भारतीय क्रिकेटवीर विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. विराट एकापाठोपाठ एक शतक ठोकतोय. अनेक विक्रम त्याच्या नावावर जमा होत आहेत. विराटची ही विराट खेळी काही वर्षानंतर त्याच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे आणि त्यामुळे ते सुखावत आहेत. विराटच्या (Virat Kohli) या खेळीसाठी त्याची मेहनत आणि अजून एका गोष्टीचा समावेश असल्याची आता चर्चा आहे. ती गोष्ट म्हणजे नीम करोली बाबांचा आशीर्वाद. काही दिवसांपूर्वी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी नीम करोली बाबांच्या आश्रमाला भेट दिली. फक्त भेटच दिली नाही तर विराटनं तिथे ध्यानधारणा केल्याचीही माहिती आहे. नीम करोली बाबांच्या आशीर्वादामुळेच विराटचा फॉर्म परत आला असून तो नवीन विक्रम करत असल्याचे त्याचे चाहत्यांना वाटते. यामुळे सोशल मिडीयावर नीम करोली बाबांबाबतही उत्सुकता वाढली आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. विराटने 88 चेंडूत 113 धावांची विक्रमी खेळी साकारली. या सामन्यात 45 वे वनडे शतक झळकावणाऱ्या कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विराटने शतक पूर्ण करताच नीम करोली बाबांचे नाव देखील सोशल मिडियावर चर्चेत आले आहे. नीम करोली बाबा कधीही त्यांच्या भक्तांच्या मागे उभे राहतात. विराटनं हे शतकही नीम करोली बाबांच्या आशीर्वादामुळेच साकारल्याचे त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे. नीम करोली बाबांच्या भक्तांमध्ये केवळ भारतीयच नाही तर परदेशी लोकांचाही समावेश आहे. बॉलीवूड, हॉलिवूडसह अनेक बडे राजकारणी नीम करोली बाबांच्या दारात नतमस्तक होण्यासाठी येतात.
नीम करोली बाबांच्या आश्रमाला भेट देऊन आल्यावर विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिल्या मालिकेत 3 सामन्यात 2 शतकांसह 283 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध संपलेल्या मालिकेत तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला आणि त्याने 74 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावून क्रिकेटचे अनेक विक्रमही मोडीत काढले. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत. विराट एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा 5 वा फलंदाज ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीसाठी (Virat Kohli) 2019 मध्ये सुरू झालेला फलंदाजीचा संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या शतकानंतर विराट कोहलीने आपल्या दुसऱ्या शतकासाठी हजाराहून अधिक दिवस वाट पाहिली आणि यादरम्यान अनेक चढउतार पाहिले. भारताचा कर्णधार असलेल्या विराटला अनेकवेळा निवृत्तीचाही सल्ला मिळालाय. मात्र त्याच विराटने तीन सामन्यांमध्ये दोन शतके झळकावल्यामुळे भारताने अंतिम एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करून मालिका 3-0 अशी जिंकली. एकदिवसीय विश्वचषकाच्या वर्षाची ही एक आदर्श सुरुवात असल्याचे विराटनं सांगितलं आहे. आता विराट फॉर्ममध्ये परतला असून यासोबतच तो 100 शतकांचा टप्पाही सरज पार करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. याला कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का यांनी उत्तराखंड येथील बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली. ही भेटच विराटच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. नीम करोली बाबांना त्यांचे भक्त हनुमानजीचा अवतार मानतात.
नीम करोली बाबांचे खरे नाव लक्ष्मीनारायण शर्मा होते. त्यांचा जन्म 1900 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील अकबरपूर गावात झाला. 1958 मध्ये बाबांनी आपले घर सोडले आणि संपूर्ण उत्तर भारतात भ्रमण केले. त्या काळात ते लक्ष्मण दास, हंडी वाले बाबा आणि तिकोनिया वाले बाबा अशा अनेक नावांनी ओळखले जात होते. बाबांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते, एकदा बाबा फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास करत होते. तिकीट तपासनीस आला तेव्हा बाबांकडे तिकीट नव्हते. मग बाबांना ट्रेनमधून पुढचे स्टेशन ‘नीब करोली’ येथे उतरवण्यात आले. यावेळी काठी जमिनीत गाडून बाबा थोड्या अंतरावर बसले. अधिकाऱ्यांनी ट्रेन सोडण्याचा आदेश दिला आणि गार्डने ट्रेनला झेंडा दाखवला, पण ट्रेन आपल्या जागेपासून एक इंचही पुढे सरकली नाही. खूप प्रयत्न करूनही जेव्हा ट्रेन सुरू झाली नाही तेव्हा बाबांना ओळखणाऱ्या स्थानिक दंडाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांना बाबांची माफी मागून आदराने आत आणण्यास सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बाबांची माफी मागितली आणि त्यांना आदराने ट्रेनमध्ये बसवले. बाबा ट्रेनमध्ये बसताच ट्रेन सुरु झाली. तेव्हापासून बाबांचे नाव नीम करोली बाबा पडले.
=======
हे देखील वाचा : महाराष्ट्रात Rapido ची सर्विस बंद करण्याचे बॉम्बे हायकोर्टाचे आदेश, नेमके काय आहे प्रकरण?
=======
बाबा नीम करोली प्रथमच 1961 मध्ये उत्तराखंडच्या नैनिताल जवळ कैंची धाम येथे आले होते. त्यांनी त्यांचे जुने मित्र पूर्णानंद जी यांच्यासोबत येथे आश्रम बांधण्याचा विचार केला होता. बाबा नीम करौली यांनी 1964 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. नीम करोली बाबांची समाधी नैनितालजवळील पंतनगरमध्ये आहे. ही अशी जागा आहे जिथे इच्छा घेऊन जाणारा कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही. येथे बाबांची समाधीही आहे. बाबा कडुनिंब करौली यांची भव्य मूर्तीही येथे बसवण्यात आली आहे. येथे हनुमानजींची मूर्तीही आहे. अॅपलचे मालक स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग आणि हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हे नीम करोली बाबाच्या भक्तांमध्ये आहेत. नीम करोली बाबांच्या आश्रमाला भेट दिल्यावर त्यांचे आयुष्यच बदलून गेल्याचे सांगितले जाते. कैंची धाम येथे 15 जून रोजी नीम करोली बाबांच्या आश्रमात मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी बाबा नीम करौलींचे भक्त देश-विदेशातून येथे येतात. या धाममध्ये बाबा नीम करौली हा हनुमानाचा अवतार मानला जातो. या ठिकाणी बाबांच्या भक्तांनी हनुमानाचे भव्य मंदिर बांधले आहे. बाबा नीम करोली हे हनुमानजींचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी देशभरात हनुमानजींची अनेक मंदिरे बांधली आहेत.
रिचर्ड अल्पर्ट (रामदास) यांनी नीम करोली बाबाच्या चमत्कारांवर ‘मिरॅकल ऑफ लव्ह’ नावाचे पुस्तक लिहिले. बाबा नेहमी घोंगडी पांघरायचे. आजही लोक जेव्हा त्यांच्या मंदिरात जातात तेव्हा त्यांना ब्लँकेट अर्पण करतात. आता याच निम करोरी बाबांच्या भक्तांमध्ये विराट कोहली आणि अनुष्काचाही समावेश झाला आहे.
सई बने…