भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध प्रकारच्या जाती, धर्माचे आणि विविध भाषिक लोक राहतात. देश असो किंवा परदेश, प्रत्येक ठिकाणची व्यवस्था ही सुरळीत चालवी म्हणून शासन आणि प्रशासनाची गरज भासते. मात्र असे एक शहर आहे जेथे कोणतेही सरकार नाही. तरीही या देशाचा कारभार हा पैशांशिवाय चालविला जातो. (Auroville city)
शासन-प्रशासनाशिवाय शासन चालते ही तर हैराण करणारी गोष्ट आहे.त्याचसोबत येथे जर तुम्हाला रहायचे-खायचे असेल तर त्यासाठी पैसे ही द्यावे लागत नाही. म्हणजेच तुम्ही फुकटात येथे आयुष्य जगू शकता. याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.
ना शासन-प्रशासन ना धर्म ना पैसे लागतात अशा शहराचे नाव ‘ऑरोविले’ असे आहे. हे शहर चेन्नई पासून १५० किमी दूरवर विल्लुपुरम जिल्ह्यात तमिळनाडूत आहे. या शहराला Sun of dawn असे सुद्धा म्हटले जाते. खरंतर हे शहर वसवण्यामागे एक उद्देश होते. ते म्हणजे, येथे कोणत्याही भेदभावाशिवाय किंवा अस्पृश्यतेशिवाय लोकांना राहता येईल.

Auroville city
प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑरोविले शहर १९६८ मध्ये मीरा अल्फाजो द्वारे वसवण्यात आले होते. मीरा अल्फाजो १९१४ मध्ये पड्डुचेरीरीचे श्री अरबिंदो स्पिरिच्इल रिट्रीटमध्ये आल्या होत्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्या पुन्हा जापानमध्ये गेल्या. मात्र १९२० मध्ये पुन्हा परत आल्यानंतर १९२४ मध्ये श्री अरबिंदो स्पिरिचुअल संस्थेला जोडल्या गेल्या आणि जनसेवेत लागल्या.
ऑरोविले शहराला युनिव्हर्सल सिटी असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच येथे कोणीही येऊन राहू शकते. येथे जवळजवळ ५० देशांपेक्षा अधिक देशातील लोक राहतात आणि येथील लोकसंख्या २४००० ऐवढी आहे. येथे राहण्यासाठी केवळ एक अट मान्य करावी लागते. ती म्हणजे तुम्हाला येथे सेवक म्हणून रहावे लागते. (Auroville city)
हेही वाचा- ब्रिटीश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे ‘हा’ परिवार
येथे ना कोणताही धर्म आहे ना कोणत्याही देवता-देवीची पूजा होते. येथे केवळ एका मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. त्याला मातृमंदिर असे म्हटले जाते. येथील लोक मेडिटेशन आणि योगावर अधिक लक्ष देतात. २०१५ नंतर या शहरात खुप बदल झाले आहेत. या ठिकाणाचे फार कौतुक केले जाऊ लागले. युनेस्कोने सुद्धा या शहराचे कौतुक केले आहे. या शहराला भारत सरकारने सुद्धा समर्थन दिले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी सुद्धा येथे भेट दिली होती.