Home » प्रोडक्शन हाउस तर कधी एक्टिंग स्कूल, ‘या’ कलाकारांनी केलाय आर्थिक तंगीचा सामना

प्रोडक्शन हाउस तर कधी एक्टिंग स्कूल, ‘या’ कलाकारांनी केलाय आर्थिक तंगीचा सामना

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक वरचढ कलाकार आहेत. पण एका उच्च स्तरावर पोहचल्यानंतर सुद्धा काही कलाकार असे आहेत ज्यांना आपल्या खासगी आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता.

by Team Gajawaja
0 comment
B-Town Actors
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक वरचढ कलाकार आहेत. पण एका उच्च स्तरावर पोहचल्यानंतर सुद्धा काही कलाकार असे आहेत ज्यांना आपल्या खासगी आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. या लिस्टमध्ये काही कलाकारांची नावे आहेत. ती ऐकल्यानंतर तुम्ही खरंतर हैराण व्हाल. असे कोणते कलाकार आहेत ज्यांनी आर्थिक तंगीचा सामना केला आहे आणि ते यामधून कसे बाहेर पडले याच बद्दल जाणून घेऊयात. (B-Town Actors)

-प्रिती जिंटा

Preity G Zinta
या लिस्टमध्ये पहिले नाव प्रिती जिंटाचे आहे. प्रितीने जीन सोबत लग्न केल्यानंतर परदेशात स्थायिक झाली. या दरम्यान ती भारताबाहेरच होती. पण बॉलिवूमध्ये प्रसिद्धी आणि प्रेम मिळवलेल्या प्रितीला सुद्धा आपल्या खासगी आयुष्यात आर्थिक समस्येचा सामना करावा लागला होता. ही वेळ तेव्हा आली जेव्हा ती अभिनेत्रीवरुन प्रोड्युसर झाली. तिचा सिनेमा ‘इश्क इन पॅरिस’फ्लॉप झाला. स्थिती अशी झाली होती की, क्रू मेंबर्सला पैसे देण्यासाठी तिच्याकडे ते शिल्लक राहिले नाहीत. त्यानंतर सलमानने तिची यासाठी मदत केली.

-अनुपम खेर

Anupam Kher Not Buy A House In Mumbai| अनुपम खेर में मुंबई में इसलिए नहीं  खरीदा घर| Anupam Kher Ne Mumbai Me Kyo Nahi Khareeda Ghar | why anupam kher  never bought
अनुपम खेर आपल्या अभिनयासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ओळखले जातात. त्यांनी अनेक दमदार सिनेमे केले आहेत. पण एका जुन्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, जो पर्यंत ते कलाकार होते तो पर्यंत सर्वकाही व्यवस्थितीत होते. पण जेव्हा सिनेमे प्रोड्युस करू लागले तेव्हा बँकरप्ट झाले होते. त्यांनी आर्थिक तंगीपासून सुटका व्हावी म्हणून त्यांनी एक्टिंग स्कूल सुरु केली होती.

-शाहरूख खान

10 emotional pleas made by Shah Rukh Khan to Wankhede in his chats |  Bollywood - Hindustan Times
बॉलिवूडचा बादशाह, किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूखला सुद्धा आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. जेव्हा त्याने ‘रा वन’ हा सिनेमा तयार केला होता. यासाठी १५० कोटी रुपये लावले होते. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा आपटला. सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर शाहरूखला आर्थिक संकटात सापडला होता. (B-Town Actors)

-गोविंदा

Govinda says he has 'suffered enough' professionally, claims his Twitter  account was hacked by people with 'agendas' | Bollywood News - The Indian  Express
गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याचे सिनेमे हिट होत नव्हते. याच कारणास्तव तो अत्यंत वाईट स्थितीतून जात होता. ऐवढेच नव्हे तर अशी वेळ सुद्धा आली होती जेव्हा त्याला सिनेमे मिळणे बंद झाले होते. याच कारणास्तव त्याच्यावर फार कर्ज झाले होते. त्याच्या मदतीसाठी सुद्धा सलमान खानने हात पुढे केला होता.

-श्वेता बसु प्रसाद

इस स्कैंडल में फंसी थीं श्वेता बसु प्रसाद, 2 महीने रेस्क्यू होम में गुजारने  के बाद एक्ट्रेस ने बताया था सच
‘मकडी’ सिनेमातून लोकांच्या मनात घर करणारी चाइल्ड अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद हिला सुद्धा आर्थिक समस्येचा सामना करावा लागला होता. एका रिपोर्ट्सनुसार, आर्थिक तंगीच्या कारणास्तव तिला वैश्याव्यवसायाप्रकरणी अटक करण्यात आली होती. रिपोर्ट्समध्ये असे सुद्धा म्हटले होते की, श्वेताने हे पाऊल आपल्या आर्थिक तंगीला दूर करण्यासाठी उचलले होते.


हेही वाचा- जुही चावला म्हणते ‘माझ्यामुळे स्टार झाली’ करिश्मा कपूर


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.