जगभरात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोक विविध प्रकारच्या डेबिट कार्ड आणि क्रेटिड कार्डचा वापर करत आहेत. बँक खाते सुरु केल्यानंतर खातेधारकाला डेबिट कार्ड दिले जाते. अशातच तुम्ही कार्डचे वेरियंट ही निवडू शकता. क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड घेताना असे कार्ड निवडले पाहिजेत जे तुमच्यासाठी गरजेपेक्षा अधिक कामी येतील. (ATM Card)
VISA Card चे विविध प्रकार
जगभरातील सर्वाधिक मोठे पेमेंट नेटवर्क वीजा आहे. त्यांनी बँकांसोबत भागीदारी करत काही कार्ड्स जारी केले आहेत.
-क्लासिक कार्ड
हे एकदम बेसिक कार्ड असते. जगभरात या कर्डवर विविध प्रकारचे कस्टमर सर्विसेस मिळतात. या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही वेळी आपल्या या कार्डला रिप्लेस करु शकतो.
-गोल्ड कार्ड
जर तुमच्याकडे गोल्ड वीजा कार्ड असेल तर तुम्हाला ट्रॅवल असिस्टेंट, वीजाच्या ग्लोबल कस्टमर असिस्टेंट सर्विसेचा फायदा मिळतो. या कार्डला जगभरात मान्यता आहे. हे कार्ड ग्लोबल नेटवर्कला जोडले गेले आहे. या कार्डला रिटेल, डायनिंग आणि मनोरंजन आउटलेटच्या येथे स्वाइप केल्यानंतर काही प्रकारचे डिस्काउंटचा लाभ घेता येतो.
-प्लॅटिनम कार्ड
हे कार्ड तुम्हाला कॅश डिस्बर्समेंट ते ग्लोबल एटीएम नेटवर्कची सुविधा देतो. या व्यतिरिक्त मेडिकल आणि लीगल रेफरल आणि असिस्टेंट मिळतो. या कार्डचा वापर करुन शेकडो डील, डिस्काउंट ऑफर आणि अन्य सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो.
-टाइटेनियम कार्ड
टाइटेनियम कार्डमध्ये क्रेडिट लिमिट प्लॅटिनम कार्डच्या तुलनेत अधिक असते. हे सर्वसामान्यपणे उत्तम क्रेडिट हिस्ट्री आणि हाय इनकम असणाऱ्या लोकांना दिले जाते.
-सिग्नेचर कार्ड
सिग्नेचर कार्ड हे एअरपोर्ट लाउंज एक्सेससह काही प्रकारच्या अन्य सुविधांसाठी असते.
तीन प्रकारचे असते मास्टरकार्ड
पेमेंट नेटवर्क मास्टरकार्डचे तीन प्रकार अधिक पॉप्युलर आहे. ज्यामध्ये Standard Debit Card, Enhanced Debit Card आणि World Debit MasterCard. जेव्हा तुम्ही सुद्धा खाते सुरु करण्यासाठी जाता तेव्हा बँकेकडून स्टँडर्ड डेबिट कार्ड दिले जाते. (ATM Card)
हे देखील वाचा- PAN Card च्या प्रत्येक क्रमांकामागे लपलीय तुमच्या बद्दलची माहिती
‘या’ व्यतिरिक्त एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढताना पुढील चुका करणे टाळा
-एटीएमच्या माध्यमातून पैसे काढते वेळी एटीएम पिनचा वापर अगदी सावधगिरीने करावा. त्याचसोबत पिन तुमचा दुसऱ्यांना दिसणार नाही याची काळजी घ्यावी. लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री करुन घ्या.
-तुमचे एटीएम कार्ड किंवा पिन क्रमांक कोणासोबत ही शेअर करु नका. कारण यामुळे तुमचेच मोठे नुकसान होऊ शकते.
-एटीएमच्या माध्यमातून पैसे काढताना घाई करु नका. आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडे लक्ष द्या.
-जर वेळोवेळी तुम्ही तुमचा एटीएम पिन बदल रहा. जेणेकरुन तुमची फसवणूक होण्यापासून दूर रहाल.