प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव, म्हणजेच रामनवमी 30 मार्च रोजी साजरा होत आहे. रामनवमीसाठी रामजन्मभूमी आतापासूनच सजली आहे. सर्वत्र रोषणाई, फुलांची सजावट आणि रामचरित मानसचे पठण चालू आहे. यासोबत चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कवीसंमेलन, स्थानिक कलाकारांचा नृत्य समारंभ आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन असे बहुअंगी कार्यक्रम सध्या रामनगरी अयोध्येमध्ये (Ayodhya) होत आहेत. त्यामुळे श्रीरामनगरी अयोध्या श्रीरामभक्तांनी गजबजली आहे. यात साधुसंतांची संख्याही मोठी आहे. यावर्षी श्रीरामांचा जन्मउत्सव त्यांच्यासाठी तात्पुरत्या उभारलेल्या मंदिरात होणार आहे. पुढच्या वर्षी श्रीरामनवमी भव्य अशा राममंदिरात होणार आहे. त्यामुळे हा जन्मत्सोवही तेवढ्याच थाटात आणि भव्यपणे साजरा करण्यासाठी राजजन्मभूमी ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अयोध्येतील (Ayodhya) 10,000 मंदिरांमध्ये रामजन्म महोत्सव साजरा करण्यात येत आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी श्रीरामांची अलंकार पूजा करण्यात आली. त्यानंतर विविध ठिकाणी रामचरित मानस पठण सुरु करण्यात आले आहे. आता अवघी अयोध्यानगरी (Ayodhya) श्रीरामांच्या नामघोषात दंग झालेली आहे. यावेळी रामलल्लांचा रामजन्म महोत्सव तात्पुरत्या मंदिरात होणार आहे. पुढच्यावर्षीपासून हा जन्मउत्सव भव्य राममंदिरात साजरा होईल. त्यामुळेच हा उत्सवही तसाच करण्याचा प्रयत्न सर्व अयोध्यावासी (Ayodhya) करीत आहेत. त्यामुळे अयोध्येतील (Ayodhya) सर्वच मंदिरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. श्रीरामवल्लभकुंज येथील रामरचन मंदिर परिसरात प्रेममूर्ती आचार्य प्रेमभूषण महाराज यांची रामकथा दररोज होत आहे. श्री रामनवमी निमित्त 30 मार्च पर्यंत क्रीडा स्पर्धा, श्री राम कथा आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येनं होत आहेत. यासर्वांसाठी श्रीरामांच्या मंदिराची सजावटही रोज वेगवेगळ्या फुलांनी करण्यात येत आहे. रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी रामलल्लाचा दरबार हिरव्या कपड्यांनी आणि फुलांनी सजवला गेला. यावेळी कनक भवनमध्ये, भगवान नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम झाला. या मंदिरातील रामजन्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असून राम जन्मानंतर दर्शनासाठी भाविकांची सर्वाधिक गर्दी येथे होते. श्रीरामवल्लभकुंजही फुलांनी सजवण्यात आले आहे. रामजन्म महोत्सवात 500 क्विंटलहून अधिक फुले मागणण्यात आली आहेत. त्यासोबत अत्तर, फळे आणि मिठाईही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. सजावटीसाठी फुले लखनौहून आणली जाणार आहेत. भाविक 28 ते 30 मार्च या दरम्यान श्रीरामांच्या दर्शनासाठी लाखोंने येण्याची शक्यता असल्यानं स्थानिक प्रशासनही तयारीला लागले आहे. (Ayodhya)
=======
हे देखील वाचा : या पंडूलिपीमध्ये दडलंय काय…
=======
यासोबत राजा दशरथाच्या महालात या महाउत्सवाची विशेष तयारी चालू आहे. संपूर्ण वाड्याच्या भव्य सजावटीसोबतच दररोज रामकथा आणि संतांचे प्रवचन होत आहे. रामचरित मानसाचे रोज येथे पठण होत आहे. कनक भवन, श्रीरामवल्लभकुंज, दशरथ महल, हनुमानगढ़ी, लक्ष्मण किल्ला, हनुमत निवास, सियाराम किल्ला, रामलाला सदन, रामलला भवन, रंग महल, राम वैदेही, राम वैदेही मंदिर, जानकी घाट, गोकुळ भवन, हनुमत किल्ला, गहोई मंदिर, दिव्यकला मंदिर, क्षत्रिय किराड मंदिर, जानकी महाल, हनुमान बाग, मणि मंदिर, रघुनाथ दास, बडीनाथ दास मंदिर, दासजींचे छावणी, लवकुश मंदिर, पाथर मंदिर, राम कचेरी चारो धाम, सर्वभौम आश्रम आदी मंदिरांमध्ये श्रीराम भक्तांसोबत साधू संतांचीही गर्दी मोठ्या संख्येनं होत आहे. या सर्वांमध्ये रामकोटची प्रदक्षिणा झाल्यावर भक्तांमध्ये उत्सहाचे वातावरण तयार झाले आहे. श्रीरामांच्या जयघोषांनी झालेल्या या प्रदक्षिणेमध्ये मोठ्या संख्येनं रामभक्त सहभागी झाले होते. प्रदक्षिणादरम्यान ढोल-ताशा वाजवून संतांचे स्वागत करण्यात आले.या सर्वांत अयोध्येमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यंक्रमांसोबत क्रीडा स्पर्धाही होत आहेत. त्यामध्ये खो-खो, तलबारबाजी, कबड्डी, सायकल स्पर्धा, नौकाविहार, हॉलीबॉल, मल्लखांब स्पर्धांचा समावेश आहे. यासर्वात श्रीराममंदिराची सजावटही रोज वेगवेगळी करण्यात येत असून रामलल्लाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. दररोज सुमारे 20 हजाराहून अधिक भाविक रामलल्लांच्या दर्शनासाठी येत आहेत. 28 तारखेनंतर ही संख्या लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
सई बने