Home » डॉक्टर ते क्रूरकर्मा दहशतवादी… अयमान अल जवाहिरी! 

डॉक्टर ते क्रूरकर्मा दहशतवादी… अयमान अल जवाहिरी! 

by Team Gajawaja
0 comment
Ayman al-Zawahiri
Share

आजच्या तरुण पिढीसाठी अल कायदा, ओसामा बिन लादेन, ९/११ ला अमेरिकेतल्या पेंटॅगॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला अतिरेकी हल्ला या गोष्टी म्हणजे इतिहासातल्या एखाद्या गोष्टीएवढ्याच माहिती असण्याची शक्यता आहे. पण, ९/११ ला अमेरिकेवर झालेल्या त्या हल्ल्यानं दहशतवाद ही समस्या ठसठशीतपणे जगाच्या नकाशावर आणली. आत्ता पुन्हा त्या घटनेचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेली घोषणा! Ayman al-Zawahiri)

अल कायदाचा म्होरक्या डॉ. अयमान अल जवाहिरी ((Ayman al-Zawahiri) याला कंठस्नान घालण्यात अमेरिकेला यश आलंय. शनिवारी जवाहिरीला संपवण्याची मोहिम अमेरिकेने यशस्वी केली. जो बायडेन यांनी मंगळवारी या घटनेची घोषणा केली. त्यानंतर अयमान अल जवाहिरी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अयमान अल जवाहिरी या दहशतवाद्याच्या डोक्यावर अमेरिकेकडून थोडं थोडकं नाही, तब्बल अडीच कोटी अमेरिकन डॉलरचं बक्षिस लावलं होतं, यावरुनच जवाहिरीचं अमेरिकेसाठी असलेलं महत्त्व स्पष्ट होतं. (Ayman al-Zawahiri Killed)

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी म्हणून जवाहिरी ओळखला जात होता. इजिप्तमध्ये श्रीमंत कुटूंबात जन्माला आलेला जवाहिरी व्यवसायाने डॉक्टर होता. मूळ धार्मिक वृत्ती आणि कट्टरपंथी विचारांमुळे तो दहशतवादाकडे ओढला गेला. अफगाणिस्तानमध्ये तो ओसामा बिन लादेनच्या संपर्कात आला आणि बघता बघता अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा उजवा हात झाला. 

====

हे देखील वाचा – दोहा करार काय आहे? AL Zawahiri च्या मृत्यूनंतर तालिबानी लावतायत अमेरिकेवर उल्लघनांचा आरोप

====

अमेरिकेतील पेंटॅगॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बलाढ्य इमारतींवर आत्मघातकी हल्ला करण्याच्या कटामध्ये ओसामा बिन लादेनचा प्रमुख साथीदार म्हणून अयमान अल जवाहिरीचा समावेश होता. या हल्ल्याच्या संपूर्ण पूर्वतयारीमध्ये जवाहिरीने लादेनच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. आत्मघातकी हल्ल्यात सहभाग घेण्यायोग्य दहशतवाद्यांची निवड करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, या प्रचंड मोहिमेसाठी आर्थिक ताकद उभी करणं, हल्ल्याचं नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये जवाहिरीचा सक्रीय सहभाग होता, म्हणूनच अमेरिकेच्या रडारवर ओसामा बिन लादेननंतर जवाहिरी असणं स्वाभाविकच होतं. Ayman al-Zawahiri)

२०११ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला संपवलं. लादेनला संपवण्याच्या मोहिमेचं नामकरण अमेरिकेकडून नेपच्युन स्पिअर असं करण्यात आलं होतं. त्यानंतरचं स्वाभाविक लक्ष म्हणून अवघ्या १० वर्षांत अमेरिकेने अयमान अल जवाहिरीला संपवलं आहे. अफगाणिस्तानातल्या काबूल शहरातल्या एका उच्चभ्रू वसाहतीत आपल्या कुटूंबासह जवाहिरीचं वास्तव्य होतं. 

अमेरिकन सैन्यानं आता अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने हेलफायर आर 9 एक्स या क्षेपणास्त्राचा वापर करुन जवाहिरीला संपवल्याचं समोर आलं आहे. या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मार्फत केवळ नेमक्या उद्दीष्टाचा वेध घेणं शक्य होतं. त्यामुळे निरपराधांची जीवित हानी टाळण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न होतो. जवाहिरीला संपवण्यासाठी ड्रोनद्वारे हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं. या मोहिमेत जवाहिरीच्या कुटूंबातल्या इतर कुणालाही कसलीही इजा झाली नसल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय. मात्र अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूसंदर्भात ‘डीएनए’चा कोणताही पुरावा अमेरिकेकडून सादर करण्यात आलेला नाहीये. (Ayman al-Zawahiri Killed)

महासत्ता म्हणून अमेरिकेचा जगभर दबदबा आहे. या महासत्तेला मुळापासून हलवून सोडणारा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं पाशवी कृत्य अल कायदा कडून ९/११ ला करण्यात आलं. त्याचा बदला घेण्यासाठी त्यानंतरच्या सगळ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी प्रयत्न केले. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आधी अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेन आणि आता काबूलमध्ये जवाहिरीला संपवण्यात आलं आहे. जवाहिरीला कंठस्नान घातल्यानंतर थोड्याथोडक्या नाही तर २१ वर्षांनंतर अमेरिकन जनतेला न्याय मिळाल्याची भावना राष्ट्राध्यक्ष जो बायडन व्यक्त करतात, ती म्हणूनच! Ayman al-Zawahiri)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.