Baba Vanga Prediction- संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले बाबा वेंगा यांच्या काही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी दुसरे महायुद्ध ते १९६६ मध्ये आपल्या मृत्यूची भविष्यवाणी सुद्धा फार गाजली होती. मात्र आता ही बुल्गेरियातील या रहस्यवादी बाबा वेंगा यांना त्यांच्या भविष्यवाणीसाठी ओळखले जाते. असे म्हटले जाते की, बाबा वेंगा यांनी आपल्या अनुयायांना ५०७९ पर्यंत भविष्यवाणी केली होती. त्यांच्या अनुयायांचे असे मानणे आहे की, बाबा वेंगाने ९/११ ते डोनाल्ड ट्रंम्प हे राष्ट्राध्यक्ष होतील याची सुद्धा भविष्यवाणी केली होती.
अशातच बाबा वेंगा यांनी २०२२ आणि २०२३ साठी काही भविष्यवाणी केली होती. आता त्या किती खऱ्या निघतात किंवा किती खोट्या हे येणाऱ्या वर्षात कळेल. बाबा वेंगा यांनी अधिकृत रुपात आपल्या भविष्यवाणी कधीच रेकॉर्ड केल्या नाहीत. त्यामुळे यावरुन नेहमीच वाद होतो की, त्यांनी वास्तवात काय म्हटले होते आणि काय नाही. दरम्यान, काही भविष्यवाणी अशा आहेत ज्या येणाऱ्या वर्षासंदर्भात आहेत. तर याच भविष्यवाण्यांसंदर्भात जाणून घेऊयात.
एक विनाशकारी सौर वादळ?
बाबा वेंगा यांनी २०२३ साठी काही सर्वाधिक चिंताजनक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांनी एक सौर वादळाबद्दल भविष्यवाणी केली होती जी विनाशाचे कारण ठरु शकते. सौर वादळ म्हणजेच सूर्यामधून निघालेल्या उर्जेचा स्फोट. ज्यामुळे काही प्रकारचे धोकादायक रेडिएशन पृथ्वीवर येतील याचा प्रभाव कोटींच्या संख्येने असलेल्या परमाणू बॉम्ब ऐवढा शक्तीशाली असणार आहे.
पृथ्वीवर एलियंस येऊ शकतात
२०२३ साठी बाबा वेंगा यांनी आणखी एक भविष्यवाणी केली होती त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, एलियंस पृथ्वीवर येऊ शकतात. त्यांच्यानुसार, जग अंधारात जाऊ शकते. त्यांनी दावा केला होता की, जर पुढील वर्षात एलियंस पृथ्वीवर आल्यास तर लाखो लोकांचा मृत्यू होईल आणि मुलं प्रयोगशाळेत जन्माला येतील. विज्ञानात सातत्याने होणाऱ्या प्रगतीमुळे लॅबमध्ये लहान मुलं जन्माला येऊ शकतात असे बाबा वेंगांनी म्हटले होते.(Baba Vanga Prediction)
हे देखील वाचा- एलन मस्क यांनी आपल्या आत्महत्येबद्दल का सांगितले, ‘हे’ आहे मोठे कारण
पृथ्वीच्या कक्षेत बदल होईल?
बाबा वेंगा यांनी २०२३ साठी जी भविष्यवाणी केली होती त्यापैकी असे ही म्हटले की, सूर्याच्या चारही बाजूला फिरणारी पृथ्वी २०२३ मध्ये आपला मार्ग बदलू शकते. पृथ्वीपर प्रत्येक वर्षी सूर्य चहूबाजूंना फिरत ५८४ मिलियन मील अंतर पार करतो. हा एक प्रवास गोलाकार नसून अंडाकार असायचा. याच कारणास्तव अन्य ग्रहांचे गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव पडतो. ज्याचा अर्थ असा की, पृथ्वीच्या कक्षेत बदल होऊ शकतो. अशा प्रकारचे काही बदल हजारो वर्षांमध्य एकदा होतात. जर पृथ्वीच्या कक्षेत हलका जरी बदल झाला तरी याचे गंभीर प्रभाव पडू शकतात.