Home » लगेच अंतिम फेरीचे लक्ष!

लगेच अंतिम फेरीचे लक्ष!

by Team Gajawaja
0 comment
GT vs MI
Share

साखळी फेरीतील अंतिम सामन्यात गुजरातने बंगळूरूचा पराभव केला आणि मुंबईचा प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला. मुंबईला अंतिम फेरी गाठण्यासाठी आता त्याच गुजरातला पाणी पाजावे लागणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणाऱ्या क्वालीफायर २ च्या सामन्यात मुंबईसमोर गुजरातचे आव्हान असेल. सामन्यात विजयी संघाचे थेट अंतिम सामन्यातील स्थान निश्चीत होईल तर आज पराभव पत्कराव्या लागणाऱ्या संघाचे आयपीएल मधील आव्हान संपुष्टात येईल. (GT vs MI)

चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवर झालेल्या क्वालीफायर १ सामन्यात गुजरातला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. साखळी फेरीत त्यांनी पहिले स्थान पटकावले असल्याने त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची एक जास्तीची संधी आपसूकच होती. त्यामुळे त्यांना आता क्वालीफायर २ मध्ये मुंबईच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवला जात असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा पाठींबा लाभेल यात शंका नाही.(GT vs MI)

दुसरीकडे एलीमीनेटर सामन्यात मुंबईने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत लखनऊच्या संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या लखनऊला मुंबईने तब्बल ८१ धावांनी धूळ चारत विजय मिळवला होता. आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफ लढतीत कुठल्याही संघाने मिळवलेला हा सगळ्यात मोठा विजय ठरला होता. संघाच्या या विजयात युवा गोलंदाज आकाश मधवालने अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. (GT vs MI)

गुजरातच्या संघाला या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलकडून विशेष अपेक्षा असतील. चालू हंगामात जबरदस्त फलंदाजी करत गिलने ७२२ धावा ठोकल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या स्थानी असणाऱ्या फाफ डू प्लेसी पेक्षा तो फक्त आठ धावांनी पिछाडीवर आहे. याव्यतिरिक्त हंगामात सर्वाधिक बळी मिळवणारे दोन्ही गोलंदाज गुजरातच्याच गोटात आहेत. मोहम्मद शमी सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप डोक्यावर मिरवतो आहे तर त्याच्यापेक्षा एकच बळी कमी मिळवणारा राशीद खान दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. आपल्या या स्टार गोलंदाजांकडून गुजरातला अपेक्षा असतील.(GT vs MI)

डेव्हिड मिलर मध्यक्रमात विस्फोटक फलंदाजी करण्यास प्रसिद्ध आहे. व्रीद्धीमान साहा, राहूल तेवतीया आदी फलंदाज आपली सर्वोत्तम कामगिरी बजावण्यास उत्सुक असतील तर नूर अहमद सारखे गोलंदाज सर्वोत्तम गोलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेण्यास सक्षम आहेत. कर्णधार हार्दिक पांड्याला अजूनही या हंगामात सर्वोत्तम प्रदर्शन करता आले नाही. तो आपली कामगिरी उंचावण्यास उत्सुक असेल.

सुर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीनचा जबरदस्त फॉर्म मुंबईसाठी फायद्याचा ठरताना दिसतो आहे. दोघांनीही चालू हंगामात शतके झळकवली आहेत आणि वेळोवेळी चांगली फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच कामगिरीची पुनरावृत्ती या सामन्यात देखील व्हावी अशी आशा मुंबईला असेल. (GT vs MI)

=======

हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप

=======

ईशान किशन देखील चांगलाच लयीत जाणवतो आहे. विस्फोटक सुरुवात करून देण्याची मदार त्याच्यावर असेल. रोहित शर्मा अजूनपर्यंत या हंगामात मनासारखी कामगिरी बजावण्यात अपयश आले असले तरी, आपला खेळ उंचावण्यास तो उत्सुक असेल. दुखापतीनंतर परत आलेल्या तिलक वर्माच्या समावेशानंतर संघाचा मध्यक्रम मजबूत झाला आहे. टिम डेव्हिड आणि नेहल वढेरा यांच्यावर अंतिम षटकांत फटकेबाजी करण्याची जबादारी असेल.

आकाश मधवाल मागच्या काही सामन्यांत स्टार गोलंदाज म्हणून उभारला आहे. एलीमीनेटर सामन्यात फक्त पाच धावांत पाच बळी मिळवत तो मुंबईच्या विजयाचे प्रमुख कारण बनला होता. त्याच्या याच कामगिरीची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा मुंबई करेल. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना चुरशीचा होईल यात शंका नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.