Home » ‘या’ आजारांमध्ये बटाटे खाणे टाळा, जास्त सेवनाने निर्माण होऊ शकतात समस्या

‘या’ आजारांमध्ये बटाटे खाणे टाळा, जास्त सेवनाने निर्माण होऊ शकतात समस्या

by Team Gajawaja
0 comment
potato
Share

बटाट्याशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे, यात शंका नाही. बटाटा हा आपल्या अनेक पारंपारिक पदार्थांचा अविभाज्य भाग आहे, म्हणूनच त्याला भाज्यांचा राजा देखील म्हटले जाते. तसेच, बटाटा न आवडणारे फार कमी लोक सापडतील. वैद्यकीय शास्त्रानुसार, बटाट्यापासून कोणतीही हानी होत नसली, तरी त्याच्या अतिसेवनाने रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढू शकते. बटाट्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, ज्यामुळे आरोग्याला विविध प्रकारे फायदा होतो. ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी, हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी बटाट्याचे सेवन फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे.(potato)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बटाट्याचा समावेश प्रत्येक घरातील दैनंदिन आहारात केला जात असला, तरी काही परिस्थितींमध्ये बटाट्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते. बटाट्याचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते. यामुळेच सर्व लोकांना त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आहार निवडण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया की, कोणत्या आजारांमध्ये बटाट्याचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे?(potato)


वाढू शकतो लठ्ठपणा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यात बटाट्याचे सेवन कमी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. १०० ग्रॅम बटाट्यामध्ये सुमारे १०० कॅलरीज असतात, त्यामुळे ते जलद वजन वाढवू शकते. अतिरिक्त कॅलरीजमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे वजन नियंत्रित करणे कठीण होते.(potato)


मधुमेहींनी टाळावा बटाटा

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्याचे जास्त सेवन केल्याने मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. ज्या लोकांच्या रक्तातील साखर अनियंत्रित राहते, त्यांनी बटाटा पूर्णपणे टाळावा. कारण तो शरीरातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढवतो. बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनियंत्रित मधुमेह होऊ शकतो, त्यामुळे त्याच्या सेवनाबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.(potato)


हृदयरोगींनी टाळावा बटाटा

जर तुम्हाला हृदयविकार असेल, तर डॉक्टर तुम्हाला बीटा-ब्लॉकर्स कंपाऊंड असलेली औषधे देतात. यामुळे रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढू शकते. बीटा-ब्लॉकर्स घेताना बटाट्यासारख्या उच्च पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. हृदयविकारामध्ये आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.(potato)


====

हे देखील वाचा – ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करालं तर होऊ शकता मधुमेहाचे शिकार

====


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.