बॉलिवूड मधील अभिनेत्री जूही चावलाचा एक जुना इंटरव्यू सध्या चर्चेत आहे. त्यात तिने करिश्मा कपूर ते माधुरी दीक्षित बद्दलच्या काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यात तिने असे म्हटले आहे की, तिने अशा सिनेमांसाठी नकार दिली जे नंतर रुपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरले. ऐवढेच नव्हे तर अभिनेत्रीने राइवलरीचा सुद्धा उल्लेख केला आहे. (B-Town News)
जूही चावलाने आपल्या करियरची सुरुवात १९८६ मध्ये सिनेमा ‘सल्तनत’ पासून केली होती. त्यानंतर तिने काही हिट सिनेमे दिले. त्यामध्ये तिने ‘कयामत ते कयामत तक’, ‘राजू बन गया जेंटलमैन, ‘लुटेरे’, ‘हम हैं राही प्यार के’ सह काही सिनेमे केले. आता अभिनेत्री खुलासा केला आहे की, तिने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षित सोबत काम करण्यासाठी नकार का दिला होता.
रेडिफवर जुहीचा एक जुना इंटरव्यू खरंतर व्हायरल झाला होता. त्यात तिने त्या सिनेमांचा उल्लेलख केला ज्यासाठीते करण्यासाठी नकार दिला होता. पण नंतर तेच सिनेमे हिट झाले. जुही आणि मधुरीने ‘गुलाबी गँग’ मध्ये एकत्रित काम केले होते. इंटरव्यूमध्ये असे म्हटले होते दिल तो पागल है मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. पण तिने ती नाकारली.
करिश्माच्या स्टारडममागे जूही चावला
जूही चावलाने खुलासा केला की, त्यावेळी माधुरीसोबत तिला सेकेंड लीड करायचे नव्हते. त्यावेळी एक वेगळच जग होते. जेव्हा तुम्ही विचार न करता काही निर्णय घेता. जूहीने म्हटले की, तिने राजा हिंदूस्तानी, जुदाई सुद्धा रिजेक्ट केला होता. हे सिनेमे सुद्धा ब्लॉकबस्टर ठरले होते. करिश्मा कपूरच्या स्टारडमसाठी मी जबाबदार आहे असे ही जूहीने म्हटले. (B-Town News)
या अभिनेत्रींमध्ये होती राइवलरी
जूहीच्या इंटरव्यूमध्ये तिने माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, मनीषा कोइराला, रवीना टंडन आणि ती स्वत: त्यावेळी राइव्ल्स होते. ही राइवलरी काही वर्षे होती. केवळ कधीकधीच संधी मिळायची. जेथे केवळ हाय-हॅलो व्हायचे. त्यापेक्षा अधिक काहीही नव्हते. अभिनेत्रीच्या मते, सर्वांनी सोलो हिरोइन असणारे सिनेमे केले. फार कमी असे झाले असेल की, दोन्ही अभिनेत्रींनी एकत्रित काम केले. कारण दोघींची तुलना सातत्याने केली जायची.
हेही वाचा- शाहरूख खानकडे जेव्हा पत्नी गौरीला हनिमूनला नेण्यासाठी नव्हते पैसे तेव्हा…