तुमच्या मुलाला जेव्हा काही गोष्टी ओळखण्यास चुका करत असेल किंवा समजत नसतील तर समजून जा तुमचे मुलं एखाद्या मानसिक आजाराची लढत आहे. अशाच प्रकारचा ऑटिज्म (Autism) आहे. ऑटिज्म हा असाध्य आजार आहे जो काही कारणांमुळे होऊ शकतो. मुलं जेव्हा १२ महिन्यांची होतात त्यावेळी ऑटिज्मची लक्षण दिसून येऊ लागतात. ऑटिज्मने ग्रस्त असलेल्या मुलांचे राहणे, समजून घेणे आणि बोलण्याची एक ठराविक पद्धत असते. जी ओळखणे अगदी सोप्पे असते. या आजारामुळे काही वेळेस मुलं आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करु शकत नाही आणि त्याचसोबत दुसऱ्यांच्या भावना सहज ओळखू शकत नाहीत. दरम्यान ऑटिज्मची अशी काही लक्षण आहेत ज्यावर लक्ष दिल्यास ती सुरुवातीच्या स्टेजमध्येच ओळखता येऊ शकतात.
कम्युनिकेशन करण्यासाठी समस्या
ऑटिज्म असलेली पीडित मुलांना कम्युनिकेशन करण्यास अधिक समस्या येते. त्याचसोबत मुलांना बहुतांशकरुन भाषा बोलणे आणि समजून घेण्यास ही समस्या निर्माण होते. काही वेळा ते इशाऱ्यांनी गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पाच वर्षाच्या मुलामध्ये ही लक्षण आढळून येऊ शकतात.
दुसऱ्या मुलांसोबत खेळणे कठीण होते
ऑटिज्म असलेल्या मुलांना खेळणी किंवा एखाद्या वस्तू अथवा दुसऱ्या मुलांसोबत असमान्य पद्धतीने खेळतात. तर दुसऱ्या मुलांऐवजी एकटेपणाने खेळणे त्यांना आवडते. एकच गोष्ट ती वारंवार सांगतात आणि त्याचसोबत काही गोष्टींमुळे लगेच कंटाळतात. हेच कारण आहे की दुसऱ्या मुलांसोबत त्यांना खळणे कठीण होते.
ओळखण्यास समस्या
अशा मुलांना काही गोष्टी ओळखण्यास फार त्रास होते. ते गोष्टी ओळखण्यासाठी सेंसेसचा वापर करतात. जसे वास घेणे, स्पर्श करणे, स्पीड आणि पाहणे. सेंसेसच्या माध्यमातून ते जे काही अनुभव करतात त्याच पद्धतीची ते प्रतिक्रिया देतात.

झोपण्याची समस्या
ऑटिज्म असलेल्या मुलांना झोप येण्यास त्रास होतो. त्यांनी झोप पूर्ण न झाल्याने त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होते. त्यांना चढणे, धावणे किंवा अन्य शारिरीक हालचाली करण्यास समस्या येऊ शकते.
हे देखील वाचा- फक्त खाणं नव्हे तर मुलांमध्ये लठ्ठपणाची ‘ही’ सुद्धा कारणे असू शकतात
ऑटिज्मचे काही प्रकार सुद्धा आहेत. ते पुढील प्रमाणे
-ऑटिस्टिक डिसऑर्डर
हा ऑटिज्म (Autism) मधील सर्वसामान्य प्रकार आहे. ज्यांना या डिसऑडरमुळे प्रभावित होतात त्यांना सामाजिक व्यवहार आणि अन्य लोकांशी बोलताना समस्या येतात. त्याचसोबत असामान्य गोष्टींमध्ये आवड असणे, असमान्य व्यवहार करणे, बोलताना अडखळणे, थांबून थांबून बोलणे अशी ऑटिस्टिक डिसऑर्डरची लक्षण असू शकतात. तर काही प्रकरणांमध्ये बौद्धिक क्षमता सुद्धा कमी असू शकते.
-अर्स्पेर्गेर सिंड्रोम
या सिंड्रोलमला ऑटिस्टिक डिसऑर्डरचे हलके रुप मानले जाते. या सिंड्रोममुळे पीडित व्यक्तीची वागणूक कधी कधी वेगळी वाटू शकते. पण त्यांना खास विषयात आवड अधिक असू शकते. दरम्यान या लोकांमध्ये मानसिक किंवा सामाजिक व्यवहारासंबंधित काही समस्या नसतात.
-पर्वेसिव डेव्हलपमेंट डिसऑर्डर
या आजाराची लक्षण खासकरुन १२-१८ महिन्यातील वयात दिसतात. जी सामान्य ते गंभीर असू शकतात. ही समस्या पूर्ण आयुष्यभर राहू शकते. नवजात शिशु जेव्हा ऑटिज्मचा शिकार होतो तेव्हा त्यांच्या विकासात खालील संकेत दिसून येत नाहीत.
-एक-दोन असे शब्द वारंवार बोलणे किंवा बडबडणे
-कोणत्याही गोष्टीकडे इशारा करणे
-आईचा आवाज ऐकून हसणे किंवा तिला प्रतिक्रिया देणे
-हाताच्या जोराने दुसऱ्याजवळ जाणे
-आय कॉन्टेक्ट न करणे