Home » Atlantium : ३ मित्रांनी एक रेघ ओढली आणि घरमागे बनला स्वतंत्र देश!

Atlantium : ३ मित्रांनी एक रेघ ओढली आणि घरमागे बनला स्वतंत्र देश!

by Team Gajawaja
0 comment
Atlantium
Share

आजपासून साधारण ४४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी, इथे तीन मित्र राहत होते, जॉर्ज फ्रान्सिस क्रुइशँक, जेफ्री जॉन डगन आणि क्लेअर मेरी कुल्टर. या तिघांच्या डोक्यात एकदा सहजच आयडिया आली. ते घराच्या मागच्या भागात गेले. घराच्या मागच्या भागात त्यांनी १० बाय १० मीटर असा चौरस आखला. एक झेंडा जमिनीत गाडला आणि २७ नोव्हेंबर १९८१ साली घोषणा केली एका स्वतंत्र देशाची. आज, ४४ वर्षांनंतर, हा १०० चौरस मीटरचा देश इतका विस्तारला की, त्याचं क्षेत्रफळ व्हॅटिकन सिटीपेक्षाही दुप्पट आहे! तर हा देश आहे तरी कोणता? त्याची स्टोरी काय? हे जाणून घेऊ. (Atlantium)

त्या तीन मित्रांनी मिळून त्या १०० स्क्वेअर मीटर भागाला स्वतंत्र देश घोषित केलं, त्या भागाला प्रोव्हिजनल टेरिटरी म्हणत, देशाला नाव दिलं, अटलांटियम साम्राज्य. आता या जागेला त्यांनी देश घोषित केलं, मग इतर देशाचा कारभार जसा चालतो, तसं त्यांनी वागायला सुरुवात केली. म्हणजे ते एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानांंसारखं राहायला, त्यांच्यासारखं वागण्याचा अविर्भाव सुरु केला. मग या तिघांनी आपापसात पदं वाटून घेतली. जॉर्ज या देशाचा “एम्परर जॉर्ज II” म्हणून राज्यप्रमुख झाला. १९८२ मध्ये दुसरा मित्र जेफ्री डगन पंतप्रधान बनला, जो चार वर्ष पंतप्रधान म्हणून या १० बाय १० मीटर देशाचं काम बघत होता. मग पुढे त्यांचे आणखी मित्र डॅमियन स्कॉट आणि केव्हिन फॅनुची हे दोघं पंतप्रधान बनले. आता त्यांचा स्वतंत्र देश बनला होता, पण या देशाच्या तिन्ही प्रमुखांचं म्हणजे त्या तीन मित्राचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि मग सगळे विखुरले. यातच १९९० पासून पुढची काही वर्ष तीन मित्रांचा स्वयंघोषित देश अटलांटियम हा तात्पुरता बंद झाला. (Top Stories)

atlantium

मग नऊ वर्ष अशीच गेली. जॉर्जच्या डोक्यातून त्यांच्या देशाची कल्पना गेली नव्हती. १९९९ मध्ये जॉर्जने सिडनीच्या पॉट्स पॉइंट इथे ६१ स्क्वेअर मीटरचा एक प्लाॅट विकत घेतला आणि घोषणा केली की, ही अटलांटियमची दुसरी राजधानी आहे. दुसरी का तर, आधी पहिली राजधानी म्हणजे नार्वी इथे १० चौरस मीटरचा असलेला त्यांचा पहिला देश. आता तो आणखी एक पाउल पुढे गेला. त्याने एक वेबसाइट सुरू केली. ही वेबसाइट म्हणजे अटलांटियमचा नवीन चेहरा होती, आता लोकं या देशाकडे आकर्षित व्हायला लागली आणि या मायक्रोनेशनला जागतिक स्तरावर नाव मिळालं. मायक्रोनेशन म्हणजे एका राष्ट्रामध्येच बनलेलं आणखी एक राष्ट्र. (Atlantium)

त्या तीन मित्रांना हा देश आणखी वाढवायचा होता, मग त्यांनी २ जानेवारी २००८ ला सिडनीपासून ३५० किमी दक्षिण-पश्चिमेला ०.७६ स्क्वेअर किमीची जागा विकत घेतली आणि त्या जागेला नाव दिलं “औरोरा प्रांत”. आता या जागेला अटलांटियमची तिसरी आणि सध्याची “जागतिक प्रशासकीय राजधानी घोषित केली. अटलांटियमच्या वेबसाइट आणि इतर माहितीनुसार, औरोरा प्रांतात गव्हर्नमेंट हाऊस, जनरल पोस्ट ऑफिस आणि पिरॅमिड ऑफ द डॉन यासारख्या स्ट्रक्चर आहेत. (Top Stories)

=================

हे देखील वाचा : Eiffel Tower : असा नटवरलाल ज्याने आयफेल टॉवर विकला, तेही दोनदा…

=================

पिरॅमिड ऑफ द डॉन तर ४ मीटर उंच आहे आणि सोबतच इतर स्मारकांचाही उल्लेख आहे. एक तर अटलांटियम हा मायक्रोनेशन आहे आणि त्याचा एरिया लहान आहे. त्यामुळे या स्ट्रक्चरचे आकार लिमिटेड आहेत. अटलांटियमचं स्वतःचं राष्ट्रगीत सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे “Aurora Australis.” त्यांनी स्वतःचं असं इम्पेरियल सॉलिडस नावाने चलन सुरू केलं. या नाण्यांवर जॉर्जचं चित्र आणि ऑस्ट्रेलियाचा वेज-टेल्ड गरुड आहे आणि ते क्युप्रोनिकेल धातूपासून बनवलेलं आहे. त्यावर ९ कॅरेट सोन्याचा लेप दिलेला आहे. (Atlantium)

ऑक्टोबर २०१५ पर्यंत अटलांटियमचे तब्बल ३,००० नागरिक होते, जे १०० हून जास्त देशांतून आले होते. पण अटलांटियमचा एरिया छोटा आहे म्हणून मग सगळे आपापल्या देशातच राहतात. अटलांटियम स्वतःला “self-declared state,” “aspirant microstate,” आणि “global sovereign state” म्हणतो. पण इथे एक ट्विस्ट आहे, हा देश प्रामुख्याने Non-Territorial आहे, म्हणजे या देशाला ऑफिशीयली मान्यता नाही. कोणत्याही मोठ्या देशाने अटलांटियमला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. पण तरी जॉर्ज आणि त्याच्या साथीदारांनी हार मानली नाही. त्यांनी युनायटेड स्टेट्स, पाकिस्तान, पोलंड, ब्राझील, भारत, इटली, इराण, सिंगापूर, सर्बिया आणि स्वित्झर्लंड इथे “इम्पेरियल लिगेट्स” नावाचे त्यांच्या देशाचे अनऑफिशियल राजनैतिक दूत नेमले आणि हे लोक अटलांटियमचा प्रसार करतात. आज जरी या देशाला जागतिक पातळीवर मान्यता नाही तरी या अटलांटियम देशाचा स्वॅग काही औरच आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.