Home » ॲव्होकॅडो खाण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे

ॲव्होकॅडो खाण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Benefits Of Avocado
Share

सध्याच्या काळात स्वतःच्या शरीराची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण फक्त काम, काम, काम करतो आणि आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक लहान-मोठ्या गंभीर आजारांना आपल्याला सामोरे देखील जावे लागते. त्यास्तही शरीराची काळजी, फिटनेस, योग्य खानपान खूपच गरजेचे आहे. (Benefits Of Avocado)

आता फिटनेस, योग्य खानपान म्हटले की अनेकदा लोकं नाक मुरडतात. कारण हेल्थी खाणे अनेकदा बेचव असते. मात्र आपण पाहिले तर मार्केटमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला उत्तम आरोग्यासोबतच चव देखील देतात. काही गोष्टींना जरी चव नसली तरी ते आपण योग्य प्रकारे खाल्ल्यास नक्कीच फायदा होईल. (Benefits Of Avocado)

मधल्या काही काळापासून अनेक वेगवेगळ्या गोष्टींची, फळांची नावे आपण ऐकत आहोत. सेलिब्रिटी, सोशल मीडिया, डॉक्टर यांच्याकडून आपल्याला अशा काही पदार्थांची नावे माहित झाली, जी आपण कधी पाहिली देखील नव्हती. यातलेच एक फळ म्हणजे ॲव्होकॅडो.

Benefits Of Avocado

आज जर आपण यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडिया साईट पहिल्या तर या ॲव्होकॅडोशी संबंधित अनेक रेसिपी आपल्याला मिळतील. गाडगी ॲव्होकॅडो कसे कापावे, कसे वापरावे, त्यात काय काय घालावे, तर कसे टिकवावे आदी असंख्य बाबी आपल्याला सापडतील. मात्र याच ॲव्होकॅडोचे फायदे जास्त कोणी सांगत नाही. आणि सांगितले तरी अगदी मोजकेच. मात्र या फळाचे अगणित उत्तम फायदे आहेत, जे ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल आणि लवकरात लवकर ॲव्होकॅडो खायला सुरुवात कराल. या लेखातून आपण याच ॲव्होकॅडोचे फायदे जाणून घेणार आहोत. (Benefits Of Avocado)

1) हृदय निरोगी राहते –

अ‍ॅव्होकॅडोच्या नियमित सेवनामुळे हृदयविकारापासून रक्षण होण्यास मदत होते. आपले हृदय आणि शरीरातील रक्तवाहिन्याच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, हेल्दी फॅट्स आणि फायबर्स हे सर्व अ‍ॅव्होकॅडोमध्ये मुबलक प्रमाणत आढळतात. अ‍ॅव्होकॅडो खाण्यामुळे HDL शरीरासाठी चांगले असणारे कोलेस्टेरॉल वाढते तर शरीरासाठी घातक असलेले LDL हे वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रेमात यात भरपूर असते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. या फळाच्या सेवनामुळे पक्षाघाताचा धोका देखील कमी होतो.

2) वजन आटोक्यात राहते –

ॲव्होकॅडोमध्ये कॅलरीज जास्त असतात, मात्र तरीही त्यात अनेक पोषकतत्वे असतात. यात असणाऱ्या फायबर्स आणि हेल्दी फॅट्समुळे आपले वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. अ‍ॅव्होकॅडो खाण्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते. वजन कमी करायचे असेल तर नक्कीच या फळाचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.

3) पचनक्रिया सुधारते –

ॲव्होकॅडोमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या समस्या दूर होते. तसेच नियमित अ‍ॅव्होकॅडो खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते.

4) डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते –

अ‍ॅव्होकॅडोमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाची फायटोकेमिकल्स अँटिऑक्सिडंट असतात. हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगले असतात. या फळाच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. सोबतच मॅक्युलर डीजेनरेशनचा धोका कमी होऊन वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत होते.

5) सांधेदुखी कमी होते –

अ‍ॅव्होकॅडो खाण्या मुळे सांधेदुखी सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच संधिवात टाळण्यासाठी आणि सांधे निरोगी राहण्यासाठी अ‍ॅव्होकॅडो खाणे चांगले असते.

======

हे देखील वाचा : पावसाळ्यात डास, माशा, किड्यांपासून असा करा बचाव

======

6) ब्लड शुगर आटोक्यात राहते –

अ‍ॅव्होकॅडो खाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे Type-2 डायबेटिस होण्यापासून रक्षण होण्यास मदत होते.

7) विविध कॅन्सरपासून रक्षण करते –

अ‍ॅव्होकॅडोमध्ये अँटिऑक्सिडंट, फायटोकेमिकल्स आणि कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हे फळ खाल्ले तर तोंडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, स्वादुपिंड कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका बऱ्यापैकी कमी होतो. (Benefits Of Avocado)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.