बाहुबली सिनेमामुळे चर्चेत आलेला साउथचा सुपरस्टार प्रभास सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकतर आपला आपकमिंग सिनेमा ‘सालर’ आणि दुसरा म्हणजे कर्नाटकात तयार करण्यात आलेला त्याचा मेणाचा स्टॅच्यू. प्रभाससाठी हा स्टॅच्यू सोशल मीडियात व्हायरल होत आहे. स्टॅच्यूवरून आता खुप वाद सुरु झाला आहे. बाहुबलीचे प्रोड्युसर शोबू यार्लागद्दाने यावर अॅक्शन घ्यावी असे म्हटले आहे. तर जाणून घेऊयात नेमके प्रकरण काय आहे. (Baahubali actor prabhas)
प्रभासचा सिनेमा बाहुबली मधून प्रेरणा घेत कर्नाटकातील एका म्युजियममध्ये त्याचा एक वॅक्स स्टॅच्यू तयार करण्यात आला आहे. संपूर्ण वाद हा या स्टॅच्युमुळेच निर्माण झाला आहे. शोबू यार्लागद्दा यांनी प्रभासच्या या स्टॅच्युवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, हा स्टॅच्यू चुकीच्या प्रकारे तयार करण्यात आलेला आहे.यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. ट्विट करत त्यांनी असे म्हटले जाते. हे अधिकृतरिपातील लाइसेंस वर्क नाही. यासाठी आमची परवानगी घेण्यात आली नव्हती. हा स्टॅच्यू हटवण्यासाठी आम्ही तातडीने अॅक्शन घेऊ.
This not an officially licensed work and was done without our permission or knowledge. We will be taking immediate steps to get this removed. https://t.co/1SDRXdgdpi
— Shobu Yarlagadda (@Shobu_) September 25, 2023
प्रभासच्या या वॅक्स स्टॅच्यूवर सोशल मीडियात युजर्स ही विविध कमेंट्स करत आहेत. एका युजरने असे लिहिले आहे की, प्रभासचा हा स्टॅच्यू केवळ बाहुबलीच्या कवचामुळे ओखळला जातो. तर दुसऱ्याने म्हटले की, प्रभास पेक्षा तो फार वेगळा आहे. एका युजरने लिहिले की, तो राम चरण प्रमाणे दिसत आहे. (Baahubali actor prabhas)
प्रभासच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच सालार मुळे खुप चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र तो पोस्टपॉन्ड करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा आता डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त कल्की २८९८ एडी मध्ये सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
हेही वाचा- माझा तिच्यासोबत मृत्यू झालायं.. मुलीच्या मृत्यूनंतर ‘या’ अभिनेत्याचे वक्तव चर्चेत