Home » जॉन अब्राहमची ‘ही’ चुक ठरली बिपाशासोबतच्या ब्रेकअपचे कारण

जॉन अब्राहमची ‘ही’ चुक ठरली बिपाशासोबतच्या ब्रेकअपचे कारण

एकेकाळी बिपाशा आणि जॉन एकमेकांना डेट करत होते. दोघांनी लव्ह स्टोरी फार रोमँन्टिक होतीच. पण बिपाशा व जॉनचे ब्रेकअप देखील तितकेच सर्वांना हैराण करणारे होते.

by Team Gajawaja
0 comment
B-Town Gossip
Share

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशी बासू तिचे आयुष्य अत्यंत आनंदाने जगत आहे. बिपाशी मुलीसह नवऱ्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत असते. दुसऱ्या बाजूला जॉन अब्राहमही आपल्या पत्नीसोबत हॅप्पी मॅरिड लाइफ आनंदीत घालवतोय. पण हे जगजाहिर आहे की, एकेकाळी बिपाशा आणि जॉन एकमेकांना डेट करत होते. दोघांनी लव्ह स्टोरी फार रोमँन्टिक होतीच. पण बिपाशा व जॉनचे ब्रेकअप देखील तितकेच सर्वांना हैराण करणारे होते. एका रात्रीच्या चुकीमुळे बिपाशाने जॉनसोबतचे नाते मोडण्याचा निर्णय घेतला होता. अखेर ते कारण कोणते होते याच बद्दल जाणून घेऊया… (B-Town Gossip)

बी-टाउनसह देशभरात जॉन-बिपाशाच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा फार केल्या जायच्या. दोघांनी एकमेकांना 9 वर्ष डेट केले. याशिवाय बिपाशा-जॉनला वेगवेगळ्या कार्यक्रम, पार्टीमध्येही एकत्रित पाहिले गेले. मात्र या दोघांची लव्ह स्टोरी एका कथाप्रमाणे अधुरी राहिली. बिपाशा आणि जॉनचे नाते मोडण्यामागे कारण ठरली ती एक महिला, एक ट्विट आणि नव्या वर्षाच्या रात्री केलेली ती एक चूक.

बिपाशा बसु और जॉन अब्राहम का 9 साल का प्यार, जानें लिव में रहने के बाद भी क्यों नहीं की शादी | bipasha basu and john abraham 9 years love know why

खरंतर जॉन अब्राहमच्या एका चुकीनंतर जॉन आणि बिपाशा वेगळे झाले. या बिपाशा-जॉनच्या रिलेशिनशिपबद्दल नेहमीच बोलले जायचे. या दोघांचे एकमेकांसोबत उत्तम पटायचे. सर्वत्र चर्चा केली जात होती, बिपाशा आणि जॉन लवकरत एकमेकांसोबत लग्नगाठ बांधतील. पण एकेदिवशी अचानक या दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आणि सर्वजण हैराण झाले.

रिपोर्ट्सनुसार, जॉनच्या एका चुकीमुळे बिपाशाने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. खरंतर ही घटना 2014 मधील असून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीदरम्यानची आहे. जॉनने एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये असे म्हटले होते, ‘यंदाच्या वर्षात तुमच्या आयुष्यात खुप प्रेम आणि आनंद-उत्साह येऊ दे…. लव्ह जॉन प्रिया अब्राहम’. जॉनने हे ट्विट चुकून केले होते. ट्विट समोर येताच सर्वजण हैराण झाले होते. ट्विटनंतर जॉन आणि बिपाशाचे नाते मोडले गेले.(B-Town Gossip)

असे म्हटले जाते, जॉननचे हे ट्विट समोर आल्यानंतर बिपाशाला कळले की, जॉन तिला फसवत आहे. जॉनची प्रिया रुंचल नावाची एक एनआरआय गर्लफ्रेंड आहे. बिपाशाला जॉनने फसवल्याने तिने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अचानक बातम्या समोर आल्या, बिपाशा आणि जॉनचे नाते मोडले गेलेयं. दोघांनी आपले मार्ग बदलले. यानंतर जॉनने 2014 मध्येच प्रिया रुंचाल हिच्यासोबत लग्न केले. बिपाशाने 2016 मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोवर सोबत विवाह केला.


हेही वाचा: सनी देओलच्या अफेरच्या अफवांमुळे त्रस्त असायची पत्नी, अभिनेत्याने केला खुलासा


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.