Home » Baba Wanga : अपघातांची मालिका आणि बाबा वांगाची भविष्यवाणी !

Baba Wanga : अपघातांची मालिका आणि बाबा वांगाची भविष्यवाणी !

by Team Gajawaja
0 comment
Baba Wanga
Share

2025 वर्ष सुरु होण्याआधी बल्गेरियाच्या भविष्यवक्त्या बाबा वांगा यांच्या भीतीदायक भविष्यवाणींची एक मालिकाच पुढे आली. त्यांच्या भविष्यानुसार 2025 हे वर्ष सर्वाधिक अपघातांचे, नैसर्गिक आपत्तींचे, गृहयुद्धाचे, लढाईचे जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला या भविष्यवाणीकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. मात्र आता या वर्षाच्या मध्यावर आल्यावर बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीतील चार भयानक भाकीत खरी झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीतील इतर भाकीतेही खरी होणार की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Baba Wanga)

नवं वर्ष सुरु होण्याआधी दोन महिने आणि त्यानंतरचे दोन महिने एक नाव कायम चर्चेत असतं, ते म्हणजे, बाबा वांगा. बल्गेरियाच्या या भविष्यवक्त्यांची भाकीते किती सटिक आहेत, हे सांगण्यात येतं. अर्थात हे चार महिने सोडले तर बाबा वांगा यांची आठवण शक्यतो होत नाही. मात्र 2025 हे वर्ष काहीसे वेगळेच आहे. या वर्षी प्रत्येक महिन्याला बाबा वांगा यांची आठवण काढण्यात येत आहे. त्याला कारण ठरले आहे ते त्यांचे अचूक भविष्य. बाबा वांगा यांना ‘बाल्कनचा नोस्ट्राडेमस’ म्हणूनही ओळखले जाते. (Baba Wanga)

1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, मात्र त्यांनी सांगितलेली भाकीते एक पुस्तकरुपानं सुरक्षित आहेत. बाबा वांगा यांनी 2025 मध्ये अवेळी आलेल्या पावसानं शेतपीकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता सांगितली होती. तसेच ट्रेन आणि विमानांचे मोठे अपघात होण्याचे भविष्यही सांगितले होते. याशिवाय विमान अपघातात एका मोठ्या नेत्याचा मृत्यू होण्याचे भाकीतही त्यांनी व्यक्त केले होते. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात, विमानातील प्रवाशांसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाबा वांगा यांची भविष्यवाणी अचूक होती, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबत त्यांनी 2025 या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांसाठी सांगितेल्या भाकीतांचीही चर्चा सुरु झाली आहे. (International News)

ही भाकीते अतिशय भीतीदायक असून ती खरी झाली तर मोठी वित्तहानी आणि मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. यातील पहिले भाकीत हे जपानबाबत आहे. जपानमध्ये आत्तापर्यंत झालेल्या भूकंपातील सर्वात मोठा भूकंप जुलै महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार हा विनाशकारी भूकंप जपानजवळील समुद्रात होईल, यामुळे खूप मोठ्या लाटा उसळतील आणि जपानचा मोठा भूभाग त्याखाली येईल, असे बाबा वांगा यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, जपानच्या मंगा आर्टिस्ट रियो तात्सुकी यांनीही अशाचप्रकारचे भाकीत केले आहे. त्यामुळे जपानमध्ये जुलै महिन्यासाठी जाणा-या बहुसंख्य पर्यटकांना आपले बुकींग रद्द केले आहे. या भविष्यवाणीची एवढी दहशत जपानमध्ये पसरली आहे की, येथील समुद्रकिना-यावरील हॉटेलही खाली करण्यास सुरुवात झाली आहे. (Baba Wanga)

यासोबतच बाबा वांगा यांनी यावर्षी जागतिक आर्थिक मंदीचे संकेतही दिले आहेत. विशेषतः युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल असे संकेत त्यांनी आपल्या भविष्यवाणीमधून दिले आहेत. बाबा वांगा यांच्या सर्वात चर्चित भविष्यवाणी पैकी एक भविष्यवाणी म्हणजे, यावर्षी मानवाचा परग्रहींबरोबर संवाद होणार आहे. त्यांच्या भविष्यानुसार यावर्षी परग्रही पृथ्वीवर येणार असून ते मानवासोबत बोलू शकणार आहेत. या भविष्यवाणीवर अनेक मीम्सही करण्यात आले आहेत. यासोबतच बाबा वांगा यांनी कोरोना रोगाचा पुन्हा उद्रेक होणार असल्याचे सांगितले होते, त्यानुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या नव्यानं वाढत आहे. (International News)

===========

हे देखील वाचा :  Plane Crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातात भारतातील ‘या’ दिग्गज लोकांचा झाला मृत्यू

Fusarium graminearum : चीनकडून येतोय, कोरोनापेक्षा मोठा धोका !

===========

बाबा वांगा यांची ही भविष्यवाणी गाजत असतांना भारतीय ज्योतिषांनीही 2025 बाबत सांगितलेली भाकीते गाजत आहेत. विशेषतः अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या भीषण अपघातानंतर मंगळ आणि राहूचा अशुभ संयोग याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की, हे अशुभ योग युद्ध, हिंसाचार आणि आगीसारख्या घटनांना उत्तेजन देतात. त्यात पहलगाव हल्ला झाला, आणि आता अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातही याच योगात झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यातही 7 जूनपासून शनि-मंगळाचा षडाष्टक योगही तयार झाला आहे. हा योग 28 जुलैपर्यंत रहाणार आहे. यामध्ये आग, युद्ध आणि हिंसाचार वाढणार असल्याचे सांगण्यात येते. अहमदाबाद अपघातानंतर आता इस्रायल-इऱाणमध्ये सुरु झालेले युद्धही याच योगात असल्यानं जगभरच 28 जुलैपर्यंत मोठे अपघात आणि अशांत करणा-या घटना होणार असल्याचे भारतातील भविष्यवक्त्यांनी सांगितले आहे. (Baba Wanga)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.