ऑस्ट्रेलियात स्वस्तिक चिन्हावरुन जोरदार सध्या चर्चा सुरु आहे. खरंतर ऑस्ट्रेलियातील काही राज्यांमध्ये स्वास्तिकवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत त्याच्या विरोधात आंदोलन केल्यास तो गुन्हा मानला जाईल. दरम्यान, जे लोक त्याचा धार्मिक कारणांसाठी वापर करतात त्यांना सूट देण्यात आली आहे. अशातच हिंदू, जैन आणि बुद्ध धर्मात याच्या वापरासाठी परवानगी दिली गेली आहे. मात्र आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, ऑस्ट्रेलियात यावर बंदी का घालण्यात आली आहे आणि या स्वास्तिक चिन्हासह हिटलरचोसबतची चर्चा का सुरु झालीय?(Australia banned swastik)
का घालण्यात आलीय बंदी?
खरंतर स्वास्तिकवर बंदी घालण्यासंदर्भात कोणतेही ठोस बातमी नाही. यापूर्वी सुद्धा काही देशांमध्ये स्वास्तिक चिन्हावर बंदी घालण्यात आली आहे. पण स्वास्तिक चिन्हावर बंदी का घातली जाते यामागे सुद्धा एक कारण आहे. ते म्हणजे तो नाजींच्या लोगोसारखा दिसतो. अशातच परदेशातील लोकांचे असे मानणे आहे की, स्वास्तिक हे नाजींचे प्रतीक आहे. हे हिंसेचे प्रतीक मानले जाते. त्याचसोबत त्याचा संबंध कट्टरपंथाशी जोडला जातो. याच कारणामुळे नाजींचा लोगो म्हणून यावर बंदी घातली जाते. १९३० नंतर स्वास्तिक हा फासीवादच्या प्रतीकाच्या आधारावर पश्चिम देशांमध्ये दिसून आला आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या सेनेने पहिल्या महायुद्धा या स्वास्तिक चिन्हाचा वापर केला होता. ब्रिटनची वायुसेनेच्या लढाऊ विमानांवर सुद्धा त्याचा वापर १९३९ पर्यंत केला जात होता. त्यानंतर जर्मनीमध्ये स्वास्तिकचा वापर करण्यासंबंधित ही एक कथा आहे. जेव्हा जर्मन विद्वान भारतीय साहित्याचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना जर्मन भाषा आणि संस्कृत यामध्ये काहीतरी साम्य असल्याचे दिसले. त्यानंतर दोघांचे पूर्वज एकच असल्याची बाब समोर आली. त्यानंतर जे लोक यहूदियांचा विरोध करत होते त्यांनी या चिन्हाला आपलेसे केले. पाहता पाहता त्यांनी नाजींच्या लाल रंगाच्या झेंड्यामध्ये जागा घेतली.
स्वास्तिक हेच नाजींचे चिन्ह?
आपण पाहिले असता हिंदू धर्मातील स्वास्तिक चिन्ह हे तानाशाह हिटरच्या नाजी सेने सारखे दिसते. परंतु तो खुप वेगळा होता. स्वास्तिक सारख्या दिसणाऱ्या नाजी चिन्हाला हकेनक्रेज असे म्हटले जाते. हकेनक्रेज मध्ये स्वास्तिकात असलेले चार बिंदू नाहीत. यामध्ये फक्त स्वास्तिकाच्या रेषा असून तो थोडा वाकडा सुद्धा आहे. असे म्हटले जाते की, हिंदू धर्मात स्वास्तिकात जे बिंदू असतात त्यांना वेदांचे प्रतीक मानले जाते. तर नाजीच्या झेंड्यामध्ये तसे काहीच नव्हते.
हे देखील वाचा- भारतावर आक्रमणाचे पर्व सुरू करणारा सुलतान, गझनीचा महमूद (९७०-१०३०)
नाजींचे चिन्ह आले कुठून?
नाजी सेनेने हरेनक्रेज आपल्या प्रतिनिधित्वासाठी आणि नाजी मुव्हमेंटमध्ये त्याचा वापर केला होता. तो सफेद रंगाचा बॅकग्राउंटवर लाल रंगाचा होता आणि तो स्वास्तिकाप्रमाणे सरळ नव्हता. तर ४५ डिग्री झुकलेला होता. यामध्ये असलेला लाल रंग हा संघर्षाचा बिंदू असल्याचे मानले जात होते. हिटलरने १९२० मध्ये त्याचा सहभाग करुन घेतला.(Australia banned swastik)
हिंदू धर्मात काय आहे महत्व?
स्वास्तिक चिन्ह हे हिंदू धर्मात गणेशाचे रुप मानले जाते. अशी ही मान्यता आहे की, स्वास्तिकाची डावी बाजू ही गं बीज मंत्राचा असतो. त्याला गणपतीचे स्थान मानले जाते. स्वास्तिकाच्या चार बिंदूमध्ये देवी गौरी, पृथ्वी, कुर्म आणि देवतांचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळेच तो हिंदू धर्मात खुप शुभ मानला जातो. या व्यतिरिक्त जैन आणि बुद्ध धर्मात सुद्धा याचा वापर केला जातो.