्येक मुलं रडते किंवा त्याला जबरदस्तीने रडवले जाते. जी मुलं स्वत:हून रडत नाहीत त्यांना डॉक्टर रडवण्यासाठी मुलाच्या पाठीवर मारतात किंवा गळ्याचा भाग स्वच्छ करतात. असे मानले जाते की, नवजात मुलं हे सकाळच्या वेळेस दोन-तीन तास तरी झोपलेच पाहिजे. काही ठिकाणी लहान मुलांचे रडणे हे शुभ मानले जाते. अशातच आता प्रश्न उपस्थितीत होतो की, जन्मानंतर मुलं का रडते आणि त्यांचे रडणे का महत्वाचे असते? याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (Baby first cry)
मुलाचं रडण का गरजेचे असते?
मुलाचे रडणं हे ते जिवंत आणि स्वस्थ असल्याचे संकेत देतात. हेल्थलाइनच्या नुसार जन्मानंतर मुलाचे रडणे गरजेचे असते. त्यामुळे ते स्वस्थ असल्याचे कळते. याला फर्स्ट क्रायच्या नावाने ओळखले जाते. नऊ महिने गर्भात राहिल्यानंतर मुल जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येते तेव्हा वेगळ्या वातावरणात त्याला श्वास घेण्यास थोडी समस्या येते याच कारणामुळे ते रडते. तज्ञांचे असे मानणे आहे की, मुलाच्या रडण्याने त्याचे आतडे आणि हृदय योग्य काम करत असल्याचे संकेत देतात.

मुलाच्या रडण्याच्या गतिमुळे येतो अंदाज
मुलाच्या रडण्याने त्याचे हेल्थ किती उत्तम आहे हे दर्शवते. जर मुलं जन्मल्यानंतर जोरजोरात रडत असेल तर समजून जा की ते एकदम ठिक आहे. मात्र जर मुलं हळू आवाजात रडत असेल तर त्याचा अर्थ त्याला आरोग्यासंबंधित काही समस्या असू शकते. गर्भात असताना ते अम्बिलिकल कॉर्डच्या माध्यमातून श्वास घेत असते. पोटातून बाहेर आल्यानंतर जेव्हा मुलं स्वत:हून श्वास घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या श्वासाची नळी आणि तोंडातून फ्लूइड बाहेर पडतात. जेव्हा हे फ्लूइड बाहेर येत नाही तेव्हा सक्शन ट्युबच्या माध्यमातून ते बाहेर काढले जातात. त्यानंतर मुलं रडते. काही प्रकरणी मुलाचे न रडणे म्हणजे ते मृत असल्याचे ही समजले जाते. (Baby first cry)
हे देखील वाचा- रात्रभर तुमचे मुलं झोपत नाही? ‘हे’ उपाय वापरुन पहा
आईच्या स्पर्शामुळे मिळतो दिलासा
आईच्या पोटात मुलं नऊ महिने सुरक्षित असते. जन्मानतर त्याला बाहेरची वातावरण आपल्यासोबत मिळतेजुळते करुन घेण्यासाठी खुप वेळ लागतो. काही वेळेस मुलं जन्मल्यानंतर २४ तासापर्यंत शांत राहते. नव्या वातावरणामुळे मुलं घाबरते. अशातच आईच्या स्पर्शामुळे त्याला दिलासा मिळतो. याच कारणामुळे मुलं जन्मल्यानंतर ते प्रथम आईच्या हातात दिले जाते. जेव्हा आई आपल्या मुलाला प्रथम अंगावरचे दुध देते तेव्हा मुलाला ताकद येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.