Home » आयुष्मान म्हणतोय ‘जागतिक सिनेमांआधी आपल्या चित्रपटांना जाणून घेणं गरजेचं’

आयुष्मान म्हणतोय ‘जागतिक सिनेमांआधी आपल्या चित्रपटांना जाणून घेणं गरजेचं’

by Team Gajawaja
0 comment
Ayushmann Khurrana
Share

बॉलिवूडमध्ये प्रतिभावान अभिनेता म्हणून आयुष्यमान खुराणा(Ayushmann Khurrana) ओळखला जातो. इंडस्ट्री बाहेरून येउन आयुष्यमानने त्याचे पक्के आणि अढळ स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले. स्मॉल बजेट चित्रपटांना एक उत्तम ओळख मिळवून देण्यात आयुष्यमानचा मोठा वाटा आहे. आज आयुष्यमानने जे नाव आणि ओळख कमावली आहे ती केवळ आणि केवळ स्मॉल बजेट चित्रपटांच्या जोरावर. आयुष्यमानने त्याच्या दहा वर्षाच्या करिअरमध्ये जवळपास सर्वच हिट सिनेमे दिले आहेत. गायक, संगीतकार, गीतकार, रेडिओ जॉकी आदी अनेक क्षेत्रात आपल्या ठसा उमटवणाऱ्या आयुष्यमानचा लवकरच ‘अनेक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अतिशय वेगळा विषय असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आयुष्यमानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, सर्वच प्रेक्षक त्याचे कौतुक करताना दिसत आहे. 

नॉर्थ-ईस्टला राहणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला फिरणारी कथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नॉर्थ-ईस्ट मध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्यांना प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आणि आयुष्यमानने केला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि आयुष्मान खुराना(Ayushmann Khurrana) यांनी या चित्रपटाच्या आधी ‘आर्टिकल 15’ मध्ये एकत्र काम केले होते. 

सध्या आयुष्यमान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम ‘अनेक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान आयुष्यमानने मीडियाला एक मुलाखती दिली ज्यात त्याने कमर्शियल आणि विशिष्ट मुद्दयावर आधारित चित्रपटांबद्दल त्याचे मत मांडले. तो म्हणाला की, “ड्रीम गर्ल, बधाई हो, बाला हे सिनेमे हलके फुलके सिनेमे होते. ‘एन एक्शन हीरो’ हा एक कमर्शियल सिनेमा होता. आपल्याला कमर्शियल चित्रपटांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कारण ‘अनेक’ आणि ‘आर्टिकल 15’ सारख्या चित्रपटांना समर्थन मिळेल. कारण तेव्हाच आमच्या सारख्या अभिनेत्यांना आपल्या हिट चित्रपटांना सोडून ‘अनेक’ आणि ‘आर्टिकल 15’ असे पठडीबाहेरील सिनेमे करायला हिंमत मिळेल. आणि माझ्या मते असे संतुलन असणे खूपच आवश्यक आहे. मला माहित आहे की, ‘अनेक’ हा कमर्शियल सिनेमा नाही आणि नाही तो १०० कोटीच्या क्लबमध्ये जाणारा सिनेमा आहे, मात्र हा एक खूपच महत्वाचा सामाजिक सिनेमा आहे.”(Ayushmann Khurrana)

जेव्हा आयुष्यमानला विचारले गेले की, त्याला स्वतःला चित्रपटगृहांमध्ये काय पाहायला जास्त आवडते? त्यावर तो म्हणाला की, “मी सर्वच प्रकारचे सिनेमे बघतो. मला मल्याळम सिनेमे देखील खूप आवडतात. मी फहद फासिल यांचा मोठा फॅन आहे. त्यांचे सिनेमे कमर्शियल नसतात मात्र ते नेहमीच त्यांच्या मनाचे ऐकतात. मी मल्याळम आणि बंगाली गाण्यांचा देखील खूप शौकीन आहे. त्यामुळेच मला प्रत्येक जॉनरचा सिनेमा आवडतो. आपल्याला जागतिक चित्रपटांबद्दल जाणून घेण्यापेक्षा आपल्या देशातील चित्रपटांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. एक अभिनेता असल्यामुळे आपल्याला त्या लोकांना जाणून घेणे आवश्यक आहे ज्यांच्यासोबत जोडणे जाणे आवश्यक आहे.” (Ayushmann Khurrana)

=====

हे देखील वाचा – करन जोहरच्या जुग जुग जियो मधील ‘हे’ गाणे चोरीचे ?

=====

अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन असलेला ‘अनेक’ हा सिनेमा नॉर्थ ईस्टच्या मुद्द्यांवर आधारित आहे. हा आपल्या भारताचा एक हिस्सा असून, त्याला खूपच कमी निर्मात्यांनी पडद्यावर दाखवले. हा सिनेमा येत्या २७ मे रोजी प्रदर्शित होत असून, यात आयुष्यमान खुराणासोबत एंड्रिया केविचसा, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा मुख्य भूमिकेत आहे. आयुष्यमान खुराणा(Ayushmann Khurrana) ‘अनेक’सोबतच ‘डॉक्टर जी’ मध्ये रकुल प्रीत सिंगसोबत दिसणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.