Home » खाल्ल्यानंतर कधीच करु नका ‘या’ चुका, आरोग्याला बसेल फटका

खाल्ल्यानंतर कधीच करु नका ‘या’ चुका, आरोग्याला बसेल फटका

by Team Gajawaja
0 comment
Avoid this mistakes after dinner
Share

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपली लाइफस्टाइल आणि व्यायाम याकडे अधिक दुर्लक्ष केले जात आहे. सुखी आयुष्य जगायचे तर पैसे हवेच म्हणून आपण आपला अधिक वेळ हा कामाकडे देत आहोत. त्यामुळे बहुतांश वेळा आपण खाण्यापिण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. अशातच अधिक कामाचा ताण असेल तर आजारी ही पडू शकतो. या व्यतिरिक्त आपणच आजारांना आमंत्रण ही देतो. तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहेच. त्याचसोबत नियमितपणे कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशातच हेल्थी खाणं सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. हेल्थशॉट्स यांच्या मते, काही वेळेस आपण खाल्ल्यानंतर अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपल्या हेल्थी आरोग्यावर त्याच्या परिणाम होते. जसे की, खाल्ल्यानंतर खुप प्रमाणात पाणी पिणे. याचा आपल्या पाचन क्रियेवर प्रभाव पडतो आणि आपण आरोग्यासंबंधित चिंतेत राहतो. त्यामुळेच खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी करु नयेत याबद्दलच आपण अधिक जाणून घेऊयात.(Avoid this mistakes after dinner)

-खाल्ल्यानंतर लगेच झोपणे
काही लोक जेवल्यानंतर लगेच बेडवर झोपतात. मात्र तुम्ही जे अन्न खाल्ले आहे त्याच्या पचनासाठी थोडा वेळ द्या. म्हणजेच खाल्ल्यानंतर तुम्ही २ तासांनी रात्री झोपले पाहिजे. जर तुम्ही खाल्ल्याखाल्ल्या झोपत असाल तर तुम्ही ओबेसिटी व्यतिरिक्त अॅसिडिटी, स्ट्रोक आणि हृदयासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Avoid this mistakes after dinner
Avoid this mistakes after dinner

-खाल्ल्यानंतर निकोटीनचे सेवन
काही लोक खाल्ल्यानंतर चाय पिणे,कॉफी किंवा सिगरेट पिणे पसंद करतात. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्याला धोक्यात आणू शकते. असे केल्याने निकोटीनचे शरिरातील प्रमाण वाढते आणि सिजल लेव्हल ही प्रभावित होते. त्यामुळे खालेल्ल्या पदार्थामधील पोषक तत्वांचा परिणाम तुमच्या शरिरावर होत नाही.

हे देखील वाचा- औषधांसह कधीच ‘या’ गोष्टींचे सेवन करु नका अन्यथा होईल नुकसान

-खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन
खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण तुम्ही खाल्लेला पदार्थ हा व्यवस्थितीत पचत नाही. त्यामुळे खाल्ल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासांनी पाणी प्यावे.

-व्यायाम करणे
खाल्ल्यानंतर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमच्या पचन क्रियेवर त्याचा प्रभाव पडू शकतो. तुम्हाला उल्टी किंवा पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.(Avoid this mistakes after dinner)

दरम्यान, काही पदार्थ असे असतात त्या दोन्ही एकत्रित सुद्धा खाऊ नयेत. त्यामुळे सुद्धा तुम्हाला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यानुसार संत्री, मोसंबी, अननस अशी फळ ही दही किंवा लस्सी सोबत खाऊ नयेत. या व्यतिरिक्त आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका किंवा केळ्यांसोबत ताक ही पिऊ नका.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.